Home Authors Posts by विद्या देवधर

विद्या देवधर

1 POSTS 0 COMMENTS
विद्या देवधर वास्तव्यास हैदराबाद येथे असतात. त्या तेथील मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष व ‘पंचधारा’ नियतकालिकाच्या संपादक आहेत. त्यांचे शिक्षण एम ए, पीएच डी असून, त्यांचे साहित्यिक कर्तृत्व विविधांगी व अभ्यासपूर्ण आहे. त्यांनी ‘कृष्णामृत नट’ या प्राचीन हस्तलिखिताचे संशोधन व संपादन केले आहे. पगडी व नांदापूरकर या दोन व्यक्तींच्या समग्र साहित्याच्या संपादनात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांचे ‘स्त्रीलिखित कादंबरी- प्रेरणा व प्रवृत्ती’ हे व अन्य पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी काही लघुपट व माहितीपट निर्माण केले आहेत. सध्या त्या अखिल भारतीय महिला चरित्रकोशाच्या संपादनाच्या कामात गुंतल्या आहेत.

रावबहाद्दुर कै. सदाशिवभाऊ साठे (Raobahaddur Sadashiv Sathe who made kalyan a modern city)

0
सदाशिवभाऊ साठे हे स्वकर्तृत्वावर रावबहादूर झाले होते. त्यांनी लिहिलेली रोजनिशी आणि करून घेतलेले वाड्याचे बांधकाम; तसेच, अन्य लग्नकार्य व समारंभ या संबंधात लिहिलेले हिशोब यावरून त्या काळातील जनजीवन आणि महागाई-स्वस्ताई याची नेमकी माहिती मिळते. त्या पार्श्वभूमीवर सदाशिवभाऊ साठे यांचे कार्य आणि कर्तृत्व सहजपणे उठून दिसते...