Home शिक्षकांचे व्यासपीठ

शिक्षकांचे व्यासपीठ

राज्यभर अमृतमहोत्सवी व्याख्याने – वैचारिक घुसळण (Ideological-awakening-on-august-15-across-maharashtra

महाराष्ट्रातील पाच संस्था एकत्र येऊन 15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन ते पुढील वर्षी 30 जानेवारी रोजी येणारा महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन या काळात राज्यभर वैचारिक जागरण करणार आहेत. या काळात राज्यभर विविध विषयांवर अभ्यासक, तज्ज्ञांची किमान पंच्याहत्तर व्याख्याने होतील. या आगळ्या उपक्रमाचा ‘महाराष्ट्र टाइम्स’ मीडिया पार्टनर आहे. या उपक्रमाची ही ओळख...

शिक्षण कशासाठी- हे समजेल का?

शिकवण्याची नव्हे तर शिकण्यासंबंधीची आव्हाने या शतकात वाढत जाणार आहेत. भारतीय शिक्षणव्यवस्था ‘टीचिंग’चा विचार करते; सगळा भर अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर असतो. विद्यार्थी काय व किती शिकला याचा विचार फारसा नसतो. त्याच्या शिक्षणाचे मूल्यमापन ज्या परीक्षांद्वारे होते त्याही कुचकामाच्या आहेत. शास्त्र, विज्ञान समजून घेणे खूप कठीण नाही, पण ते तसे सोपेदेखील नाही ! शिकणे याचा अर्थ पुस्तकातून माहिती गोळा करणे, दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे हा नव्हे ...

गणितप्रेमींचे नेटवर्क

लोक दिवसरात्र गणित करत असतात, परंतु त्यांना गणित नको असते. ते गणिताला घाबरतात. सत्तर टक्के तरी लोकांबाबत ते खरे आहे. मी एका शाळेत गणिताची...

बाबू मोरे : शाळेकडून गाव समृद्धीकडे (Babu More – School teacher aspires for Village...

बाबू चांगदेव मोरे हे पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील खोमारपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. बाबू मोरे यांनी ऑर्गेनिक शेतीचा प्रयोग उन्हाळ्याच्या दिवसांत ठिबक सिंचनाद्वारे विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेच्या प्रांगणात यशस्वी करून दाखवला.

बालरक्षक चळवळ : शिक्षणास शासनाची चालना (Balrakshak – Campaign to bring children to schools)

0
शाळा प्रगत करण्याच्या असतील तर अगोदर शंभर टक्के विद्यार्थी शाळेत दाखल झाले पाहिजेत, ते शाळा शाळांत टिकले पाहिजेत व शिकले पाहिजेत. लाखो शिक्षकांनी स्वयंस्फूर्तपणे ‘बालरक्षक’ बनून कार्य केले तर मुलांना शाळा शाळांत आणण्यात मोठ्या प्रमाणावर यश येऊ शकेल...

गणितप्रेमींचे नेटवर्क

गणिताची आवड मुला-पालकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी गणितप्रेमींचे नेटवर्क तयार करण्याची संकल्पना ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या पुढाकाराने प्रत्यक्षात आणली गेली आहे. मी त्या दिशेने एक...

मुराद बुरोंडकर यांचे आंबा संशोधन

0
मुराद महम्मद बुरोंडकर यांचे कर्तृत्त्व दापोलीत, विशेषत: कोकण कृषी विद्यापीठात बहरले; परंतु नियतीचा भाग असा, की मुराद बुरोंडकर यांनी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून 2021 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्याच वर्षी त्यांचे कोल्हापूर येथे आकस्मिक निधन झाले...

अप्रकाशित हिऱ्यांना पैलू पाडणारी शाळा (The school that anvils undiscovered diamonds)

2
ग्रामीण किंवा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना शहरातील अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असते. किंबहुना ते अप्राप्य असल्याची जाणीवही मनात असते. उभरत्या मुलांच्या मनात कोणताही गंड राहू नये, या भावनेने त्यांना योग्य संधी, योग्य मार्गदर्शन देण्याची कळकळ शिक्षकांच्या मनात असेल, तर मुलामुलींचे निरोगी फुलासारखे फुलणारे व्यक्तिमत्त्व तयार होते. जितेंद्र पराडकर यांच्यासारखे शिक्षक पैसा-पैसा जमवून विद्यार्थ्यांसाठी ‘पैसा फंड कलादालन’ उभे करतात त्याची ही गोष्ट....

शिक्षणातील क्रांतीचे पाऊल : ग्राममंगल (Grammangal- innovative educational method)

‘ग्राममंगल’च्या तीन शाळा ह्या नव्या शिक्षणपद्धतीचा ब्रँड आहेत. म्हणजे शिक्षणविषयाची ती संकल्पना जुनी आहे, पण सध्या त्यांबाबतचे औत्सुक्य वाढले आहे. त्या शाळा पाहण्याचा योग आला...

नाशिकच्या रेडिओवर अमेरिकी शाळा (US Marathi Schools have programme on Nasik Vishwas radio)

मी लॉकडाऊनच्या काळात रेडिओ विश्वास वर 'समन्वयक' म्हणून काम करू लागले. रेडिओ विश्वास हा कम्युनिटी रेडिओ आहे. तो मोबाईल अॅपद्वारे जगभरात कोठेही ऐकता येतो. त्याचे मुख्य केंद्र नाशिक येथे आहे.