Home Tags हैदराबाद

Tag: हैदराबाद

रमाबाई रानडे आणि करमाळ्याचा खोलेश्वर

न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी करमाळा येथील खोलेश्वर देवास साकडे घातले. तेथे त्यांच्या बरोबर स्थानिक मुसलमान डॉक्टर होते आणि रानडे यांची अधिक काळजी घेण्यास पुण्याहून डॉक्टर आले ते विश्राम खोले. ते ज्योतिबांच्या संस्थेत काम करणारे. असे सामाजिक समन्वयाचे वातावरण महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाअखेरीस होते. रमाबाईंच्या पुस्तकातील तो किस्सा जाणण्यासारखा आहे...

सय्यदभाई – तिहेरी तलाक विरुद्धचा लढा

0
सय्यदभाई यांनी मुस्लीम समाजातील पुरुषसत्ताक ‘तिहेरी तलाक’विरुद्धचा लढा 1990 च्या दशकात आणि एकविसाव्या शतकातही चालूच ठेवला. त्यांनी तिहेरी तलाकमुळे मुलांसह घरी परत आलेली बहीण खतिजा हिचा जगण्यासाठीचा संघर्ष जवळून पाहिला होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी मुस्लिम समाजातील धार्मिक कर्मठपणाविरुद्ध लढा दिला. मुस्लिम समाजाचे प्रबोधन हे त्यांनी आयुष्याचे ध्येय मानले होते...

मराठवाड्यातील दगडाबार्इंची शौर्यगाथा (Dagadabai, an ordinary village woman fought for national cause!)

महाराष्ट्रातील मराठवाडा हा भाग स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत येत होता. देशात इतरत्र लोक परकीयांविरूद्ध लढत असताना मराठवाड्यातील जनतेला स्वकीयांच्या अत्याचाराला तोंड द्यावे लागत होते. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ या स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाड्यातील जनतेत त्या विरूद्ध जागृती निर्माण केली. त्या लढ्यात ग्रामीण भागातील एक अतिशय धाडसी महिला सहभागी झाली होती. तिचे नाव होते दगडाबाई देवराव शेळके...

आदिलशाही आणि स्थापत्य (Architecture in Adilshahi Period)

प्राचीन दाभ्यपुरी म्हणजे आजचे दाभोळ ! ते कोकणातील बंदर. ते विदेशी व्यापारामुळे प्राचीन काळापासून भारताच्या मध्ययुगीन काळापर्यंत गजबजलेले असे. अनेक राजवटींचा तेथे संबंध आला. त्यांपैकीच एक आदिलशाही. पोर्तुगीज सेनापती आफांसो द आल्बुकर्कने गोवा जेव्हा 1510 साली जिंकून घेतले, तेव्हा आदिलशाहीकडे दाभोळ हेच एक मोठे बंदर उरले !...

एकतिसावे साहित्य संमेलन (Thirty-first Marathi Literary Meet -1947)

एकतिसावे साहित्य संमेलन हैदराबाद येथे 1947 साली झाले. नरहर रघुनाथ फाटक हे तेथे अध्यक्ष होते. फाटक यांच्या आयुष्याची सुरुवात वृत्तपत्र लेखनाने आणि संपादन सहकार्याने झाली. पुढे, ते नाथीभाई ठाकरसी विद्यापीठ व रुईया कॉलेजात मराठीचे अध्यापक झाले...

हैदराबादचा स्वातंत्र्यलढा (Hyderabad’s freedom struggle)

0
भारतात सुमारे चारशेसाठ देशी संस्थाने होती. त्यांपैकी पंधरा-सोळा संस्थाने बरीच मोठी होती. हैदराबाद, म्हैसूर व काश्मीर ही तीन त्यांपैकी. हैदराबादचे एकूण क्षेत्रफळ ब्याऐंशी हजार सहाशेअठ्ठ्याण्णव चौरस मैल आणि तेथील लोकसंख्या एक कोटी त्रेसष्ट लाख अडतीस हजार होती.

सतरावे साहित्य संमेलन (Seventeenth Marathi Literary Meet – 1931)

हैदराबाद येथे भरलेल्या सतराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानकोशकार डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर हे होते. केतकर हे मराठी भाषेतील कोशयुगाचे प्रवर्तक होत. त्यांचे आयुष्य ज्ञानाच्या उपासनेतच व्यतित झाले. त्यांनी ‘गोविंदपौत्र’ या टोपणनावाने कविता लिहिल्या...

विजय कुलकर्णी यांचे अजिंठा वेड (Vijay Kulkarni Obsessed With Ajintha Art)

विजय कुलकर्णी अजिंठा लेण्यांतील चित्रे (कॉपी)गेली चाळीस वर्षें काढत आहेत. ती विविध कलादालनांमध्ये प्रदर्शित केली जात असतात. त्यांनी काढलेल्या त्या चित्रांना मोठी मागणी असते.