Home Search

नाटक - search results

If you're not happy with the results, please do another search

स्वरांची मोहिनी (Mesmerising Music)

4
संगीताची मोहिनी अवीट आहे. प्रत्येकापाशी गाण्यांच्या आठवणी असतात. एखादं गाण पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच्या किंवा एखादं गाणं ऐकत असताना घडलेल्या प्रसंगांच्या... ते गाणं आणि त्या आठवणी हातात हात घालूनच येतात. या विषयावर प्रत्येकजण स्वत:चा असा ललित लेख लिहू शकेल. भरून आलेल्या आभाळातून कोसळणाऱ्या सरींचे धारानृत्य सुरू असताना मनाला आपसूकच हुरहुर लागते. अशा वेळी गाणं आणि गाण्यांच्या आठवणी साथ देतात. मनाला सुकून देतात. या लेखात गाण्यांच्या आठवणी सांगत आहेत, इतर वेळी गणिताविषयी लिहिणारे मुकेश थळी. त्यांच्या मते, गाण्यातही गणित आहे आणि गणितातही गाणे आहे...

नादसागर मालकंस (Melodic Malkansa)

शास्त्रीय संगीतातील रागांचा परिचय करून देणाऱ्या लेखमालेत डॉ. सौमित्र कुलकर्णी ‘मालकंस’ या लोकप्रिय आणि कलाकारप्रिय रागाविषयी माहिती देत आहेत. हा राग गाण्याची वेळ मध्यरात्र ही आहे. मध्यरात्रीच्या महासागरासारखा, प्रशांत आणि धीरगंभीर असलेला हा राग माहीत नसतानाही त्यावर आधारित संगीतरचना मनाला मोहिनी घालतात. थोडासा परिचय झाला तर त्या आनंदात भरच पडेल. दिग्गज कलाकारांनी गायलेल्या या रागातल्या बंदिशींच्या यू-ट्युब लिंक सोबत दिल्या आहेत, रागाचा परिचय होण्यासाठी त्यांची मदत होईल...

भांगवाडी थिएटर (Bhangwadi Theater)

भांगवाडी ही मुंबईच्या काळबादेवी विभागातली एक वाडी. तेथे पूर्वी आसपास भांग विकणारी दुकाने होती म्हणून त्या भागाचे नाव भांगवाडी. अशा ठिकाणी गुजराती संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ 1874 मध्ये रोवली गेली. तेथे गुजराती नाटके 1968 पर्यंत होत होती. एका विशिष्ट पद्धतीची नाटके तेथे होत असत त्यामुळे त्या पद्धतीच्या नाटकांना भांगवाडी थिएटर म्हटले जाऊ लागले. अजूनही गुजराती नाटकांच्या सादरीकरणावर या पद्धतीचा काहीसा प्रभाव आहे. गुजराती रंगभूमीवरचे ज्येष्ठ दिग्दर्शक, नट आणि निर्माते मनोज शहा यांची भांगवाडी थिएटरविषयी एक विस्तृत मुलाखत तेजस्वी पाटील आणि तन्वी गुंडये यांनी घेतली आहे...

विज्ञानबोधाची प्रस्तावना – श्री.म.माटे (Vidnyanbodhachi Prastavana)

श्री.म.माटे उर्फ माटे मास्तर हे महाराष्ट्रातल्या कर्त्या सुधारकांपैकी एक. त्यांनी दलित साहित्याची पहाट होण्यापूर्वी ‘उपेक्षितांचे अंतरंग’ लिहून दलितांची स्थितीगती मराठी समाजासमोर आणली. त्यातले, ‘बन्सीधरा! तू कोठे जाशील?’ ‘कृष्णाकाठचा रामवंशी’ किंवा ‘सावित्री मुक्यानेच मेली’ ह्या कथा आजही अनेकांच्या लक्षात असतील. ‘विज्ञानबोधाची प्रस्तावना’ हे कुठल्या पुस्तकाची प्रस्तावना नसून स्वतंत्र पुस्तक आहे. त्यांचा ‘विज्ञानबोध’ नावाचे वार्षिक नियमितपणे प्रकाशित करण्याचा मानस होता. याची पूर्वपीठिका म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी विज्ञाननिष्ठ विवेकवादी दृष्टीकोनाची मांडणी केली आहे. गिरीश दुर्वे यांच्या लेखाच्या निमित्ताने या पुस्तकाविषयी जिज्ञासा जागृत व्हावी हाच हेतू आहे...

स्त्री मुक्ती संघटना (Stree Mukti Sanghatana)

स्त्री मुक्ती संघटना गेली 48 वर्षे महाराष्ट्रात कार्यरत आहे. सातत्याने विविध उपक्रम राबवून संघटनेने विविध स्तरातील स्त्रियांच्या आयुष्यात गुणात्मक फरक केला आहे. पंचवीस वर्षे स्त्री मुक्ती संघटनेच्या उपाध्यक्ष आणि 2018 पासून त्या संघटनेच्या सेक्रेटरी असलेल्या अमोल केरकर या लेखात स्त्री मुक्ती संघटनेच्या उद्दिष्टांविषयी आणि वाटचालीविषयी विस्ताराने सांगत आहेत. संस्थेच्या 48 वर्षांच्या कामाविषयी असल्यामुळे लेख काहीसा दीर्घ आहे. मात्र संस्थेच्या वाढीसाठी केलेले विविध उपक्रम या लेखामुळे इतर संस्थांनाही मार्गदर्शक ठरतील असे आहेत. अमोल केरकर यांना बँक कर्मचाऱ्यांच्या चळवळीत काम करण्याचाही दीर्घ अनुभव आहे. त्यांच्यासारख्या मृदू स्वभावाच्या आणि चिकाटीने काम करणाऱ्या कार्यकर्तीचे अनुभव आणि विचार महत्त्वाचे आहेत...

माणदेश : दंडकारण्यातील प्राचीन भूमी (Maharashtra’s land with ancient history)

मध्य भारतातील विस्तृत पठार हा भारताच्या पाच प्राकृतिक विभागांपैकी सर्वात प्राचीन भूभाग आहे. त्या भारतीय पठारात शंभू महादेव ही डोंगररांग आहे. दंडकारण्य हा भूभाग त्या डोंगररांगेमध्ये आहे. ‘माणदेश’ ही मेंढपाळ धनगर जमातीची भूमी त्यातच येते. ती भूमी पुण्य आहे असे ते मानतात. माणदेशाचे एकूण क्षेत्रफळ अठ्ठेचाळीस हजार सातशे चौरस किलोमीटर आहे. माणदेश हा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर पसरलेला आहे. तो सातत्याने दुष्काळग्रस्त आहे. माण आणि आटपाडी (संपूर्ण तालुके), सांगोला (एक्याऐंशी गावे), मंगळवेढा (बावीस गावे), जत (एकतीस गावे), कवठेमहांकाळ (तेरा गावे) आणि पंढरपूर (बारा गावे) या तालुक्यांचा समावेश माणदेशात होतो...

दशावतार : एक समृद्ध कलावारसा (Folk Theater of Konkan –Dashavtar)

महाराष्ट्रात लोकरंगभूमीचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे दशावतार. नागर रंगभूमीच्या आधीपासून दशावतारी नाटक अस्तित्वात होते असे मानले जाते आणि आजही ते जोमदार पद्धतीने सादर होत आहे. नव्या स्वरूपात ते व्यावसायिक रंगभूमीवरही कमालीचे यशस्वी झाले आहे. अत्यंत लवचिक असा हा नाट्यप्रकार कोठल्याही काळात लोकभावनेला नाट्यरूप देऊ शकतो...

नवचित्रकला (Modern Art)

सर्वसामान्यपणे नवचित्रकला ही अगम्य आहे, ती आपल्याकरता नाही अशी समजूत असते. ती समजत नाही असे गृहीत धरून तिच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा तिची थोडी हेटाळणी...

मधुवंतीची मोहिनी (Raga Madhuvanti)

डॉ. सौमित्र कुलकर्णी यांची शास्त्रीय संगीताविषयीची मालिका सुरु करण्यामागचा उद्देश शास्त्रीय संगीतातले बारकावे विशद करून सर्वसामान्य रसिकांना त्याचा  आस्वाद घ्यायला मदत करावी, हा होता....

कलगी तुरा (Kalagi Tura)

(Kalagi Tura) ग्रामीण महाराष्ट्रात, कलगी तुरा हा लोककलेचा एक लोकप्रिय प्रकार आहे. वैचारिक मुकाबला असावा असा सवाल-जबाबाचा खेळ असतो. तमाशाचा फड असावा तसाच फड पण...