उमेश करंबेळकर
दिवटा
आदिमानवाने अग्नी निर्माण केला तेव्हा तो इतर प्राण्यांपासून वेगळा आणि श्रेष्ठ ठरला. त्याच वेळी,अग्नीमुळे मानव निसर्गापासून दूरही झाला. त्याने हळुहळू निसर्गव्यवहारात हस्तक्षेप सुरू केला. मानवाने प्रगती शिकार केलेले मांस अग्नीवर भाजण्यापासून ते अग्नीचा प्रकाशासाठी उपयोग करण्यापर्यंत साधली.
हातखंडा
काम हमखास पार पाडण्याचे कौशल्य अंगी असणे म्हणजे हातखंडा. तर हातखंड म्हणजे मधून मधून सोडवणूक करणारा, मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); तसेच अडल्यावेळी उपयोगी पडेल अशी व्यक्ती.
हळदिवी (Haldivi)
हळदिवा किंवा हळदिवी याचा शब्दकोशातील अर्थ हळदीच्या रंगाचा, पिवळा असा आहे. शब्द आरती प्रभू यांच्या कवितांमध्ये अनेकदा दिसतो. प्रामुख्याने ‘जोगवा’ या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये. हळदिवी हा शब्द किती वेगवेगळ्या संदर्भात आणि तरीही चपखलपणे त्या कवितांमध्ये आला आहे.
ख (Kha)
‘ख’ हे वर्णमालेतील एक अक्षर असले तरी ‘ख’ हा एकाक्षरी शब्दही आहे. ख म्हणजे आकाश. त्यावरून आकाशातील ग्रहांना खगोल आणि त्यांच्या अभ्यासाला खगोलशास्त्र असे म्हटले जाते. ‘ख’ म्हणजे आकाशात, ‘ग’म्हणजे गमन करणारा असा तो खग (पक्षी).
लसूण (Garlic)
कांदा आणि लसूण हे मराठी माणसाच्या जेवणातील दोन अविभाज्य घटक आहेत. लसणाचा ठेचा हा तर बहात्तर रोगांवर इलाज आहे. पुलंनी वर्णन केले आहे, ‘लसणाचा...
अक्षता
अक्षता हा शब्द सर्वांच्या अगदी चांगला परिचयाचा! लग्नाच्या वयाचा तरुण मुलगा किंवा मुलगी घरात असेल तर त्यांच्या डोक्यावर कधी एकदा अक्षता पडतात, अशी काळजी...
मेहनत
मेहनत म्हणजे कष्ट, श्रम; त्याचबरोबर मजुरी, कामधंदा असेही अर्थ त्या शब्दाचे आहेत. मेहनत हा शब्द खूप प्रयत्न, अभ्यास, रियाझ या अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ,...
जिमखाना
‘जिमखाना’ हा मराठी रोजच्या वापरातील शब्द आहे. जिमखाना म्हणजे ‘व्यायामशाळा’ किंवा विविध खेळ जेथे खेळले जातात अशी जागा, असा अर्थ व्यवहारात घेतला जातो. जिमखाना...
सातभाई
‘सातभाई’ हे एखाद्या पडेल हिंदी चित्रपटाचे नाव नाही तर ते एका पक्ष्याचे नाव आहे. इंग्रजीत त्याला कॉमन बॅबलर असे म्हणतात. सातभाईंना इंग्रजीत ‘सेव्हन सिस्टर्स’ असेही नाव आहे...
अस्वल
अस्वलाला मराठीत भालू, रीस, नडघ, भल्ल, रिछ, तिसळ अशी नावे आहेत. संस्कृतमध्ये ऋक्ष म्हणजे अस्वल. त्याशिवाय अस्वल चालताना मागे वळून पाहते, म्हणून पृष्ठदृष्टिक; चिडले, की भयंकर ओरडते म्हणून दुर्घोष; तर त्याचे केस लांब व दाट असतात म्हणून दीर्घकेश अशीही नावे आहेत...