dnyaneshwari

ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari)

1
‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार लेणे’ असे संबोधतात. ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवदगीतेवर लिहिलेली टीका होय. त्या टीकाग्रंथात सुमारे नऊ हजार ओव्या आहेत. भगवदगीतेतील तत्त्वज्ञान त्यात उपमादृष्टांताच्या आधारे सुलभतेने सांगितले आहे. आध्यात्मिक विषयाचे काव्यमय विवेचन या दृष्टीने तो ग्रंथ लोकोत्तर मानावा लागेल...

निंबाळकर घराणे : सत्तावीस पिढ्यांची कारकीर्द (Dynasty of the Nimbalkars)

फलटण हे फक्त चौऱ्याऐंशी गावांचे संस्थान. आकाराने आटोपशीर; परंतु त्याचा मान आणि दबदबा मोठा होता. फलटणमध्ये नाईक-निंबाळकर घराण्याची सत्ता सातशे वर्षे निरंकुशपणे होती. त्या राजघराण्याने एकूण सत्तावीस पिढ्यांच्या राज्यकर्त्यांची वैभवशाली कारकीर्द घडवली. प्रजाप्रिय घराणे म्हणून त्यांची ओळख होती. नाईक-निंबाळकर घराण्याचे मूळ इतिहासात नवव्या शतकात सापडते...

रंगो बापूजी गुप्ते (Rango Bapuji Gupte)

काही नावांपुढे विशेषणे लावायची काहीच आवश्यकता नसते. रंगो बापूजी गुप्ते हे त्यापैकीच एक नाव आहे. साताऱ्याच्या गादीचे छत्रपती प्रतापसिंह यांच्यावर ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या अन्यायाविरुद्ध इंग्लंडमध्ये जाऊन सनदशीर मार्गाने लढणारे छत्रपतींचे वकील म्हणून रंगो बापूजी प्रसिद्ध आहेत. छत्रपतींच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाचाही दावा त्यांनी लावून धरला. चौदा वर्षे लढा देऊनही अपयश आल्यावर सनदशीर मार्ग सोडून देऊन त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग धरला...
_Faizpur_Village_7.jpg

फैजपूरचे काँग्रेस अधिवेशन

इंडियन नॅशनल काँग्रेसचे पन्नासावे अधिवेशन 27 आणि 28  डिसेंबर 1936 रोजी 'बॉम्बे प्रेसिडेन्सी'च्या  (महाराष्ट्र) जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील फैजपूर येथे झाले  होते. त्यात शेतकरी...
-athavniche-pakshi

आठवणींचे पक्षी- भुकेची आग (Athvaninche Pakshi)

‘आठवणींचे पक्षी’ हे प्र.ई. सोनकांबळे यांचे आत्मकथन आहे. लेखक दलित समाजात जन्माला आल्यामुळे जे दुःख, दारिद्र्य व अपमान त्याच्या वाट्याला आला त्याचे चित्रण त्या आत्मकथनात आले आहे. लेखकाच्या बालपणापासून त्याचा प्राध्यापक होण्यापर्यंतचा प्रवास पुस्तकात येतो...

मराठा घराण्यांची ऐतिहासिक नाणी

1
इतिहासात अनेक मराठा पराक्रमी घराणी होऊन गेली. मध्ययुगातील इतिहासप्रसिद्ध म्हणजे यादव राजघराणे. ते देवगिरी येथून राज्य करत होते. यादव राजवंशाची नाणी मुख्यतः सोने या धातूमध्ये आढळून येतात. यादवकालीन नाण्यांचे धातूची शुद्धता हे वैशिष्ट्य दिसून येते. त्यांनी चांदी व काही प्रमाणात तांबे या धातूंमध्येही नाणी पाडली...
carasole

भातवडीची लढाई – गनिमी काव्याचा श्रीगणेशा

अहमदनगरमधील दौला-वडगाव गावाजवळ असलेल्या भातवडी या गावी मेहेकर नदीच्या काठी जुने नरसिंह मंदिर आहे. विस्तृत जागेत असलेल्या त्या मंदिराच्या भोवती दगडी चिरेबंदी भिंत आहे....

बेलासीस रोड

स्थानिक इतिहास ही इतिहासाच्या अभ्यासाची महत्त्वाची शाखा आहे. मुंबईच्या इतिहासाचा विविध अंगांनी अभ्यास करणारी काही पुस्तके इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती या भाषांमध्ये गेल्या दहा वर्षांत आली आहेत. तरुण अभ्यासक पुढे येत आहेत. अनेक मनोरंजक कथा समोर आल्या आहेत. ‘मोगरा फुलला’ या दालनात वेगवेगळे लेखक ‘ये है मुंबई मेरी जान’ या सदरामध्ये मुंबईविषयी लेख लिहितील. यांतील पहिला लेख नितीन साळुंखे यांचा...
carasole1

माढ्याचे विठ्ठल मंदिर आणि मूळ मूर्तीचा वाद

10
पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती खरी की पंढरपूरजवळच्या माढा गावातील? या डॉ.रा.चिं. ढेरे यांच्या संशोधनावरून ऐंशीच्या दशकात मोठा वाद झाला, पण खऱ्या विठ्ठलभक्ताला त्या वादात रस नाही....
_Sangam_Mahuli_1.png

संगम माहुली

1
संगम माहुली या गावी मराठा इतिहासाच्या खुणा आढळतात. ते ठिकाण साताऱ्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. ते कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर असल्यामुळे त्या गावाचे दोन भाग पडतात - अलीकडे 'संगम माहुली' आणि पलीकडे 'क्षेत्र माहुली'. छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत...