हळदिवी (Haldivi)

1
135
हळदिवा किंवा हळदिवी याचा शब्दकोशातील अर्थ हळदीच्या रंगाचा, पिवळा असा आहे. शब्द आरती प्रभू यांच्या कवितांमध्ये अनेकदा दिसतो. प्रामुख्यानेजोगवाया काव्यसंग्रहातील कवितांमध्ये. हळदिवी हा शब्द किती वेगवेगळ्या संदर्भात आणि तरीही चपखलपणे त्या कवितांमध्ये आला आहे.
                        ‘हिरव्याशा गवतांत हळदिवीं फुले, हलकेच केसरांत दूध भरूं आले’ (गंध)
तर मिळालेले खूळया कवितेत पिकून पिवळ्या झालेल्या फळाचे वर्णन करताना तो असा आला आहे –
फळा हळदिव्या झाकी हिरवासा पंख

 

रस गळे.. करी चोंच लालसर डंख’.

 

मात्र कधी कधी अर्थ आकळत नाही जसे…

 

धुकें फेसाळ पांढरे दर्वळून दवे

 

शून्य शृंगारते आता होत हळदिवें
(शून्य शृंगारते) या शब्दाची नशा वाचकाला चढते. पण सर्वात भन्नाट म्हणजे
हळदीची पाने हळदिवी झाली,

 

कुठे कोण जाणे पिंगाळी पळाली’ (हिरव्या चुका)
हळदीच्या सुकलेल्या पिवळ्या पानांना हळदिवीची उपमा देणे म्हणजे थोरच. त्या कविता वाचल्यावर वाटते, की हळदिवी हा शब्द आरती प्रभूंचा. तो त्यांनीच वापरावा!मात्र तो शब्द आणखीही एका कवयित्रीने सुंदर वापरला आहे. त्या कवयित्री म्हणजे कविता महाजन. त्यानी त्यांच्या कुहूमध्ये तो योजला आहे.
                            मृदु मंद हळदिवी उन्हे जांभळा गर्द गारवा, अशा क्षणी झाडावर का पक्षी नवा उतरावा.
उमेश करंबेळकर 9822390810
umeshkarambelkar@yahoo.co.in
———————————————————————————————————————————-

About Post Author

Previous articleख (Kha)
Next articleहातखंडा
डॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9822390810

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here