Home Authors Posts by रंजना नाईक

रंजना नाईक

1 POSTS 0 COMMENTS
रंजना नाईक यांचे शिक्षण अचलपूरच्या जानकीबाई देशमुख कन्या शाळा, उषाबाई देशमुख ज्युनियर कॉलेज आणि जगदंब महाविद्यालय यांतून झाले. त्या बी एससी (बायोलॉजी) झाल्या. त्यानंतर त्यांनी समर्थ कॉलेजमधून संस्कृत आणि इतिहास हे विषय घेऊन दोनवेळा बी ए केले. त्या वाचनालयाच्या उपाध्यक्ष आहेत. त्या पुण्यात असतात. त्यांचे पती अजिंक्य हे स्वतःचा व्यवसाय करतात. त्यांची मुलगी आहे, ती इंजिनीयरींगचे शिक्षण घेत आहे.

अचलपूरचे एकशेतीस वर्षांचे वाचनालय (One hundred and thirty year old library of Achalpur)

बाबासाहेब देशमुख यांनी अचलपूर शहरात गेल्या शतकारंभी अनेक संस्था स्थापन केल्या, त्यांतील पहिली ‘सार्वजनिक वाचनालय’ ही होय. त्या संस्थेचा स्थापना दिनांक उपलब्ध नाही. मात्र वाचनालयाच्या सध्याच्या इमारतीची जागा स्थानिक नगरपालिकेने 1893 साली वाचनालयास दिल्याचा उल्लेख आहे. वाचनालयास शहराच्या मध्यभागात प्रशस्त जागा मिळाली, परंतु साजेशी इमारत नव्हती. त्याकरता बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः बरीच वर्षे वाचनालयाचे काम पाहिले...