मुंबई-पुणे प्रवास करत असताना खंडाळा घाटातील सौंदर्य कोठल्याही ऋतूत नेहमीच भुरळ घालते. विशेष करून रेल्वेने प्रवास करत असताना घाटात सामोऱ्या येणाऱ्या सह्याद्रीच्या भव्यतेच्या जाणिवेने मन हरखून जाते. मी हा प्रवास खूपदा केला आहे. त्या प्रवासात ठाकूरवाडी, मंकी हिल, नागनाथ, जामरुंग अशी रेल्वेची लहानशी उपस्थानके किंवा तांत्रिक थांबे आहेत. दुर्गम घाटात, जंगलात त्या स्थानकांचे प्रयोजन काय हा प्रश्न पडत असे. घाटात बोगद्याच्या डोंगरावर एक गुहा आहे. त्या गुहेत नागनाथाचे छोटेसे देऊळ आहे. घाट परिसरातील दुर्गवैभव म्हणता येईल अशा राजमाची किल्ला, ढाक किल्ला, नागफणी डोंगर या सर्वश्रुत ठिकाणी तर गेलो; तसेच, त्या परिसरातील आडवाटा जिज्ञासेपोटी पालथ्या घातल्या...
मध्य भारतातील विस्तृत पठार हा भारताच्या पाच प्राकृतिक विभागांपैकी सर्वात प्राचीन भूभाग आहे. त्या भारतीय पठारात शंभू महादेव ही डोंगररांग आहे. दंडकारण्य हा भूभाग त्या डोंगररांगेमध्ये आहे. ‘माणदेश’ ही मेंढपाळ धनगर जमातीची भूमी त्यातच येते. ती भूमी पुण्य आहे असे ते मानतात. माणदेशाचे एकूण क्षेत्रफळ अठ्ठेचाळीस हजार सातशे चौरस किलोमीटर आहे. माणदेश हा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर पसरलेला आहे. तो सातत्याने दुष्काळग्रस्त आहे. माण आणि आटपाडी (संपूर्ण तालुके), सांगोला (एक्याऐंशी गावे), मंगळवेढा (बावीस गावे), जत (एकतीस गावे), कवठेमहांकाळ (तेरा गावे) आणि पंढरपूर (बारा गावे) या तालुक्यांचा समावेश माणदेशात होतो...
काही नावांपुढे विशेषणे लावायची काहीच आवश्यकता नसते. रंगो बापूजी गुप्ते हे त्यापैकीच एक नाव आहे. साताऱ्याच्या गादीचे छत्रपती प्रतापसिंह यांच्यावर ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या अन्यायाविरुद्ध इंग्लंडमध्ये जाऊन सनदशीर मार्गाने लढणारे छत्रपतींचे वकील म्हणून रंगो बापूजी प्रसिद्ध आहेत. छत्रपतींच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाचाही दावा त्यांनी लावून धरला. चौदा वर्षे लढा देऊनही अपयश आल्यावर सनदशीर मार्ग सोडून देऊन त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग धरला...
स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सत्तेविरूद्ध उठाव 1857 च्या क्रांतियुद्धाअगोदरही झालेले होते. दक्षिणेतील वेलोर छावणीतील हिंदी शिपायांना कपाळावर गंध लावण्यास, कानात भिकबाळ्या घालण्यास किंवा दाढी राखण्यास बंदी 1806 साली घातली होती. त्यामुळे हिंदू-मुसलमानांनी त्यांच्या भावना –धर्मभावना दुखावल्या गेल्या म्हणून उठाव केलेला होता. कंपनी सरकारने साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांना पदच्युत करून त्यांचे राज्य 1839 साली खालसा केले...
नाना फडणीस यांनी बांधलेला मेणवलीचा वाडा ही वाई येथील ऐतिहासिक महत्त्वाची गोष्ट. तो उत्कृष्ट कामाचा नमुना आहे. नानांचे वंशज तेथे राहत आहेत. त्यांनी नानांच्या मेणवली व बेलबाग या दोन्ही वास्तू उत्तम प्रकारे जतन केल्या आहेत. तो शांत परिसर नानांच्या एकांतप्रिय मनाला भावला असणार; म्हणून नानांनी तेथे वास्तव्यासाठी सुंदर वास्तूंची व अतिसुंदर अशा घाटाची निर्मिती केली...
नाना फडणीस यांनी त्यांच्या असामान्य बुद्धिचार्तुयाने, कर्तृत्वाने आणि अपार कष्टांनी स्वराज्याचे रक्षण करण्याचे, ते टिकवण्याचे आणि वाढवण्याचेही कार्य मराठ्यांच्या इतिहासात केले आहे. त्यांची ख्याती निष्ठावंत प्रशासक आणि कर्तबगार स्वराज्यसेवक अशी आहे...
माणूस ज्या भूमीत, ज्या गावात-खेड्यात जन्मला त्या भूमीचा एकेक कण त्याला काशी, गया, मथुरा ह्यासम पवित्र-पावन असतो. तेथील काटेरी बोरीबाभळींना त्याच्या हृदयी पाईन-देवदारपेक्षाही वीतभर जास्तच उंची लाभलेली असते ! गाववेशीवरील म्हसोबा, वेताळ अन बिरोबा ही तर त्याची खरीखुरी ज्योतिर्लिंगे असतात ! बरड हे माझे गाव माझ्यासाठी प्रेमाचे तशा प्रकारे आहे. अन्यथा बरड गाव नावाप्रमाणे वैराण, उजाड आहे. ते सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडे आहे. ते गाव पुणे-पंढरपूर ह्या राज्य महामार्गावर फलटणपासून पूर्वेस अठरा किलोमीटर अंतरावर आहे...
‘ढवळ’ हे गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले आहे. ते गाव फलटण-पुसेगाव राज्य महामार्गावर फलटणपासून एकोणीस किलोमीटर अंतरावर येते. ढवळगावाला कुस्तीची परंपरा मोठी आहे. हे गाव पैलवानांचे गाव म्हणूनच प्रसिद्ध आहे. गावातील काही मल्लांनी महाराष्ट्र चॅम्पियन हा किताबदेखील मिळवला आहे. माणदेशच्या इतिहासात प्रथम ‘महाराष्ट्र केसरी’ ही मानाची गदा सातारा जिल्ह्याला मिळवून देणारे पैलवान बापूराव लोखंडे हे ढवळ गावच्या मातीतले वीर...
छत्रपतींच्या सहकाऱ्यांमध्ये अभिमानाने नाव घ्यावे लागेल, ते सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे ! त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड शहरापासून जवळ असलेल्या तळबीड गावी 1630 मध्ये झाला. ‘हंबीरराव’ हा त्यांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल मिळालेला किताब आहे. तळबीड गावात हंबीरराव मोहिते यांचे स्मारक गावात समोरच पूर्वेकडे तोंड करून उभारलेले आहे. ती वास्तू कलात्मक आहे...
साताऱ्यातील कल्याणगड तथा नांदगिरी हा किल्ला अपरिचित आणि दुर्गम असा आहे. तो सह्याद्रीमधील महादेव रांगेच्या एका शृंगामध्ये उभा आहे. किल्ला सातारा शहर आणि पुणे-सातारा महामार्ग यांच्या पूर्वेला येतो. किल्ल्याच्या जवळ जरंडेश्वराचा डोंगर आहे. तेथे रामदास स्वामींनी स्थापन केलेले मारुतीचे मंदिर आहे. यमाई मातेचे मंदिरही जवळ, किन्हई डोंगरावर आहे. बालेकिल्ल्यावर सपाट भागात मधोमध वडाचे मोठे झाड आहे. त्यामुळे किल्ला दुरूनही ओळखता येतो...