Home Tags विदर्भ

Tag: विदर्भ

नाटककार-संपादक विद्याधर गोखले

1
विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीचे 2024 हे वर्ष आहे. 1960 ते 1980 ही दोन दशके मराठी संगीत नाटक म्हणजे विद्याधर गोखले असे जणू समीकरणच होते. मराठी संगीत नाटक ही मराठी संस्कृतीलाच नव्हे तर जागतिक रंगभूमीला असलेली देणगी आहे. गोखले यांनी पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर अध्यापन काही वर्षे केले. त्यानंतर त्यांनी ‘दैनिक लोकसत्ता’मध्ये नोकरी पत्करली. अनेक वर्षे ‘लोकसत्ता’मध्ये काम करून पत्रकारितेमधील कारकीर्द गाजवली. त्यांनी ‘लोकसत्ता’मध्ये संपादक म्हणूनही जवळजवळ पाच वर्षे काम केले...

तिरुपतीचे बालाजी कुऱ्हा येथील बाळासाहेब (Tirupati Balaji’s temple in Kurha, Maharashtra)

कुऱ्हा हे गाव अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यात आहे. तेथे लोकवस्ती पंधरा हजार आहे. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला म्हणून गावाची ओळख. परंतु तेथेच तिरुपती व्यंकटेश दोन ठिकाणी सुमारे साडेतीनशे वर्षांपासून विराजमान आहे ! त्या दोन ठिकाणच्या देवांना लहान बाळासाहेब व मोठे बाळासाहेब या नावांनी ओळखले जाते; इतकी ती देवता गावाशी एकरूप होऊन गेली आहे...

कोजागिरी पौर्णिमा अर्थात मोत्यांची पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा मी इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर साजरी केली आहे की बस ! कधी शेतात, कधी गच्चीवर, कधी नदीकाठी; तर कधी कोणाच्या अंगणात. त्या प्रत्येक पौर्णिमेची आठवण माझ्यासाठी खास आहे. आमच्या घरी त्या दिवशी पहिल्या अपत्याला, म्हणजे मला ओवाळायचे, नवे कपडे घ्यायचे. काहीतरी गोडधोडाचे जेवण करायचे...

सर्जनशील शेगाव – कवितेचे घर आणि स्व-विकास ग्रूप असलेले (Innovative Shegaon’s House of Poetry...

व्यक्त होणे हे मनमोकळ्या स्वभावाचे लक्षण असते. छोट्या मुलांना आणि स्त्री-पुरुषांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ निर्माण करून देणारे श्रीकांत पेटकर आणि त्यांचे बंधू किशोर यांनी त्यांच्या शेगाव बुद्रुक या गावी ‘कवितेचे घर’ची स्थापना केली आहे. त्याबरोबर आपण जेथे राहतो, तेथे अर्धवट अशी सार्वजनिक सरकारी कामे पडलेली असतात...रस्ते नाहीत, खड्डे-गटार नाही, पाणी नाही अशा अनंत सरकारी गैरसोयी ! त्यावर कोणी तरी येऊन ते काम करेल अशी वाट न पाहता, त्यांनी निर्माण केलेला अनुकरणीय असा ‘व्हॉट्सॲप’वरील ‘विकास ग्रूप’...

खुर्चीची चाके आणि मनाचे पंख (Wheels of Chair and Wings of Mind)

कधीतरी, कसलीशी दुखापत होते आणि अनपेक्षितपणे आयुष्याचा सुकाणू पुढच्या दिवसांची वेगळीच दिशा दाखवतो. चालत्या-फिरत्या राजश्री पाटील या तरुण मुलीच्या आयुष्यात एका अपघातामुळे चाकाच्या खुर्चीला खिळून बसण्याचे दिवस आले, तरी मनाच्या पंखांना आकाश दिसत होतेच ! त्या एका बारीकशा धाग्याला घट्ट पकडून त्याचे सक्षम विचारप्रणालीमध्ये रूपांतर करण्याचे, काम करण्याचे धारिष्ट्य आणि धमक या चमक गावातील मुलीत कशी आली असेल? वाचणाऱ्या वाचकांना सकारात्मकतेकडे घेऊन जाणाऱ्या तिच्या कामाची ओळख...

परतवाडा येथील श्री शारदा महिला मंडळ

श्री शारदा मंडळाला पंच्याऐंशी वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. मंडळ माई करकरे आणि त्यांच्या खास जिवलग व जिद्दीने काम करणाऱ्या मैत्रिणी मामी गोरे, बाई नवरे, काकू पराडकर, नमू अभ्यंकर व प्रमिला मुजुमदार- यांच्या प्रयत्नाने व एकीमुळे पुढे आले. त्यांनी शारदेची स्थापना करून कार्यक्रम केले. अचलपूरमध्ये खाजगी मराठी प्राथमिक शाळा नव्हती, म्हणून बालक मंदिर ही शाळा सुरू केली. ती अजूनही चालू आहे...

अचलपूरचे एकशेतीस वर्षांचे वाचनालय (One hundred and thirty year old library of Achalpur)

बाबासाहेब देशमुख यांनी अचलपूर शहरात गेल्या शतकारंभी अनेक संस्था स्थापन केल्या, त्यांतील पहिली ‘सार्वजनिक वाचनालय’ ही होय. त्या संस्थेचा स्थापना दिनांक उपलब्ध नाही. मात्र वाचनालयाच्या सध्याच्या इमारतीची जागा स्थानिक नगरपालिकेने 1893 साली वाचनालयास दिल्याचा उल्लेख आहे. वाचनालयास शहराच्या मध्यभागात प्रशस्त जागा मिळाली, परंतु साजेशी इमारत नव्हती. त्याकरता बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः बरीच वर्षे वाचनालयाचे काम पाहिले...

दर्गा – दुला रहिमानशहा

‘दुला रहिमानशहा’ यांचा दर्गा परतवाड्याहून अचलपूर शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, बिच्छन नदीकाठी आहे. तो गिझनीचा राजपुत्र. मुस्लीम धर्मीय मंडळी दुला रहिमानशहाला मोठा पीर मानतात. त्या ठिकाणी ‘उरूस’ वर्षातून एकदा भरतो. उरूस म्हणजे पवित्र यात्रा. तो उरूस रबीउल अव्वल महिन्याच्या 12 तारखेपासून भरतो आणि सात दिवस चालतो...

पद्मा पिंपळीकर – अचलपुरावरील अमीट ठसा

पद्मा अनंत पिंपळीकर अचलपूरात राहत नाहीत. त्यांनी ते गाव सोडले व त्या लेकाकडे- श्रीरामकडे राहण्यास गेल्या. परंतु त्यांची छाप- त्यांच्या आठवणी अचलपूरच्या विशेषत: पांढरपेशा स्त्रीजीवनावर आहेत. मुख्यत: सुबोध हायस्कूलच्या शिक्षिका म्हणून त्यांच्या विविध आठवणी अचलपूरला आहेत. त्यांनी किती वेगवेगळ्या स्वरूपाची कामे गावात करून ठेवली आहेत !

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अमरावती जिल्ह्याचे योगदान (Contribution by Amravati District in Sanyukta Maharashtra Movement)

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन हा स्वतंत्र भारतातील एक ऐतिहासिक संघर्ष मानला जातो. अमरावती जिल्ह्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. अगदी रामराव देशमुख यांनी महाविदर्भ संकल्पना स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून मांडली होती. त्यामुळे जिल्ह्यात वातावरण निर्मिती झाली होती. पुढे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बाजूने जनमत वाढले. अमरावती जिल्ह्यातील डाव्या विचारांची पुरोगामी मंडळी आणि काँग्रेसमधील संयुक्त महाराष्ट्रवादी नेते यांनी ती चळवळ गतिमान केली. अमरावती जिल्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे केंद्र विदर्भात बनला...