Home शिक्षकांचे व्यासपीठ

शिक्षकांचे व्यासपीठ

अंबरनाथची गुरुकुल शाळा – शिक्षणाचा नवा आयाम (Ambernath School preserves Gurukul Tradition)

अंबरनाथचे ‘गुरुकुल’ केवळ शिक्षण देत नाही, ते विद्यार्थ्याला समजून घेते, घडवते आणि आयुष्यातील प्रत्येक वळणासाठी तयार करते. असे म्हणता येईल की ‘गुरुकुला’त आयुष्य शिकायला मिळते ! गुरुकुल हा भाऊसाहेब परांजपे विद्यालयाचा एक आगळा वेगळा उपक्रम आहे. तेथे विद्यार्थी स्वयंप्रेरणेने आणि अर्थातच पालकांच्या संमतीने प्रवेश घेतात. ‘गुरुकुला’त शाळा बारा तासांची होते ! नित्याचे वर्ग पाच तासांचे आणि गुरुकुलातील विशेष संस्कार शिक्षण सात तासांचे. पण गंमत अशी की तेथे शिकणाऱ्या मुलांना शिक्षणाचा तो जादा वेळ म्हणजे ओझे वाटत नाही...

विलास रबडे – हरहुन्नरी विज्ञानयात्री (Rabde, the man with scientific temper and action)

विलास रबडे सत्याहत्तर वर्षांचा झाला, पण त्याचा दिवस चोवीस तासांपेक्षा आणि आठवडा सात दिवसांपेक्षा मोठा आहे ! तो इतक्या गोष्टी करत असतो, की ईश्वराने या माणसाला अतिरिक्त ‘काल’ देऊन या जगात पाठवले आहे की काय असे वाटावे ! मात्र तो अतिरिक्त बहुतेक वेळ समाजासाठी खर्च करतो. तो कोठे शाळेत विज्ञानविषयक कार्यक्रम घडवून आणतो, त्याने कोठे शाळेचे विज्ञानविषयक रेडिओ स्टेशन सुरू केलेले असते, शाळेत रिपेअर कॅफे सुरू केलेला असतो -त्यात मुलांना त्यांच्या घरच्या नादुरुस्त वस्तू आणून त्या दुरुस्त करण्याचे मार्गदर्शन मिळते. त्याने हॅम रेडिओ सेट मिळवून पुण्यात प्रदीप दळवी आणि अरविंद आठवले यांच्याबरोबर हॅम क्लब सुरू केला...

गणितीय कूट रचनेचे मर्म (Concept of Mathematical Coherence)

1
शास्त्रीय संगीताविषयी आणि गणिताविषयी मालिका सुरू करण्याचे उद्दिष्ट हे आहे की काही अमूर्त सौंदर्य कल्पनांपर्यंत पोचण्याचा मार्ग सुकर व्हावा. सर्वसामान्यपणे शास्त्रीय संगीताप्रमाणेच गणिताविषयी मनात एक सूक्ष्म अढी असते पण दोन्ही समजल्यावर आंनंद होतो. गणिताविषयीच्या मालिकेत काही संकल्पना आणि काही कोडी अशी जाणीवपूर्वक रचना केली आहे जेणेकरून वाचायलाही गंमत येईल...

पालडोह शाळा, वर्षाचे तीनशेपासष्ट दिवस ! (Paldoh School, 365 days a year!)

‘पालडोह’ हे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील घाटवळणावरचे गाव… ते गाव शेतीचे वाद, कौटुंबिक भांडणतंटे, भुरट्या चोऱ्या, अंधश्रद्धा, बालविवाह अशा कारणांनी तालुक्यात बदप्रसिद्ध होते. राजेंद्र परतेकी यांनी गावच्या या शिक्षणविषयक उदासीनतेवर मात करण्याचे ठरवले. राजेंद्र यांनी विद्यार्थी, पालक, गाव, शाळा यांचा मेळ परस्परांशी घालण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी गावतरुणांची क्रिकेट, व्हॉलिबॉल, खो-खो टीम गावाशेजारच्या जत्रेमध्ये जमवली, त्या संघाकडून खेळणे, टीम जिंकण्यासाठी निकराची लढाई करणे अशा गोष्टी गावच्या मुला-तरुणांमध्ये सुरू केल्या...

सौंदर्यशास्त्र गणिताचे (Aesthetics of Mathematics)

16
गणित हा शास्त्रीय संगीताइतकाच सौंदर्यपूर्ण आणि अभिजात विषय आहे. ज्याला प्युअर मॅथेमॅटिक्स म्हणजेच विशुद्ध गणित म्हणतात ते म्हणजे मानवी प्रतिभेच्या शिखरांपैकी एक आहे. मात्र शालेय जीवनापासून चुकीच्या पद्धतीने शिकवल्यामुळे म्हणा किंवा शिकल्यामुळे म्हणा; अनेक बुद्धीमान माणसे या बौद्धिक पोषणाला मुकतात. या अवघड वाटणाऱ्या विषयाबद्दल ‘सौंदर्यशास्त्र गणिताचे’ या लेखात सोप्या भाषेत सांगत आहेत, गोव्याचे गणित शिक्षक मुकेश थळी...

शिक्षण कशासाठी- हे समजेल का?

शिकवण्याची नव्हे तर शिकण्यासंबंधीची आव्हाने या शतकात वाढत जाणार आहेत. भारतीय शिक्षणव्यवस्था ‘टीचिंग’चा विचार करते; सगळा भर अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर असतो. विद्यार्थी काय व किती शिकला याचा विचार फारसा नसतो. त्याच्या शिक्षणाचे मूल्यमापन ज्या परीक्षांद्वारे होते त्याही कुचकामाच्या आहेत. शास्त्र, विज्ञान समजून घेणे खूप कठीण नाही, पण ते तसे सोपेदेखील नाही ! शिकणे याचा अर्थ पुस्तकातून माहिती गोळा करणे, दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे हा नव्हे ...

मुलांचे वाचन – एक विचार (Natural Learning a thought)

8
मुलांचे वाचन म्हणजे अर्थातच त्यांची वाचायला शिकण्याची प्रक्रिया. या विषयावर बोलायला सुरुवात अगदी प्राथमिक पातळीवरून करूया. वय वर्षे तीन ते सहा ह्या वयोगटातील मुलांच्या शिक्षणाला बालशिक्षण असे म्हणतात. ह्यालाच 2020 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत शिक्षण असे म्हटले आहे. ह्या पायाभूत शिक्षणाचे किंवा बालशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट मुलांचा सर्वांगीण विकास साधणे हे आहे...

तीन पिढ्यांचे शिल्पकार (The teacher who shaped three generations)

चांगले शिक्षक आणि त्यांनी दिलेली शिकवण यांना मनातून कधी हद्दपार करता येत नाही. ते व्यक्तीच्या असण्याबरोबर, विचारांबरोबर असतातच. तीन पिढ्यांना शिकवणाऱ्या इनामदार सरांचे विद्यार्थी- आज तरुण ते वृद्ध वयातील त्यांच्या शिष्यांच्या मनात, घर करून आहेत. मंजूषा इनामदार-जाधव या त्यांच्या कन्या. त्यांच्या वडिलांना, वडील आणि गुरू या दोन भूमिकांमधून वावरताना त्यांच्या मनामध्ये उभे राहिलेले चित्र या लेखात आहे...

राज्यभर अमृतमहोत्सवी व्याख्याने – वैचारिक घुसळण (Ideological-awakening-on-august-15-across-maharashtra

महाराष्ट्रातील पाच संस्था एकत्र येऊन 15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन ते पुढील वर्षी 30 जानेवारी रोजी येणारा महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन या काळात राज्यभर वैचारिक जागरण करणार आहेत. या काळात राज्यभर विविध विषयांवर अभ्यासक, तज्ज्ञांची किमान पंच्याहत्तर व्याख्याने होतील. या आगळ्या उपक्रमाचा ‘महाराष्ट्र टाइम्स’ मीडिया पार्टनर आहे. या उपक्रमाची ही ओळख...

अप्रकाशित हिऱ्यांना पैलू पाडणारी शाळा (The school that anvils undiscovered diamonds)

2
ग्रामीण किंवा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना शहरातील अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असते. किंबहुना ते अप्राप्य असल्याची जाणीवही मनात असते. उभरत्या मुलांच्या मनात कोणताही गंड राहू नये, या भावनेने त्यांना योग्य संधी, योग्य मार्गदर्शन देण्याची कळकळ शिक्षकांच्या मनात असेल, तर मुलामुलींचे निरोगी फुलासारखे फुलणारे व्यक्तिमत्त्व तयार होते. जितेंद्र पराडकर यांच्यासारखे शिक्षक पैसा-पैसा जमवून विद्यार्थ्यांसाठी ‘पैसा फंड कलादालन’ उभे करतात त्याची ही गोष्ट....