उमेश करंबेळकर
छू
लहान मूल खेळताना पडले आणि त्याला खरचटले, तर ते मोठ्याने भोकांड पसरते. त्या वेळी मूल त्याच्यासमोर कोणी ‘आला मंतर, केला मंतर, जादूची कांडी छू.’ असे म्हणताच रडायचे थांबते. त्यांपैकी ‘छू’ हा मराठीतील एकाक्षरी शब्द आहे...
वागुर
पारध्यांच्या शिकारीच्या साधनांमध्ये ‘वागुर’ या साधनाचा उल्लेख येतो. वागुर, वागुरा, वागोरा, वागोरे, वागोऱ्या हे सर्व शब्द एकाच अर्थाचे असून पक्ष्यांना पकडण्याचे जाळे, पाश, बंधन...
शिकरण
पु.ल. देशपांडे यांनी ‘माझं खाद्यजीवन’ या लेखात ‘शिकरण’ या पदार्थाबद्दल असे म्हटले आहे, की ‘शिकरण ही तर आयत्या वेळी उपटलेल्या पाहुण्यांची बोळवाबोळव’. पुलंनी असे म्हणण्याचे कारण, स्वयंपाकघरातील करण्याला सर्वात सोपा पदार्थ कोणता असेल, तर तो शिकरण...
फालतू
‘फालतू’ हा मराठी भाषेत रोजच्या वापरातील शब्द आहे. तो ‘आजचा चित्रपट अगदीच फालतू होता’, ‘फालतू गप्पा मारू नको’, ‘अमूल्य वेळ फालतू गोष्टीत वाया घालवू नका’, ‘माझ्याशी फालतुपणा करू नको’ अशा अनेक वाक्यांतून नेहमी कानी पडत असतो. जवळ जवळ प्रत्येक व्यक्ती त्याचा वापर करत असते. ‘फालतू’ या शब्दाचे वाईट, बेकार, निरर्थक, वाह्यातपणा, चिल्लर, क्षुद्र, हलक्या प्रतीचे असे काही अर्थ होतात...
घोडे पेंड खाणे
पूर्वी तेलाचे घाणे असत. त्या घाण्यांवर शेंगदाणे, सरकी अशा तेलबियांपसून तेल काढले जाई. तेल काढल्यानंतर जो चोथा राहतो त्याला पेंड म्हणतात. शेंगदाण्याची पेंड फार...
बुंथ
‘बुंथ’ म्हणजे डोक्यावरून सर्व शरीरभर आच्छादनासाठी घेतलेले वस्त्र, ओढणी, खोळ; तसेच, बुरखा किंवा घुंगट. रूप किंवा वेष या अर्थानेदेखील ‘बुंथ’ हा शब्द वापरला गेलेला आढळतो. 'बुंथ' हा शब्द ज्ञानेश्वरीत 'आच्छादन' या अर्थाने आलेला आहे...
पाजवा
कोकणात एक प्रकारच्या उंदराला पाजवा म्हणतात. त्याचा अर्थ ‘साहित्य संस्कृती महामंडळा’च्या मराठी शब्दकोशात तसाच, शेतातील एक प्रकारचा उंदीर असा दिला आहे.
भारत हे घर-उंदराचे मूळ...
भारूड
संतांनी सर्वसामान्य लोकांना अध्यात्माची शिकवण सोप्या भाषेत देण्यासाठी ओवी, अभंग, भारूड अशा वेगवेगळ्या काव्यरचना केल्या. त्यांतील रूपकात्मक आणि जनसमुदायासमोर नाट्यमय रीतीने सादर केली जाणारी रचना म्हणजे भारूड. एकनाथपूर्व काळात ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी तर एकनाथांच्या पश्चात तुकाराम आणि रामदास यांनीही भारूडे रचली. असे असले तरी एकनाथांची भारूडे सर्वांत लोकप्रिय झाली. त्यामुळेच ‘ओवी ज्ञानेशाची’, ‘अभंग तुकयाचा’ तसे ‘भारूड नाथांचं’ असे म्हटले जाते...
लवथवती
‘लवथवती’ हा शब्द ‘लवथवणे’ या क्रियापदापासून तयार झालेला आहे. काही काही शब्दांना त्यांची स्वतःची लय असते. सळसळ, झुळझुळ, थुईथुई असे शब्द नुसते वाचले गेले तरी ती लय जाणवते. ‘लवथवती’ हा शब्ददेखील तसाच. शंकराच्या आरतीत तो येतो. शंकराच्या आरतीची सुरुवातच मुळी ‘लवथवती’ने होते...
शेपटावर निभावलं
एखादी व्यक्ती जर आश्चर्यकारक रीत्या फार मोठ्या अपघातात किरकोळ दुखापत होऊन वाचली तर त्या वेळी ‘जिवावर बेतलं पण शेपटावर निभावलं’ असे म्हटले जाते. हा वाक्प्रचार शारीरिक संकटाच्या प्रसंगातच दर वेळी वापरला जातो असे नाही...