Home Authors Posts by विनय देशपांडे

विनय देशपांडे

4 POSTS 0 COMMENTS
विनय देशपांडे हे अचलपूरचे रहिवासी. त्यांचा जन्म 1958 चा. त्यांनी विदर्भ मिल्समध्ये पंचवीस वर्षे नोकरी केली. त्यांना विविध खेळांत आणि वास्तुशास्त्र, बांधकामक्षेत्र अशा विषयांत आस्था आहे. त्यांना काव्यशास्त्रात विशेष रूची आहे. त्यांचा ‘कैवल्य’ हा कवितासंग्रह आणि ‘सुलभ गीता’ व ‘विवेकचूडामणि’ हे अनुवाद प्रकाशित आहेत.

विवेकचूडामणि – मराठी अनुवाद घडला हे खरे !

मी कवी किंवा साहित्यिक म्हणून आद्य शंकराचार्य यांच्या वाङ्मयाशी जोडला जावा असे ‘पुण्य’ घडल्याचे आठवत नाही. पण खरोखरीच, आले देवाजीच्या मना... तसे घडले आणि माझ्या हातून ‘विवेकचुडामणि’ या महान संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद होऊन गेला ! एकदा गंमत घडली ! माझी गजल ‘दैनिक सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली. ती वाचून गझल गायक भीमराव पांचाळे यांनी लिहिले, की ती कविता ‘व्योमगंगा वृत्ता’त आहे. तोपर्यंत त्या नावाचे वृत्त आहे, हे माझ्या गावीही नव्हते ...

शंकराचार्यांचा विवेकचूडामणि ग्रंथ

शंकराचार्य हे भारतीय संस्कृतीतील धर्मविचारांचे आद्यगुरू. शिवगुरु भट्ट व आर्याम्बा यांच्या पोटी शंकराचा प्रसाद म्हणून त्यांचा जन्म झाल्याची भावना मनी बाळगून त्यांचे नाव शंकर असे ठेवण्यात आले. शंकर मेधावी होते. ते प्रकांडपंडित म्हणून वयाच्या सहाव्या वर्षीच ओळखले जाऊ लागले. त्यांना वयाच्या आठव्या वर्षी गुरू गोविंदांकडून संन्यास प्राप्त झाला. त्यांना आयुष्य केवळ बत्तीस वर्षांचे लाभले. त्यांनी जवळपास चाळीस ग्रंथांची निर्मिती केली आहे...

विदर्भ मिल्सचे सांस्कृतिक वैभव हरवले ! (Rich Family of Vidarbh Mills Staff & Workers)

अचलपूरची विदर्भ मिल केव्हाच बंद पडली. तेथे आणलेली ‘फिनले मिल्स’ही टिकू शकली नाही. परंतु ‘विदर्भ मिल्स’चे कामगार व कर्मचारी यांच्यासाठी बाबासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने बांधलेल्या वसाहतीतील सांस्कृतिक जीवन हा कित्येक दशकांसाठी तेथील रहिवाशांकरता ठेवा होऊन राहिला आहे. त्या कामगार-कर्मचाऱ्यांचे गणेशोत्सवापासून क्रिडास्पर्धेपर्यंत अनेकानेक ‘इव्हेण्टस’ होत. त्या प्रत्येक घटनेमधून मुलामाणसांसाठी नवा संस्कार प्रस्थापित होई. तेच तर त्या रहिवाशांचे ‘धन’ होते. त्यामुळे मिल चालू असणे वा बंद असणे याचा परिणाम त्यांच्या जीवनावर क्वचितच जाणवला असेल...

विदर्भ मिल्स – अचलपूरचे गतवैभव (How Vidarbh Mill lost its existence)

अचलपूरची ‘विदर्भ मिल्स’ ही जुन्या कापड गिरण्यांपैकी एक. अन्य दोन गिरण्या सोलापूर व अंमळनेर येथे होत्या. विदर्भ मिल त्या प्रदेशातील कापसाचे पिक ध्यानी घेऊन बाबासाहेब देशमुख यांनी सुरू केली आणि ती एका वैभवाला पोचलीदेखील. पण सरकारी हस्तक्षेपामुळे तिची पडझड झाली, तेथे ‘फिनले मिल्स’ सुरू करण्यात आली. तीही बंद पडली आहे... विदर्भ मिलची दु:खद कहाणी !...