फलटण तालुक्यातील सासकल हे एक छोटेसे गाव. त्या गावातील ग्रामस्थ ग्रामविकासाबाबत सजग आहेत. पारंपरिक धर्मभावनेला आधुनिक विचारांची जोड देणाऱ्या सासकल या गावाने त्याचा ठसा क्रीडा क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला आहे...
निसर्गसौंदर्याने नटलेले अंजनवेल गाव पर्यटकांना जास्त आकर्षित करते, ते गावातील गोपाळगड, दीपगृह व श्री टाळकेश्वर मंदिर या स्थळांमुळे ! गावाला लाभलेला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, मनाला भुरळ घालणारा समुद्र व आजुबाजूचा विलोभनीय परिसर शब्दातीत आहे…
राजाळे गाव सातारा जिल्ह्यात फलटणपासून पूर्वेला बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव सधन व विकसनशील आहे..समाजप्रबोधन हेच ब्रीद मानून वैचारिक परंपरा असलेले गाव म्हणून राजाळे गाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे...
इंदापूर हे प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचे जन्मगाव. ते ऐतिहासिक महत्त्व असलेले पुणे जिल्ह्यातील सुंदर शहर. बालुशाहीसारखा दिसणारा खाजा, तिखटामध्ये केवळ वासाने भूक लागल्याची जाणीव करून देणारी पुरी भाजी आणि उजनी धरणाच्या गोड्या पाण्यातील मासे हे या शहराचे आकर्षण...
मोराणे सांडस हे माझे आजोळ; म्हणजे मामाचे गाव. ते नाशिक जिल्ह्याच्या सटाणा (बागलाण) या तालुक्यात आहे. मोराणे हे फड बागायती असणारे संपन्न गाव होते. हे टुमदार खेडे मोसम नदीच्या तीरावर वसले आहे. ते सटाणा या तालुक्याच्या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे...
मसुरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील गाव. गाव मालवणपासून सतरा किलोमीटरवर आहे. त्या गावाला छान निसर्गरम्य परिसर लाभला आहे. मशहूर या नावाचे हे गाव...
नेहरोली हे गाव पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील दक्षिण सीमेवर वसलेले आहे. ते पालघर जिल्ह्याच्या ठिकाणापासून साधारण साठ किलोमीटरवर येते. गाव आहे निसर्गरम्य, परंतु औद्योगिकीकरण आणि दळणवळणाच्या सोयी यांमुळे गावाचा विकासही साधला गेला आहे.
निंबळक हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यात वसलेले गाव. ते पुणे-पंढरपूर महामार्गापासून तीन किलोमीटर आणि फलटणपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या चार हजारांच्या आसपास. निंबाळकर हे निंबळक गावातील प्रसिद्ध घराणे...