ज्या लोकांना जातीनिहाय आरक्षण नको आहे, त्यांना त्यांची जात ‘माणूस’ अशी लिहिता आली पाहिजे. ज्यांना हिंदू धर्म ठेवायचा आहे, पण जातिभेद पाळायचा नाही, त्यांना आवश्यक असेल तेथे धर्म ‘हिंदू’ आणि जात ‘माणूस’ अशी नोंद करता आली पाहिजे. जातिभेद नाहीसे किंवा निदान कमी करण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल असेल…
विजापूरची एक राजकन्या आयेशाबिबी (तिला माँ साहेब असेही म्हणत) मक्केला जाण्यासाठी तिच्या लवाजम्यासह (तिच्या सोबत वीस हजार घोडेस्वार होते) दाभोळ बंदरात येऊन पोचली. त्यावेळी मुहम्मद आदिलशहाची कारकीर्द तेथे चालू होती. एवढ्या लोकांसह एवढा लांब प्रवास करण्यासाठी लागणारी मोठी रक्कम - लाखो रूपयांची संपत्ती तिच्याकडे होती. परंतु तिने तिचा पुढील प्रवास रद्द केला. त्या रकमेचा सदुपयोग करण्यासाठी मौलवी आणि काझी यांच्या सल्ल्याप्रमाणे दाभोळातच एक छान मशीद उभी करावी असे ठरले. त्या मशिदीचा स्थपती होता कामिलखान...
‘वावटळ’ हा प्राध्यापक द.के. गंधारे यांचा पहिला काव्यसंग्रह कवितेच्या दालनात आत्मविश्वासाने प्रवेश करतो. ‘वावटळ’मधील कविता ग्रामीण वास्तवाला साक्षात करते. काटेवनाची मोठी अरण्ये जागतिकीकरणानंतर झाली आहेत. त्यांतील अडचणींच्या वावटळींनी अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. तीच वावटळ गंधारे यांच्या कवितेतून साकार झाली आहे. कवी बालपणापासून ग्रामीण जीवनाशी एकरूप झालेला आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवांनी त्याच्या कवितांत प्रातिनिधिक रूप धारण केले आहे...
पंचविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ना. सी. फडके हे होते. ते संमेलन रत्नागिरी येथे 1940 साली भरले होते. ना. सी. फडके यांची जनमानसात प्रतिमा प्रतिभासंपन्न, चतुरस्त्र लेखन करणारा लोकप्रिय साहित्यिक अशी होती.
सुनील खेडकर या शिक्षकामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी या गावाला ओळख मिळाली आहे. ते तेथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून आले आणि त्यांनी त्या गावचा शैक्षणिक कायापालट केला. पाथर्डी तालुका हा कायम दुष्काळी छायेत असणारा. त्या तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात छोटीशी लोकवस्ती असणारे मौजे जोगेवाडी गाव. तेथून पुढे गेले की बीड जिल्ह्याची हद्द सुरू होते.
तुकडोजी महाराजांनीत्यांच्या हयातीत ग्रामगीतेचा प्रयोग करून भंडारा जिल्ह्यातील आमगाव ह्या, शहाण्णव घरे असलेल्या एका लहानशा खेड्याचे रुपांतर आदर्श आमगावात 1953 साली सर्वांच्या समन्वयाने करून दाखवले. प्रेमानुज नावाच्या लेखकाने आदर्श होण्यापूर्वीच्या आमगावचे वर्णन केले ते असे
नगरी बोली ही ठळकपणे उठून दिसणारी नाही; पण तिच्यात स्वतःचे असे वेगळेपण आहे. अहिराणी, वऱ्हाडी, तावडी, कोकणी, कोल्हापुरीया मराठीच्या बोलींना जसे स्थान लाभले तसे नगरी बोलीला मिळालेले नाही. पण ‘काय करू राह्यला?’,
उषा तांबे या खरोखरच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती आहेत. प्राध्यापक, मुलाखतकार, समीक्षक, लेखक, इंग्रजी-मराठी - मराठी-इंग्रजी अशा दुहेरी अनुवादक आणि पुन्हा त्या दोन्ही भाषांत मूळलेखन करणाऱ्या, संपादक, साहित्य संघ पदाधिकारी,
लेखिका अनुपमा उजगरे या मूळच्या अहमदनगरच्या. त्यांची शैक्षणिक प्रगती लग्नानंतर पती निरंजन उजगरे व सासरे हरिश्चन्द्र उजगरे यांच्या प्रोत्साहनामुळे घडून आली. त्यामुळे त्यांना सामाजिक जीवनात गती लाभली आणि त्यांची साहित्यविश्वात प्रतिष्ठा निर्माण झाली.
मोहटा हे माझे छोटेसे गाव दक्षिण अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात वसलेले आहे. सह्याद्रीची डोंगररांग अहमदनगर जिल्ह्यात आल्यानंतर तिला गर्भगिरी हे नाव पडते. त्या गर्भगिरीच्या कुशीमध्ये वसलेले आहे माझे छोटेसे गाव- ‘श्री क्षेत्रमोहटादेवी’. त्यालाच मोहटे किंवा मोहटा या नावानेदेखील ओळखले जाते.