Home Authors Posts by चैतन्य पवार

चैतन्य पवार

1 POSTS 0 COMMENTS
चैतन्य पवार हे साखरवाडी या गावचे. त्यांनी पुण्यातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि ते पुण्यातच नोकरी करत आहेत. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत (NSS) काम करताना पुण्यात पोलिस मित्र म्हणूनही काम केले आहे. त्यांची वाचनाची आवड घरात आध्यात्मिक वारसा लाभल्याने आणि वडील कीर्तनकार असल्याने लहानपणापासून जोपासली गेली. ते छंद म्हणून ‘प्रतिलिपी’ या वेबपोर्टलवर लेखन करतात.

पिंपळवाडीची झाली साखरवाडी – सारे गोड गोड ! (Sakharwadi – Village transformed by private...

साखरवाडी हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील गाव. महाराष्ट्रातील पहिला आपटे यांच्या मालकीचा खासगी साखर कारखाना म्हणून साखरवाडीच्या कारखान्याची नोंद आहे. गावाची क्रीडाक्षेत्रामधील कामगिरी उल्लेखनीय आहे. हे गाव खो-खो या खेळाची पंढरी म्हणून ओळखले जाते. या गावातील खो खो संघाचा दबदबा व दहशत कित्येक वर्षे महाराष्ट्रात होती. देशपातळीवरील सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या संघात साखरवाडीच्या संघातील कमीत कमी दोन खेळाडू असतातच !