Home Authors Posts by मंगला बर्वे

मंगला बर्वे

1 POSTS 0 COMMENTS
मंगला बर्वे यांचे बी ए पर्यंतचे शिक्षण अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून झाले. त्या विवाहानंतर परतवाडा येथे आल्या. त्या श्री शारदा महिला मंडळाच्या 1980 पासून सभासद असून पंधरा वर्षापासून सचिव आहेत. त्यांच्याकडे सेविका समितीची नगर कार्यवाहीका म्हणून दहा वर्षे जबाबदारी होती.

परतवाडा येथील श्री शारदा महिला मंडळ

श्री शारदा मंडळाला पंच्याऐंशी वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. मंडळ माई करकरे आणि त्यांच्या खास जिवलग व जिद्दीने काम करणाऱ्या मैत्रिणी मामी गोरे, बाई नवरे, काकू पराडकर, नमू अभ्यंकर व प्रमिला मुजुमदार- यांच्या प्रयत्नाने व एकीमुळे पुढे आले. त्यांनी शारदेची स्थापना करून कार्यक्रम केले. अचलपूरमध्ये खाजगी मराठी प्राथमिक शाळा नव्हती, म्हणून बालक मंदिर ही शाळा सुरू केली. ती अजूनही चालू आहे...