Home Authors Posts by अनुपमा उजगरे

अनुपमा उजगरे

4 POSTS 0 COMMENTS
अनुपमा उजगरे या मूळच्या अहमदनगरच्या. त्यांची शैक्षणिक प्रगती लग्नानंतर पती निरंजन व सासरे हरिश्चन्द्र यांच्या प्रोत्साहनामुळे घडून आली. त्यामुळे त्यांना सामाजिक जीवनात गती लाभली आणि त्यांची साहित्यविश्वात प्रतिष्ठा निर्माण झाली. त्यांनी साहित्यक्षेत्रात लेखन, संपादन आणि संशोधन असे काम केले आहे. त्यांनी अनेक संस्थांमध्ये मानाची पदे भूषवली आहेत. त्यांनी व्यवसाय म्हणून शिक्षिकेची नोकरी केली. मराठी भाषा व साहित्य हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होत. 9920102089

माधव सावरगावकर : जिद्द, कष्ट व हुशारी

माधव सावरगावकर हुशार, चिकित्सक आणि चौकस बुद्धीचे. ते नाशिक जिल्ह्यातील एका तालुक्याच्या गावी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मले. वडिलांचे रेव्हेन्यू खात्यातील नोकरीचे तुटपुंजे पेन्शन, शेतीचे जेमतेम उत्पन्न... पण कुटुंब सुसंस्कृत होते. माधव यांचे शिक्षण नादारीवर झाले. त्यांची रवानगी मुंबईतील बहिणीकडे झाली. तेथे त्यांना साडेतीन रुपये रोजावर हेल्परची नोकरी मिळाली. तोच आधार घेऊन माधव यांनी कष्ट करण्याचा आणि दररोज नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास घेतला. तो शिक्षणाचा मंत्र माधव यांच्या पुढील यशाचे कारण ठरला...

साहित्यव्रती – अशोकदेव टिळक (Ashokdev Tilak’s Contribution to Marathi Literature)

आधुनिक मराठी पंचकवींतील कविवर्य नारायण वामन टिळक आणि साहित्यलक्ष्मी लक्ष्मीबाई टिळक हे आजी-आजोबा. कवयित्री असलेली आजोबांची आई जानकी वामन टिळक ही पणजी. काही भक्तिगीतं आणि स्वत:च्या आईवडिलांच्या 'खिस्तायना'चा समारोपाचा अध्याय लिहिणारे, गोवा मुक्ती संग्रामात हिरिरीने सहभागी झालेले अॅडव्होकेट देवदत्त नारायण टिळक हे वडील. अशा बुद्धिवंत आणि साहित्यिक घराण्यात 29 मे 1921 रोजी अशोक देवदत्त टिळक ह्यांचा जन्म झाला. लक्ष्मीबार्इंनी त्यांच्या ह्या नातवाचा बोलका स्वभाव, चिकित्सक बुद्धी, त्याची जिज्ञासा शमेपर्यंत चिकाटीने प्रश्न विचारून जेरीस आणण्याची आणि स्वत:हूनही शोध घेण्याची वृत्ती 'स्मृतिचित्रे'मध्ये वर्णन केलेली आहे...

मे-ह्या-रि-आ-द-डे, अप्पा! (Ashokdev Tilak’s Birth Centenary)

लक्ष्मीबाई टिळकांना 29 मे 1921 रोजी दुसरा नातू झाला. त्याचे नाव अशोक देवदत्त टिळक. त्यांच्यासारख्याच रंगारूपाचा. मुलीची हौस म्हणून ह्या मुलाचे केस पाठीवर रुळतील एवढे त्यांच्या सुनेने - रूथबाईंनी वाढवले. लक्ष्मीबाईचं हे नातवंड जन्मलं तेच मुळात डोळ्यांवर संशोधकाचा चष्मा घालून, हातात टोकदार लेखणी धरून आणि पायाला चाकं लावून. गुटगुटीत बांधा, लुटुलुटू चालणं, बोबड्या बोलांनी शब्दांशी खेळत हसवत राहणं, जन्मजात निरागस खोडकरपण घेऊन आलेला हा मुलगा 'रोगी पण उद्योगी' असल्याचं वर्णन लक्ष्मीबाई करतात. कराचीत काही काळ वास्तव्य असतानाच्या ह्या नातवाच्या गमती जमती ह्या मुळातून वाचण्यासारख्या आहेत...

उषा तांबे – काँक्रीट व लालित्य यांचे कसदार साहित्यमिश्रण (Usha Tambe – Writer Who...

उषा तांबे या खरोखरच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती आहेत. प्राध्यापक, मुलाखतकार, समीक्षक, लेखक, इंग्रजी-मराठी - मराठी-इंग्रजी अशा दुहेरी अनुवादक आणि पुन्हा त्या दोन्ही भाषांत मूळलेखन करणाऱ्या, संपादक, साहित्य संघ पदाधिकारी,