Home गावगाथा

गावगाथा

इंदापूर – इतिहासातच राहिलेले शहर (Indapur Still Lives in History)

इंदापूर हे प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचे जन्मगाव. ते ऐतिहासिक महत्त्व असलेले पुणे जिल्ह्यातील सुंदर शहर. बालुशाहीसारखा दिसणारा खाजा, तिखटामध्ये केवळ वासाने भूक लागल्याची जाणीव करून देणारी पुरी भाजी आणि उजनी धरणाच्या गोड्या पाण्यातील मासे हे या शहराचे आकर्षण...

पर्वतातील गाव – वसईचे गिरीज !

गिरीज हे पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नयनरम्य ठिकाण. तेथे बऱ्याच टेकड्या पोर्तुगीजपूर्व काळात होत्या. काही उंच, काही ठेंगण्या. त्या सर्व लहानमोठ्या टेकड्यांमध्ये वसलेले गाव म्हणून त्याचे नाव गिरीज. ‘गिरी’ म्हणजे पर्वत आणि ‘ज’ म्हणजे जन्मलेले. पर्वतातील गाव गिरीज ! पोर्तुगीज वसाहतवादी वसईत सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी आले. त्यांनी शेषवंशी क्षत्रिय भंडारी भोंगाळे राज्याची वसई खाडीवरील गढी जिंकली. पोर्तुगीज सोजिरांची नजर आजुबाजूच्या गावांवरही गेली. त्यांतील एक गाव गिरीज...

धरणगाव – बाजार व संस्कृती यांनी उत्सव संपन्न ! (Dharangaon – can culture prevail...

धरणगाव हे शहरवजा गाव जळगाव जिल्ह्याच्या मूळ एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठे गाव होय. ते मोठे असल्यामुळे, खरे तर, धरणगाव हेच तालुक्याचे गाव वाटे. त्याप्रमाणे एरंडोल तालुक्याचे विभाजन 2008 मध्ये होऊन स्वतंत्र धरणगाव तालुका अस्तित्वात आला. धरणगावची नगरपालिका 1867 मध्ये स्थापन झाली होती...

ऐसे उगार माझे गाव ! (Ugar – My town)

उगार खुर्द हे भूतपूर्व सांगली संस्थानातील छोटेसे खेडेगाव. गाव स्वतंत्र भारतात गेल्या पाऊणशे वर्षांत पूर्ण पालटून गेले आहे. मूलत: दक्षिणवाहिनी असणारी कृष्णा नदी उगारजवळ उत्तर वाहिनी होते. अशा वळणाला तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळे नदीला प्रशस्त दगडी घाट वरपासून खाली, अगदी पात्राच्या मध्यभागापर्यंत आहे. शंभर वर्षे झाली तरी त्या घाटाचे बांधकाम अभंग आहे. उगार खुर्दला भाषिक सलगतेच्या तत्त्वावर सीमेलगतचे गाव म्हणून राज्य सरकारने भाषिक सवलती दिल्या आहेत...

पिंपळवाडीची झाली साखरवाडी – सारे गोड गोड ! (Sakharwadi – Village transformed by private...

साखरवाडी हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील गाव. महाराष्ट्रातील पहिला आपटे यांच्या मालकीचा खासगी साखर कारखाना म्हणून साखरवाडीच्या कारखान्याची नोंद आहे. गावाची क्रीडाक्षेत्रामधील कामगिरी उल्लेखनीय आहे. हे गाव खो-खो या खेळाची पंढरी म्हणून ओळखले जाते. या गावातील खो खो संघाचा दबदबा व दहशत कित्येक वर्षे महाराष्ट्रात होती. देशपातळीवरील सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या संघात साखरवाडीच्या संघातील कमीत कमी दोन खेळाडू असतातच !

ढवळगाव – पैलवानांचे गाव (Dhaval Village – Famous for Wrestlers)

0
‘ढवळ’ हे गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले आहे. ते गाव फलटण-पुसेगाव राज्य महामार्गावर फलटणपासून एकोणीस किलोमीटर अंतरावर येते. ढवळगावाला कुस्तीची परंपरा मोठी आहे. हे गाव पैलवानांचे गाव म्हणूनच प्रसिद्ध आहे. गावातील काही मल्लांनी महाराष्ट्र चॅम्पियन हा किताबदेखील मिळवला आहे. माणदेशच्या इतिहासात प्रथम ‘महाराष्ट्र केसरी’ ही मानाची गदा सातारा जिल्ह्याला मिळवून देणारे पैलवान बापूराव लोखंडे हे ढवळ गावच्या मातीतले वीर...

ऐतिहासिक वारसा असणारे मुंगी गाव

गोदावरी नदीकाठी गोदा संस्कृतीचा उदय झाला व तेथे अनेक गावे वसली. त्या गावांना धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक महत्त्व आहे. मुंगी गाव त्यापैकी एक. त्याच्या एका बाजूला शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे पैठण, तर दुसऱ्या बाजूला संत शिरोमणी ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आपेगाव आहे. मुंगी गावाला पूर्वीच्या काळी पैठण शहरासारखे महत्त्व होते...

बालंबिका देवीचे बालमटाकळी

0
बालमटाकळी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व टोकाला वसलेले जुने गाव. त्या गावाला पूर्वी टाकळी किंवा बोधेगाव-टाकळी असे म्हटले जात असे. त्या शेजारीच बोधेगाव आहे. त्या गावाचे हे जोडगाव गणले जाई. गावाचे ग्रामदैवत बालंबिका देवी. तिच्या नावावरून त्या गावाला बालमटाकळी म्हणू लागले...

वर्ध्याचे पुलगाव : माझे माहेरगाव (Pulgaon of Wardha – My childhood)

माझे पुलगाव हे माझ्या जिवाभावाचे गाव. या गावाशी असलेले माझे नाते अजोड आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे त्या गावाने पाहिले आहेत. माझे लहानपण, शिक्षण, लग्न या महत्त्वपूर्ण दिवसांचे ते साक्षीदार आहे. म्हणूनच पुलगाव सोडून पन्नास वर्षे झाली तरी त्या गावाशी असलेली माझी नाळ तुटलेली नाही. त्या गावाने मला आयुष्यभराचा लळा लावला आहे. ‘सेंट्रल अॅम्युनेशन डेपो’ हे पुलगावचे वैशिष्ट्य आहे. त्या डेपोमुळे गाव प्रसिद्धीच्या झोतात आले...

पैठणीचे गाव- येवला (Yeola)

महाराष्ट्रातील अनेक गावांना वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत. तेथे विशेष उद्योग व्यवसाय आहेत. या गावांच्या अंतरंगात शिरले की त्यांच्या भरजरी पोताची जाणीव होते. असेच एक वैशिष्ट्यपूर्ण गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यातले – येवला. ते महाराष्ट्रातीलच नाही तर देश-विदेशातील महिलांच्या जिव्हाळ्याचे गाव. स्वातंत्र्य चळवळीत या गावाचा महत्त्वाचा सहभाग होता. माधव सावरगावकर हे प्रथितयश लेखक मुळचे येवल्याचे. त्यांनी त्यांच्या गावाचा इतिहास आणि वर्तमान जिव्हाळ्याने या लेखात सांगितला आहे...