Home वैभव प्राणीवैभव

प्राणीवैभव

जंगलचा कायदा ! अर्थात ‘जंगल का कानून’ (Laws of Jungle)

7
‘यहा जंगल का कानून नही चलेगा’, ‘जंगलराज’ किंवा कसला ‘जंगली’ माणूस आहे अशा संबोधनांनी जंगलांना आणि जंगलातील एकूणच व्यवस्थांना कोणी हिणवते, तेव्हा त्या माणसाच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते. खरे तर, जंगलांइतकी कायदा आणि सुव्यवस्था माणसांच्या दुनियेत क्वचितच पाहण्यास मिळते. मुख्य म्हणजे, जंगलातील हे कायदे-कानून गेली लाखो वर्षं अव्याहतपणे पाळले जातात...
पोळ्यासाठी सजवण्यात आलेला बैल

आठवणीतला खानदेशी पोळा

जळगावातल्‍या भडगाव तालुक्‍यातलं कोळगाव हे माझं गाव. लहानपणी गावात पाळली जाणारी बैलगाडं गावाबाहेर नेण्याची प्रथा मी पाहिली आहे. कित्येक वर्षांपासून चालू असलेली ही प्रथा गावातल्या एका वजनदार माणसाच्या सोयीसाठी अचानक मोडली गेली. पोळ्याला कोणी कोणता बैल धरायचा यावरून आम्हा भावंडांमध्ये भांडणं होत. सर्वांना आधी पळणार्‍या बैलाला धरायला आवडे. कोणी म्हातार्‍या बैलाला धरायला तयार नसे. कोण कोणता बैल धरणार हे ठरल्यावर जो तो आपापल्या बैलाकडे अधिक लक्ष देई. जो तो सालदारांनी कापून आणलेलं हिरवंगार लुसलुशीत गवत आपल्याच बैलांना अधिक टाके...

कासव महोत्सव – कोकणचे नवे आकर्षण ! (Kokan’s Turtle Festival)

कोकणात धार्मिक महोत्सव भरपूर. जुन्या प्रथा-परंपरा घट्ट रुजलेल्या. त्यात नव्या अभिनव अशा कासव महोत्सवाची गेल्या दोन दशकांत भर पडली आहे. तो महोत्सव नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांत साजरा होत असतो. ते कोकणचे नवे आकर्षण बनले आहे...

घोरपड

पाल, सरडा, घोयरा यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांशी घोरपडीचे नाते जवळचे आहे. तिला सरड्याची थोरली बहीणच म्हणायची! घोरपडीला इंग्रजीत ‘मॉनिटर लिझार्ड’ असेच म्हणतात. व्हॅरॅनस बेंगॉलेन्सिस (बेंगॉल मॉनिटर) ही घोरपडीची जात भारतात जवळजवळ सर्वत्र आढळते...
_waghbaras_san

वाघबारस – आदिवासींचे जीवन होते पावन!

दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ या दिवसापासून होते. परंतु आदिवासी भागात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’. आदिवासींच्या जीवनात त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तो त्यांनी वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा मोठा दिवस असतो. अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात तर ‘वाघबारस’ साजरी करण्याची परंपरा अनोखी आहे. आदिवासी बांधवांनी ती जपलीही नेकीने आहे. अकोले तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत...

अस्वल

अस्वलाला मराठीत भालू, रीस, नडघ, भल्ल, रिछ, तिसळ अशी नावे आहेत. संस्कृतमध्ये ऋक्ष म्हणजे अस्वल. त्याशिवाय अस्वल चालताना मागे वळून पाहते, म्हणून पृष्ठदृष्टिक; चिडले, की भयंकर ओरडते म्हणून दुर्घोष; तर त्याचे केस लांब व दाट असतात म्हणून दीर्घकेश अशीही नावे आहेत...
carasole

सांगलीचे सागरेश्वर अभयारण्य

सांगली जिल्ह्यात कराडपासून जवळ कृष्णा नदीच्या खो-यात असलेले सागरेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. भरपूर पडणारा पाऊस, धुकट वातावरण, वाहणारे गार वारे, हिरवागार...
-pakshinirikshan-uttamsadakal

पक्षी निरीक्षणाने ज्ञानकक्षा रुंदावल्या

करंजाळे गाव माळशेज घाटाच्या सुरुवातीला, निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे. चहुबाजूंना हिरवे हिरवे डोंगर, विशाल धरणाचा सहवास आणि त्या सर्वांना छेदत जाणारा नगर-मुंबई महामार्ग... त्या...
carasole

महाराष्ट्राचे मानचिन्ह – शेकरू

संडेच्या सुटीचा मूड. मस्त ताणून दिलेली. मोबाईलची ट्रिंग ट्रिंग वाजल्याने साखरझोप डिस्टर्ब झाली. मित्र बोलू लागला. ''फार बोअर झालोय यार. कुठेतरी जंगलात जाऊ भटकायला......
_SidhagiriMath_2.jpg

खेड्याचे दर्शन – कोल्हापूरचे सिद्धगिरी संग्रहालय (Siddhagiri Museum)

‘सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय’ म्हणजे कोल्हापुरातील कणेरी मठ. तेथे ग्रामजीवनाचे हुबेहूब दर्शन मॉडेल्समधून घडते. कणेरी हे गावाचे नाव आहे. कोल्हापूरच्या दक्षिणेला बारा किलोमीटर अंतरावर, राष्ट्रीय...