खंडाळा घाटातील आडवाटा, गडकिल्ले

मुंबई-पुणे प्रवास करत असताना खंडाळा घाटातील सौंदर्य कोठल्याही ऋतूत नेहमीच भुरळ घालते. विशेष करून रेल्वेने प्रवास करत असताना घाटात सामोऱ्या येणाऱ्या सह्याद्रीच्या भव्यतेच्या जाणिवेने मन हरखून जाते. मी हा प्रवास खूपदा केला आहे. त्या प्रवासात ठाकूरवाडी, मंकी हिल, नागनाथ, जामरुंग अशी रेल्वेची लहानशी उपस्थानके किंवा तांत्रिक थांबे आहेत. दुर्गम घाटात, जंगलात त्या स्थानकांचे प्रयोजन काय हा प्रश्न पडत असे. घाटात बोगद्याच्या डोंगरावर एक गुहा आहे. त्या गुहेत नागनाथाचे छोटेसे देऊळ आहे. घाट परिसरातील दुर्गवैभव म्हणता येईल अशा राजमाची किल्ला, ढाक किल्ला, नागफणी डोंगर या सर्वश्रुत ठिकाणी तर गेलो; तसेच, त्या परिसरातील आडवाटा जिज्ञासेपोटी पालथ्या घातल्या...

सातवाहन – महाराष्ट्रातील पहिले राजघराणे

1
सातवाहन हे महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले राजघराणे. त्यांचा कार्यकाळ इसवी सनपूर्व 235 ते इसवी सन 225 पर्यंतचा आहे. साधारणतः साडेचारशे वर्षे. सिमुक या सातवाहन राजाने त्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली तर त्याचा पुत्र सिरी सातकर्णी या कर्तृत्ववान राजपुरुषाने घराण्याला सम्राटपद मिळवून दिले. सातवाहन घराण्याच्या सिमुक सातवाहनानंतर राजगादीवर आलेला हा दुसराच राजा होता. असे असताना त्याने त्याच्या कर्तृत्वाने घराण्याला सम्राटपद मिळवून दिले. राजाचे कर्तृत्व नागनिका राणीने कोरवून घेतलेल्या नाणेघाट लेण्यातून कळते. सातकर्णी राजाची राणी ‘नागनिका’ ही त्या काळातील पहिली कर्तबगार ज्ञात स्त्री...

दक्षिण सोलापुरातील शिवक्षेत्रे- सोमेश्वर, संगमेश्वर, रामलिंगेश्वर, शंभू महादेव, नागनाथ

शिवक्षेत्रे दक्षिण भारतात, खास करून महाराष्ट्रात अधिक पाहण्यास मिळतात. धारणा अशी आहे, की जेथे जेथे शिवलिंगांची स्थापना झालेली आहे ती सर्व क्षेत्रे संवेदनशील भूभागावर वसलेली आहेत. म्हणजे ज्वालामुखीची तोंडे किंवा भूकंपप्रवण क्षेत्रे. शिवमंदिरातील शांत गंभीरता भक्तांना शिवाच्या चरणी लीन होण्यास भाग पाडण्याइतकी प्रभावी असते. सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यात मागील एक हजार वर्षांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक वारसा जपून शिल्लक राहिलेला दिसतो. त्याचाच एक भाग म्हणजे तेथील आगळीवेगळी शिवतीर्थे...

मुरुडचे दुर्गादेवीचे विलोभनीय मंदिर (Murud: Beautiful Temple of Goddess Durga)

1
दुर्गेच्या संरक्षक रूपाची उपासना सर्वत्र केली जाते. मुरुडच्या दुर्गादेवीच्या देवळाची कथा तशीच आहे. मुरुड गाव गंगाधर भट नामक सिद्धपुरुषाने कोकणातील दापोली तालुक्यात वसवले. तशी बखर आहे. गंगाधर भट समुद्रकाठाकाठाने सोळाव्या शतकात सौराष्ट्रातून आले होते. मुरुडमध्ये वसाहत करताना दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता अशी रचना झाली. मंदिरे स्थापन झाली. तरी एक भय राहिले. कोकण किनारपट्टीमधील गावांवर सागरी चाच्यांच्या आक्रमणाचे सावट असे. गावे लुटली जात. म्हणून रक्षणकर्त्या दैवताचे सान्निध्य गावकऱ्यांना धैर्य देईल या कल्पनेने दुर्गा देवीचे मंदिर गावात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन केले...

मुरुडचा भूलभुलैया चौक (Murud’s 400 year old Magic Square)

गावात, शहरात चौक असतात. पण एखाद्या गावात चौकटीत किंवा चौकाच्या व्याख्येत न बसणारा असा; तरीही तो चौकच असतो, हे वाचून अचंबा वाटेल. असा चौक आहे दापोली तालुक्यात मुरुड या गावी. मुरुड हे टिंबाएवढे गाव. नकाशात त्याचे अस्तित्व ते काय दिसून येणार ! परंतु त्या गावाची ख्याती ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वेगळेपणामुळे सर्वदूर पोचली आहे. गावाची रचना विचारपूर्वक करण्यात आली असल्याचे जाणवते. दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची ही रचना स्वत:चे रूप अजूनही टिकवून आहे...

एकसरचे वीरगळ (Hero Stones of Eksar)

दहिसर बोरिवलीच्या दरम्यान एकसर नावाचे खेडे होते. आजही त्याला एकसर व्हिलेज अशे म्हणतातपण त्यात खेडे असण्याच्या  कुठल्याही खूणा दिसत नाहीत. अशा या ठिकाणी सहा...

‘कोर्सले’चा झाला ‘सह्याद्री’ आणि ‘डनवेगन’ चा ‘वर्षा’ (Corsley and Dunvegan Bungalows)

मुंबई बेटाच्या गेल्या दोन-तीन शतकांचा इतिहास मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर लपलेला आहे. शोधणाऱ्याला तो सापडतो.  हे शोधकार्य रोमांचक आणि मनोरंजक तर आहेच पण त्यातून ज्ञान आणि...

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम (Dr. Bhau Daji Lad Museum- Glorious...

म्युझियम्स म्हणजेच वस्तुसंग्रहालये ही अनौपचारिक शिक्षणाची साधने असतात. समाजाच्या कर्तृत्वाची ओळख असतात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा सोपवण्याचे साधनही असतात. कलेतिहासाच्या अभ्यासक असलेल्या शर्मिला फडके क्रमश: मुंबईतील म्युझियम्सची आणि कलादालनांची ओळख करून देणार आहेत. त्यापैकी एक डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम. हे मुंबई शहरातील पहिले म्युझियम. ते काही काळ विस्मरणात जाऊन आता पुन्हा नव्या झळाळीने उभे राहिले आहे...

मुंबई नगरीतील महापालिका (Brihanmumbai Mahanagarpalika Building in Mumbai)

1
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लांबलचक नावाच्या रेल्वेस्टेशनवर पहिल्यांदा उतरणारा माणूस अनेक गोष्टींना बिचकतो, चकित होतो. मग ती त्या स्टेशनची भव्य इमारत, तिथली गर्दी असो की स्टेशनबाहेर पडल्यावर दिसणारी मुंबई महापालिकेची इमारत ! स्टेशनच्या दोन्ही दिशांना अनेक वारसा इमारती म्हणजे हेरिटेज बिल्डिंग्ज आहेत, ज्या आवर्जून बघायला हव्यात. त्यातील अनेक इमारतींमध्ये सर्वसामान्य मुंबईकर काम करत असतात पण ते रोजच्या जगण्याच्या लढाईत इतके गुंतलेले असतात की स्वतःच्या कार्यालयाची इमारतही ते साक्षेपाने बघत नाहीत. ‘मुंबई नगरीतली महापालिका’ या लेखात मुंबई महापालिकेच्या भव्य ऐतिहासिक इमारतीचा इतिहास आणि वर्तमान स्थिती याविषयी माहिती दिली आहे...

माझी मुंबई (My Mumbai)

1
मुंबई शहराच्या पोटात अनेक मुंबई आहेत. संध्याकाळच्या समुद्रावर दिव्याच्या लखलखटाने उजळलेली मुंबई, उदास काळोखात तेवणारी मुंबई आणि अंधारात बुडून गेलेली भयावह मंबई यांची प्रतिबिंबे तरंगत असतात. त्यांची आपापसात सरमिसळ होत असते. अशी ही मायारूपिणी मुंबई हेच अनेकांचे ‘गाव’ असते. त्याचा इतिहास, भूगोल आणि वर्तमान प्रत्येकाला आपापल्या नजरेतून दिसतो. अशा या ‘गावाची’ विविध रूपे एकत्र करून एक कोलाज तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी मानस आहे...