Home Tags अमरावती

Tag: अमरावती

अमरावती

परंपरा जपणारे शिंदी बुद्रुक

चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य लाभलेले, ग्रामदेवता मरिआईची मिरवणूक, 'द्वारकाच्या बैला'ची मिरवणूक, श्रावणात घरोघरी केल्या जाणाऱ्या 'माळी पौर्णिमे'ची पूजा अशा अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा, परंपरा, उत्सव जोपासणारे, एकेकाळी अजरामर संगीत नाट्यकलावंत घडवून ‘नाटकांची शिंदी’ म्हणून ओळख निर्माण केलेले, 'शिक्षकांचे गाव' अशी वैविध्यपूर्ण ओळख असलेले अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील गाव म्हणजे ‘शिंदी बुद्रुक’...

आरोग्य भानची गोष्ट (The Story of Awareness of Health)

6
आरोग्य म्हणजे शरीर तर आहेच; पण अन्न, पाणी, मानवी मन, भवताल, भावभावना, नातेसंबंध या विशाल परीघामध्ये येणाऱ्या असंख्य गोष्टी या आरोग्य राखण्यासाठी असतात. या परिस्थितीबाबत काय करता येईल याविषयी संवाद घडवणे आणि त्यातून माणसांनी सक्षम होणे शक्य आहे असा विचार करून निर्माण केलेली संस्था म्हणजे ‘आभा’- आरोग्य भान ! लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आयुष्यात बदल घडवण्याची क्षमता डॉ. मोहन देस यांच्या संस्थेच्या कामात आहे...

खुर्चीची चाके आणि मनाचे पंख (Wheels of Chair and Wings of Mind)

कधीतरी, कसलीशी दुखापत होते आणि अनपेक्षितपणे आयुष्याचा सुकाणू पुढच्या दिवसांची वेगळीच दिशा दाखवतो. चालत्या-फिरत्या राजश्री पाटील या तरुण मुलीच्या आयुष्यात एका अपघातामुळे चाकाच्या खुर्चीला खिळून बसण्याचे दिवस आले, तरी मनाच्या पंखांना आकाश दिसत होतेच ! त्या एका बारीकशा धाग्याला घट्ट पकडून त्याचे सक्षम विचारप्रणालीमध्ये रूपांतर करण्याचे, काम करण्याचे धारिष्ट्य आणि धमक या चमक गावातील मुलीत कशी आली असेल? वाचणाऱ्या वाचकांना सकारात्मकतेकडे घेऊन जाणाऱ्या तिच्या कामाची ओळख...

परतवाडा येथील श्री शारदा महिला मंडळ

श्री शारदा मंडळाला पंच्याऐंशी वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. मंडळ माई करकरे आणि त्यांच्या खास जिवलग व जिद्दीने काम करणाऱ्या मैत्रिणी मामी गोरे, बाई नवरे, काकू पराडकर, नमू अभ्यंकर व प्रमिला मुजुमदार- यांच्या प्रयत्नाने व एकीमुळे पुढे आले. त्यांनी शारदेची स्थापना करून कार्यक्रम केले. अचलपूरमध्ये खाजगी मराठी प्राथमिक शाळा नव्हती, म्हणून बालक मंदिर ही शाळा सुरू केली. ती अजूनही चालू आहे...

दापोलीचे सुजाण मंडलीक घराणे (Dapoli’s four hundred years old Mandalik family)

दापोलीच्या मंडलीक घराण्याच्या इतिहासात पंधराव्या शतकापर्यंत मागे जाता येते. गंगाधरभट यांनी मुरुड हे गाव वसवले. मंडलीक घराण्याचा ठळक गुणविशेष म्हणून विस्थापितांचे पुनर्वसन, नवीन प्रदेशात वस्ती करून नवे विचार रूजवणे असा सांगता येईल. त्यांनी मुरुड गाव वसवताना मुसलमान बंधूंसाठी मशीद बांधली ! त्यावरून त्यांची सर्वधर्मसमभावाची दृष्टी लक्षात येते. मंडलीक घराण्यातील रावसाहेब, डॉ. पी.व्ही. व डॉ. जी.व्ही. यांचे योगदान महत्त्वाचे आहे...

अचलपूरचे एकशेतीस वर्षांचे वाचनालय (One hundred and thirty year old library of Achalpur)

बाबासाहेब देशमुख यांनी अचलपूर शहरात गेल्या शतकारंभी अनेक संस्था स्थापन केल्या, त्यांतील पहिली ‘सार्वजनिक वाचनालय’ ही होय. त्या संस्थेचा स्थापना दिनांक उपलब्ध नाही. मात्र वाचनालयाच्या सध्याच्या इमारतीची जागा स्थानिक नगरपालिकेने 1893 साली वाचनालयास दिल्याचा उल्लेख आहे. वाचनालयास शहराच्या मध्यभागात प्रशस्त जागा मिळाली, परंतु साजेशी इमारत नव्हती. त्याकरता बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः बरीच वर्षे वाचनालयाचे काम पाहिले...

दर्गा – दुला रहिमानशहा

‘दुला रहिमानशहा’ यांचा दर्गा परतवाड्याहून अचलपूर शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, बिच्छन नदीकाठी आहे. तो गिझनीचा राजपुत्र. मुस्लीम धर्मीय मंडळी दुला रहिमानशहाला मोठा पीर मानतात. त्या ठिकाणी ‘उरूस’ वर्षातून एकदा भरतो. उरूस म्हणजे पवित्र यात्रा. तो उरूस रबीउल अव्वल महिन्याच्या 12 तारखेपासून भरतो आणि सात दिवस चालतो...

पद्मा पिंपळीकर – अचलपुरावरील अमीट ठसा

पद्मा अनंत पिंपळीकर अचलपूरात राहत नाहीत. त्यांनी ते गाव सोडले व त्या लेकाकडे- श्रीरामकडे राहण्यास गेल्या. परंतु त्यांची छाप- त्यांच्या आठवणी अचलपूरच्या विशेषत: पांढरपेशा स्त्रीजीवनावर आहेत. मुख्यत: सुबोध हायस्कूलच्या शिक्षिका म्हणून त्यांच्या विविध आठवणी अचलपूरला आहेत. त्यांनी किती वेगवेगळ्या स्वरूपाची कामे गावात करून ठेवली आहेत !

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अमरावती जिल्ह्याचे योगदान (Contribution by Amravati District in Sanyukta Maharashtra Movement)

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन हा स्वतंत्र भारतातील एक ऐतिहासिक संघर्ष मानला जातो. अमरावती जिल्ह्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. अगदी रामराव देशमुख यांनी महाविदर्भ संकल्पना स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून मांडली होती. त्यामुळे जिल्ह्यात वातावरण निर्मिती झाली होती. पुढे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बाजूने जनमत वाढले. अमरावती जिल्ह्यातील डाव्या विचारांची पुरोगामी मंडळी आणि काँग्रेसमधील संयुक्त महाराष्ट्रवादी नेते यांनी ती चळवळ गतिमान केली. अमरावती जिल्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे केंद्र विदर्भात बनला...

अचलपूरच्या नाम्याची भजी आणि…

2
अचलपूरची म्हणून म्हणता येतील अशी मोजकी चार-पाच हॉटेल्सच आहेत/ होती ! एरवी प्रत्येक शहरात हॉटेले आणि खाण्याच्या जागा असतात, तशा त्या अचलपुरातही आहेत. त्यांचा दर्जादेखील टपरीपासून ‘फाइव्ह स्टार’पर्यंत आहे. दुल्हा गेटने अचलपुरात प्रवेश केल्याबरोबर चावलमंडीमध्ये ‘बिना’ नावाचे हॉटेल कनकुरे यांच्या नावाने, थोडेसे अंतर चालून गेले, कीपुन्हा ‘बिन’ नावाचे हॉटेल लागे. ते भुरूमल यांच्या नावाने ओळखले जाई. श्री टॉकीजच्या टेकडीवर हॉटेलवजा एक टपरी होती ती ‘नाम्याचे भजे’ या नावाने ओळखली जाई...