Home Tags होळी

Tag: होळी

चौऱ्याऐंशी गावांची मालकीण – झोलाईदेवी

झोलाईदेवीचे प्रसिद्ध मंदिर दापोली तालुक्याच्या माटवण या गावी आहे. झोलाईदेवीला दापोली, मंडणगड आणि खेड या तीन तालुक्यांतील चौऱ्याऐंशी गावांची मालकीण म्हणून संबोधले जाते. झोलाईदेवीचा उत्सव होळी पौर्णिमेला धुमधडाक्यात साजरा केला जातो. कोकणात पहिली होळी फाल्गुन शुक्ल पंचमीला पेटवली जाते. झोलाईदेवीची पालखी त्यानंतर सहाव्या दिवशी माटवणमधील मंदिरातून निघते...

दापोलीचा प्रभुआळी उत्सव – परंपरेची मांदियाळी

1
प्रभुआळी हे दापोली शहराचे मध्यवर्ती ठिकाण. त्या आळीची ख्याती उत्सव, प्रथा-परंपरा यांचा वारसा जपणारा, गजबजलेला भाग म्हणून आहे. प्रभुआळी हे नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी प्रधान व सुळे हे प्रभू म्हणजे सीकेपी ग्रामस्थ यांचे वास्तव्य होते. या जुन्या संदर्भाखेरीज दुसरा महत्त्वाचा पदर आहे. तो म्हणजे आळीत असलेले ‘प्रभू’ श्रीरामचंद्राचे मंदिर ...

दापोलीतील पिसईचा नकटा

शिमग्याच्या म्हणजेच होळीच्या सणाच्या उत्सवातील ‘पिसईचा नकटा’ दापोलीत लोकप्रिय आहे. नकटा म्हणजे देवीचा रखवालदार. नकट्याचे सोंग घेणारी व्यक्ती लाकडी मुखवटा घालते. तो मुखवटा काजूच्या झाडाच्या खोडापासून बनवलेला असतो. तो परंपरेने चालत आलेला असतो. नकट्याचा मुखवटा पोराबाळांना भीतीदायक वाटतो...

कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा आनंदोत्सव !

1
भारताच्या सात लाख खेडेगावांमध्ये महादेवाचे मंदिर नाही असे गाव नसेल ! महादेवाच्या त्या मंदिरांतील भगवंताचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातील महादेवाला वेगवेगळे नाव आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे महाराष्ट्राच्या पोलिस खात्याचे घोषवाक्य आहे. कोळबांद्रे गावातील डिगेश्वरही नेमके तेच काम करतो. गावात कोणी गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल माणसाला त्रास दिला तर ‘आता डिगेश्वराला नारळ देईन’ एवढे वाक्य जरी त्या गरीब माणसाने उच्चारले तरी तो दुष्ट घाबरून जातो...

जवाहरलाल नेहरू आणि सोलापूरचा मि. वेडी

जवाहरलाल नेहरू यांनी ‘भारताला संपूर्ण स्वातंत्र्य हवे’ अशी मागणी करणारा ठराव मांडला, तो लाहोर काँग्रेसमध्ये एकमताने मंजूर झाला. तेव्हा एकीकडे सविनय कायदेभंगाच्या च‌ळवळीने उग्ररूप धारण केले, तर दुसरीकडे जवाहरलाल यांना अटक झाली. जवाहरलाल कैदेत सापडल्याने देशभरातील तरुण वर्ग प्रक्षुब्ध झाला. त्यातूनच सोलापूरच्या हाजूभाई चौकात कलेक्टरला खुनाची धमकी देणारे पत्र चिकटवलेले सापडले. त्या पत्राखाली पत्रलेखक म्हणून ‘मि. वेडी’ अशी सही होती…

फडावरचा गुढीपाडवा (Sugarcane Cutters celebrate Gudhipadwa in their Style)

फड म्हणजे साखर कारखान्याच्या शेजारी वसलेली गाडीवाल्या ऊसतोडणी कामगारांची हंगामी वस्ती. ती काही महिन्यांसाठी असते आणि तेथे येणारे कामगार स्थलांतरित असतात.
_JuchandraGavalaHote_KombarHavli_2.jpg

जूचंद्र गावात होते कोंबर हावली (कोंबडी होळी)

जूचंद्र हे ठाणे जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील हिंदू -आगरी लोकवस्ती असलेले गाव. ते रांगोळी कलेसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. तसेच, ते तेथे उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या...
_Panchale_gavcha_Shimga_1.jpg

पंचाळे गावचा शिमगा

पंचाळे सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गाव. गावामध्ये थोरात, तळेकर, माळोदे, मोरे, आसळक, सहाने, रहाने, जाधव अशी मराठा कुळे आहेत. परंतु विविध समाजांचे व धर्मांचे...
carasole

जांभारी गावातील शिमग्याची मिरवणूक

लाल वस्त्रांनी शृंगारलेली पालखी. आत चांदीचे देव भैरी-कालकाई, इंगलाई, जोगेश्वरी आणि कोनबाबा पालखीच्या आकर्षक सजावटीत विराजमान झाले आहेत. समोर पालखीचा कोरीव कठडा आहे. वरील...
carasole

टिप्‍परघाई – वडांगळी गावचा शिमगा

शिमग्याचे ‘कवित्व’ महाराष्ट्राला नवे नाही. मात्र सिन्नर तालुक्यातील वडांगळी या माझ्या गावात शिमगा साजरा केला जातो, तोच मुळी कवने गाऊन, टिप्परघाई खेळून. तेथे टिप्परघाई...