Home गावगाथा

गावगाथा

बागणी, काकाचीवाडी – एकत्र आणि विभक्त !(Communal harmony is the common feature of two...

12
काकाचीवाडी या माझ्या गावाचा इतिहास बागणी गावाशी जोडलेला आहे. काकाचीवाडीहे गाव पूर्वी वेगळे, स्वतंत्र नव्हतेच. बागणीमध्ये काकाचीवाडी, फाळकेवाडी, चंदवाडी, रोजावाडी व पांढरमळा ही गावे एकत्रित होती. ती गेल्या चार दशकांत स्वतंत्र झाली आहेत. ती सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यात, कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेजवळ आहेत.

जाल तुम्ही जालगावी सुज्ञ बनोनी!

दापोली-जालगावची हनुमान जयंती भैरी देवाच्या जत्रेने मोठी होते. त्या ठिकाणी जालगाव, गव्हे आणि गिम्हवणे अशा तीन गावांचे मनोमिलन होते ! दोनशे वर्षांची ही केवढी थोर परंपरा आहे. एरवीही दापोलीचे उपनगर असे जालगाव गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढले आहे. बारा वाड्या आणि तीस नगरे असा त्याचा पसारा झाला आहे...

ऐतिहासिक वारसा असणारे मुंगी गाव

गोदावरी नदीकाठी गोदा संस्कृतीचा उदय झाला व तेथे अनेक गावे वसली. त्या गावांना धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक महत्त्व आहे. मुंगी गाव त्यापैकी एक. त्याच्या एका बाजूला शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे पैठण, तर दुसऱ्या बाजूला संत शिरोमणी ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आपेगाव आहे. मुंगी गावाला पूर्वीच्या काळी पैठण शहरासारखे महत्त्व होते...

करावेगावाचे झाले सीवूड

करावेगाव हे ठाणे जिल्हा आणि ठाणे तालुका यांच्या दक्षिण टोकाला आहे. गावाच्या पश्चिमेस ठाणे खाडी तर दक्षिणेस पनवेल खाडी येते. करावेगाव हा संपूर्ण आगरी समाजाचा गाव होता. ते लोक खाडीत मासेमारी करत असत. तेथे कोलंबी, बोईस, चिंबोरी, जिताडा, कोत, पाला असे चवदार मासे आणि खेकडे मिळत. गावकरी कष्टकरी होते. ते चारपाच मैल अंतर सहज कशासाठीही चालत जात असत. करावेगावाच्या पाठीमागून ‘पाम बीच’ हायवे गेला आहे. सिडको प्रशासनाने बेलापूर आणि करावेगाव यांच्यामधील खाडीकिनारी आधुनिक जेटी तयार केली आहे. तेथून खाडीमार्गे जलवाहतूक होईल असे अपेक्षित आहे. करावेगावाच्या ईशान्य भागात ‘सीवूड’ रेल्वेस्थानक आहे...

अंजनवेलचे निसर्गसौंदर्य (Anjanvel the Beautiful natural Konkan Town)

निसर्गसौंदर्याने नटलेले अंजनवेल गाव पर्यटकांना जास्त आकर्षित करते, ते गावातील गोपाळगड, दीपगृह व श्री टाळकेश्वर मंदिर या स्थळांमुळे ! गावाला लाभलेला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, मनाला भुरळ घालणारा समुद्र व आजुबाजूचा विलोभनीय परिसर शब्दातीत आहे…

बदनापूर तालुका: महाराष्ट्राचा मध्य

बदनापूर हा जालना जिल्ह्यातील एक तालुका. बदनापूर हे जालन्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. जालना जिल्हा मोसंबी फळासाठी राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे बदनापूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रात कडधान्याच्या वेगवेगळ्या जातींची बियाणी यांबाबत संशोधन चालते. त्या संशोधन केंद्राचे नाव कृषी क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जाते...

चौऱ्याऐंशी गावांची मालकीण – झोलाईदेवी

झोलाईदेवीचे प्रसिद्ध मंदिर दापोली तालुक्याच्या माटवण या गावी आहे. झोलाईदेवीला दापोली, मंडणगड आणि खेड या तीन तालुक्यांतील चौऱ्याऐंशी गावांची मालकीण म्हणून संबोधले जाते. झोलाईदेवीचा उत्सव होळी पौर्णिमेला धुमधडाक्यात साजरा केला जातो. कोकणात पहिली होळी फाल्गुन शुक्ल पंचमीला पेटवली जाते. झोलाईदेवीची पालखी त्यानंतर सहाव्या दिवशी माटवणमधील मंदिरातून निघते...

लिंगा गावचे अवधुत पंथी स्तंभ !

लिंगा गाव यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यात आहे. लिंगा-बोरगाव हे जोडगाव आहे, दोन्ही गावांची ग्रामपंचायत एक आहे – बोरगावचे सहा आणि लिंगाचे चार सभासद निवडले जातात. अधिकतर बोरगावचा सरपंच असतो. परंतु ती पोटगावे एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. लिंगा वेगळे आणि बोरगाव वेगळे. लिंगाची लोकवस्ती साडेतीनशे. बोरगावची लोकवस्ती बाराशेच्या आसपास आहे...

तोरणमाळ: खानदेशचे सौंदर्य! (Toranmal : Hill Station From Khandesh)

तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे पर्यटनस्थळ. महाबळेश्वर हे पहिले. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्याच्या शहाद्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वतात आहे. ते धडगाव तालुक्यात येते. ते नंदुरबारपासूनपंच्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे...

बालंबिका देवीचे बालमटाकळी

0
बालमटाकळी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व टोकाला वसलेले जुने गाव. त्या गावाला पूर्वी टाकळी किंवा बोधेगाव-टाकळी असे म्हटले जात असे. त्या शेजारीच बोधेगाव आहे. त्या गावाचे हे जोडगाव गणले जाई. गावाचे ग्रामदैवत बालंबिका देवी. तिच्या नावावरून त्या गावाला बालमटाकळी म्हणू लागले...