कोल्हापूर
Tag: कोल्हापूर
पाऊस पहावा (Enjoying Rains)
पावसाळा हा सृजनाचा, आनंदाचा ऋतू. प्रत्येक माणसाच्या मनात पावसाच्या काही खास आठवणी असतात. मित्रमैत्रिणींबरोबर केलेल्या पावसाळ्यातल्या भटकंतीच्या, धबधब्यांच्या, सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यांच्या, हिरवाईच्या आणि क्वचित निसर्गाच्या कोपाला एकत्र येऊन तोंड देण्याच्याही. जसजसा काळ जातो तसतशा या आठवणी अधिक गहिऱ्या होत जातात.
भारतासारख्या कृषीप्रधान देशात ग्रामीण भागात पावसाची अशी एक खास परिभाषा, पावसाविषयी ठोकताळे आहेत. ते जाणून घेण्यात मजा आहे. सध्या पावसाने संततधार धरली आहे. अशा या बाहेरच्या पावसाविषयीचा डॉ. मंजूषा देशपांडे यांचा ललित लेख ज्याच्यात्याच्या मनातल्या पावसाच्या आठवणी हमखास जाग्या करेल...
शाहूंचा राज्याभिषेक – काव्यमय वृत्तांत
कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या राज्यारोहण समारंभाचे एका प्रत्यक्षदर्शीने केलेले काव्यमय वर्णन... त्याची संशोधित आणि संपादित स्वरूपातील देखणी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. तो समारंभ 2 एप्रिल 1894 रोजी झाला. ती ऐतिहासिक महत्त्वाची घटना होय. तो प्रसंग कोल्हापूरसाठी सुवर्णयुग घेऊन आला. त्या क्षणापासून कोल्हापूर संस्थानात सामाजिक क्रांतीचे नवे पर्व सुरू झाले ! त्यातून देशभरातील सामाजिक सुधारणांना वेगळी दिशा मिळाली. तो ठेवा पुन्हा प्रकाशात आणण्याची महत्त्वाची कामगिरी यशोधन जोशी यांनी केली आहे. ती घटना 'मुक्त्यारी समारंभ’ अथवा ‘श्रीमन्ममहाराज शाहू छत्रपती यांचा राज्याधिकार स्वीकारोत्सव’ या नावाने ओळखली जाते. ती मूळ संहिता आहे बाळाजी महादेव करवडे यांची...
शाहू महाराज – शैक्षणिक कार्य !
करवीर म्हणजे कोल्हापूर हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक संस्थान. अशी पाचशेपासष्ट संस्थाने भारतात होती. शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत करवीर संस्थानामध्ये जे कार्य केले, त्यामुळे ते संस्थान स्मरणात राहिले आहे. शाहू महाराजांचे कार्य इतके प्रभावी आणि महत्त्वपूर्ण होते, की स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करताना शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची नोंद घटना समितीला घ्यावी लागली ! शाहू महाराजांनी समाज सुधारणा, शिक्षण, दलितांचा उद्धार, जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा काही क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे...
गल्लीतली दिवाळी सुट्टी (Diwali Vacation in Good Old Days!)
आमची गल्ली म्हणजे राजारामपुरी अकरावी गल्ली, कोल्हापूर. आमच्या लहानपणी आम्ही या गल्लीत राहत असू. सहामाही परीक्षा संपली की शाळेला दिवाळीची सुट्टी लागायची. त्यावेळच्या दिवाळी सुट्टीचे, दिवाळीच्या अगोदरची आणि दिवाळीच्या नंतरची सुट्टी असे सरळ सरळ दोन भाग करता येत. त्या काळातल्या आठवणींनी डोळे क्षणभर पाणावतात. केवळ क्षणभरच... आजच्या सुट्टीतली मजा विकत घेतलेली असली तरी... सोयीची आहे... कालसुसंगत आहे... हे जाणवत राहतं...
कोल्हापूर-गगनबावड्याचे मोरजाई पठार !
मोरजाई परिसरातील भटकंती म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा, पर्वतांचा, संस्कृतीचा, पाण्याचा, अरण्यांचा, स्थापत्यांचा अस्सल अनुभव ! तो अनुभव इतिहासातही जिवंत असण्याचा भाव निर्माण करू शकतो. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर आसळज गावापासून तीन-चार किलोमीटर डावीकडील बाजूस सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक ओढा आहे. मुख्य रस्ता सोडून थोडे आत... गर्द वनराई, निवळशंख पाणी आणि त्यासोबत काही हिनयान पंथीय छोटी, पण टुमदार लेणी असे ते विलक्षण नैसर्गिक पण माणसाचा यथायोग्य हस्तक्षेप झालेले ठिकाण आहे...
ऐसे उगार माझे गाव ! (Ugar – My town)
उगार खुर्द हे भूतपूर्व सांगली संस्थानातील छोटेसे खेडेगाव. गाव स्वतंत्र भारतात गेल्या पाऊणशे वर्षांत पूर्ण पालटून गेले आहे. मूलत: दक्षिणवाहिनी असणारी कृष्णा नदी उगारजवळ उत्तर वाहिनी होते. अशा वळणाला तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळे नदीला प्रशस्त दगडी घाट वरपासून खाली, अगदी पात्राच्या मध्यभागापर्यंत आहे. शंभर वर्षे झाली तरी त्या घाटाचे बांधकाम अभंग आहे. उगार खुर्दला भाषिक सलगतेच्या तत्त्वावर सीमेलगतचे गाव म्हणून राज्य सरकारने भाषिक सवलती दिल्या आहेत...
एकोणपन्नासावे साहित्य संमेलन (Forty-Nine Marathi Literary Meet 1973)
यवतमाळ येथे 1973 साली झालेल्या एकोणपन्नासाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ‘गीतरामायण’कार ग.दि. (गजानन दिगंबर) माडगूळकर ऊर्फ गदिमा. ‘गदिमा’ हे केवळ ‘गीतरामायण’ एवढे अप्रतिम काव्य लिहून साहित्यविश्वात अजरामर झाले असते. ते प्रासादिक, प्रतिभाशाली आणि प्रसन्न असे गीतकार होते. त्यांच्या गीतरचनेला कवितांचा दर्जा लाभला. त्यांच्या पटकथा-संवादांनीदेखील मराठी चित्रपटसृष्टीत अक्षरशः चमत्कार केला !माडगूळकर हे कोठल्याही मैफिलीचा ताबा घेत असत...
सामानगड – वेडात दौडले वीर मराठे सात ! (Samangad – The fort known for...
कोल्हापूरजवळच्या सामानगड या किल्ल्याचे स्थान आणि महत्त्व, दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो वल्लभगड, महिपालगड, भुदरगड, रांगणा अशा लढाऊ किल्ल्यांच्या बेचक्यात, अगदी मधोमध आहे. त्यामुळे त्या किल्ल्याचे महत्त्व रसद पुरवठ्यासाठी फार जाणवून गेले. त्यावरूनच कदाचित किल्ल्यास सामानगड हे नाव पडले असावे ! अवघा महाराष्ट्र शिवराज्याभिषेकात 1674 मध्ये न्हाऊन निघाला होता. तेव्हा त्या किल्ल्याच्या परिसरात वेगळ्याच घटना घडत होत्या. स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर यांना मात्र त्या शिवराज्याभिषेक समारंभापासून वंचित राहवे लागले...
अंधांना डोळे आणि डोळसांना दृष्टी – अत्याळची चळवळ
‘नेत्रदान’ हे श्रेष्ठ दान आहे ही जाणीव गडहिंग्लज तालुक्याच्या ‘अत्याळ’ गावातील लोकांमध्ये जागी झाली आहे. तेथे गेल्या दहा वर्षांपासून (2012) ‘अंधांना डोळे व डोळसांना दृष्टी’ या ब्रीदवाक्यावर आधारित चळवळ सुरू आहे. कौतुक म्हणजे अत्याळमधील चळवळीशी वर्षागणिक नवी गावे जोडली जात आहेत. चळवळीच्या माध्यमातून त्या छोट्या छोट्या गावांतून अकरा वर्षांत शहाण्णव जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे ! परस्परांपासून दुरावत चाललेली माणसे एकमेकांना जोडली जावीत ही भावना हा चळवळीचा गाभा होऊन गेला आहे. ज्या अंधांना नेत्र प्रत्यारोपणातून दृष्टी मिळू शकत नाही अशा दृष्टीहीनांचा समाजातील वावर सुकर व्हावा म्हणून कार्यशाळा आणि त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती केंद्र असे जादा उपक्रमही चळवळीमार्फत चालतात...
दाभोळचे बिनखुर्चीचे डॉक्टर मधुकर लुकतुके (Dabhol’s Doctor Madhukar Luktuke)
डॉ. मधुकर लुकतुके यांचा दाभोळचा दवाखाना गेल्या सहा दशकांपासून चालू आहे. दाभोळ पंचक्रोशीतील रहिवासी वैद्यकीय उपचार आणि सल्ला यांसाठी त्यांच्याकडे एखाद्या पर्यटन स्थळाप्रमाणे सहकुटुंब गर्दी करतात. वैद्यकीय पर्यटन ही संकल्पना बहुदा तेथे जन्माला आली असावी ! डॉक्टर हे माझे आजोबा. आम्ही त्यांना ‘जोजो’ म्हणतो. जोजोंनी मेडिकल ऑफिसर म्हणून ‘पोस्टिंग’ मुद्दाम लहानशा खेड्यात मागून घेतले. असे ते 1960 साली दाभोळला पोचले आणि तेथीलच झाले...