Tag: Dabhol
दाभोळचे बिनखुर्चीचे डॉक्टर मधुकर लुकतुके (Dabhol’s Doctor Madhukar Luktuke)
डॉ. मधुकर लुकतुके यांचा दाभोळचा दवाखाना गेल्या सहा दशकांपासून चालू आहे. दाभोळ पंचक्रोशीतील रहिवासी वैद्यकीय उपचार आणि सल्ला यांसाठी त्यांच्याकडे एखाद्या पर्यटन स्थळाप्रमाणे सहकुटुंब गर्दी करतात. वैद्यकीय पर्यटन ही संकल्पना बहुदा तेथे जन्माला आली असावी ! डॉक्टर हे माझे आजोबा. आम्ही त्यांना ‘जोजो’ म्हणतो. जोजोंनी मेडिकल ऑफिसर म्हणून ‘पोस्टिंग’ मुद्दाम लहानशा खेड्यात मागून घेतले. असे ते 1960 साली दाभोळला पोचले आणि तेथीलच झाले...
सामाजिक दायित्व जपणारी दापोली अर्बन बँक (Dapoli Bank – An institute that belongs to...
दापोली अर्बन सहकारी बँकेची स्थापना 29 फेबुवारी 1960 रोजी झाली. बँक स्थापनेमागे उद्देश दापोली शहराच्या व्यापाराची व सर्वसामान्य माणसाची आर्थिक गरज भागवावी आणि शहराचा विकास साधावा हा होता. दापोली तालुक्याेत कोकण कृषी विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, सायन्स-आर्टस् कॉलेज अशा विविध शैक्षणिक सुविधा बनत गेल्या. मात्र तरी दापोलीच्या तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुणे-मुंबई यांसारख्या शहरांकडे जावे लागे. ती उणीव बँकेने हेरली व सदतीस लाख रुपये एवढी देणगी देऊन दापोली अर्बन सिनिअर सायन्स कॉलेजची स्थापना केली !
दापोलीतील सर्पसृष्टी (Serpents in Dapoli)
दापोली हा डोंगराळ व वनसृष्टीने बहरलेला तालुका असल्याने तेथील रहिवाशांना सर्पसृष्टीचा सहवास व भीतीही सतत राहिलेली आहे. भारताची जीवनशैली निसर्गानुकूल असली तरी वनस्पती व प्राणी सृष्टीविषयी लोकांमध्ये खास प्रेम, आस्था दिसून आली नव्हती. ती पर्यावरणीय जाणीव आधुनिक काळात आली व पसरत गेली. तशी ती दापोलीतही तीन दशकांपूर्वी सारंग ओक यांच्या निमित्ताने आली. ते व्यवसायानिमित्ताने आले आणि त्यांनी तेथे सरपटणारे प्राणी वनसृष्टीत पुन्हा सोडण्याची गरज पटवून दिली आणि बघता बघता त्यांची सर्पमित्रांची ‘टीम’ जमली. त्यात किरण करमरकर, सुरेश खानविलकर, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि अरविंद व अनुप देशमुख हे पितापुत्र अशी पाच-सात मंडळी उत्तम तयार झाली...
दापोलीतील पाखरपहाट
मी दापोलीत 1996 मध्ये स्थिरावलो. मी राहतो त्या दापोलीच्या ‘वडाचा कोंड-लालबाग’ परिसरातील पाखरांची संख्या व विविधता गेल्या पंचवीस वर्षांत कमी होत गेली आहे, कारण झाडांची संख्या कमी झाली आहे ! आमच्या सोसायटीच्या आवारातील शिवणीचे गारवा, सावली देणारे झाडही माझ्या विरोधाला न जुमानता पाडण्यात आले ! त्यामुळे मी कितीतरी पक्षी व त्यांचे स्वर यांना मुकलो...
प्रणालक, पद्मनाभ, पन्हाळेकाजी… दुर्ग एकच ! (Panhalekaji – Fort with many names)
दापोली तालुक्यातील दाभोळ या जुन्या बंदरातून मालाची आयातनिर्यात मोठ्या प्रमाणात अनेक शतके होत आलेली आहे. बंदरापर्यंत मालाची नेआण पश्चिम घाटापासूनच्या विविध भूप्रदेशांतून नदीमार्गानेदेखील होत असे. त्या मार्गांवरील वाहतुकीचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी किल्ले बांधले. प्रणालक ऊर्फ पद्मनाभ ऊर्फ पन्हाळेकाजी हा छोटेखानी किल्ला त्यांपैकीच एक ...
पन्हाळेकाजी लेणी समूह : विविध तरी एकात्म ! (Panhalekaji cave sculpture – varied styles...
दापोलीजवळचा पन्हाळेकाजी लेणी समूह म्हणजे भारतातील स्थापत्यकलेत व धार्मिक पंरपरेत बदल कसे होत गेले त्याचे उत्तम उदाहरण आहे. तेथे हीनयान, वज्रयान, शैव, गाणपत्य, नाथ अशा विविध धर्मसंप्रदायांचा वेगवेगळ्या काळातील प्रभाव दिसून येतो. लेणी मोठ्या कालखंडात खोदली गेली, तथापी त्याची शिल्पशैली त्यानुसार विविध तरी एकात्म दिसून येते...
दाभोळ आणि परकीय प्रवासी
‘दाभोळ’ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर. त्याचा उत्कर्ष चौदाव्या ते सतराव्या शतकांत झालेला होता. दाभोळ बंदराचा सर्वात प्राचीन उल्लेख सातवाहन काळात एका अनभिज्ञ परकीय प्रवाशाने लिहिलेल्या ‘पेरीप्लस ऑफ इथिरियन सी’ या ग्रंथात सापडतो. दाभोळचा तो उल्लेख ‘पालीपाटमे’ असा आहे. त्याच प्रमाणे जुन्या लिखाणात कोकणातील बंदरांचे संदर्भ सापडतात...
दाभोळचा इतिहास – मक्केचा दरवाजा !
दाभोळ हे दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर आहे. ते महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते. कोकणातील बंदरे सातवाहन काळात भरभराटीस आली. तेथून रोम, इजिप्त, अरेबिया, इराण या देशांशी व्यापार चालत असे. दाभोळचा तेराव्या शतकापर्यंतचा इतिहास चालुक्य, शिलाहार, यादव यांसारख्या हिंदू राजवटींचा इतिहास आहे...
कोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर ! (Dabhols Historian Anna Shirgaonkar)
अनंत धोंडूशेठ शिरगावकर हे अण्णा शिरगावकर या नावाने कोकण परिसरात ओळखले जात. त्यांनी शिक्षण, सहकार, कामगार संघटना, अपंगांसाठीच्या संस्था, वाचनसंस्कृती, पंचायतराज, संग्रहालयशास्त्र, कोकणच्या प्राचीन इतिहासाचा शोध अशा विविध विषयांत मैलाचे दगड ठरतील असे संशोधन व लेखन कार्य केले आहे. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1930 गुहागरमधील विसापूर गावचा. त्यांना मृत्यू वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी 11 ऑक्टोबर 2022 रोजी आला...
आदिलशाही स्थापत्यशैली – दाभोळची मशीद (Adilshahi architecture – Dabhol Mosque)
विजापूरची एक राजकन्या आयेशाबिबी (तिला माँ साहेब असेही म्हणत) मक्केला जाण्यासाठी तिच्या लवाजम्यासह (तिच्या सोबत वीस हजार घोडेस्वार होते) दाभोळ बंदरात येऊन पोचली. त्यावेळी मुहम्मद आदिलशहाची कारकीर्द तेथे चालू होती. एवढ्या लोकांसह एवढा लांब प्रवास करण्यासाठी लागणारी मोठी रक्कम - लाखो रूपयांची संपत्ती तिच्याकडे होती. परंतु तिने तिचा पुढील प्रवास रद्द केला. त्या रकमेचा सदुपयोग करण्यासाठी मौलवी आणि काझी यांच्या सल्ल्याप्रमाणे दाभोळातच एक छान मशीद उभी करावी असे ठरले. त्या मशिदीचा स्थपती होता कामिलखान...