Tag: संग्रहालय
सांगली कला/वस्तू संग्रहालयात उत्तम चित्रकृती (Sangli Art Museum)
महाराष्ट्रात तेरा शासकीय कला/वस्तू संग्रहालये आहेत. ती शासनाच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालये विभागाच्या अधिपत्याखाली येतात. त्यामध्ये एकट्या कोल्हापुरात दोन संग्रहालये आहेत. बाकी गावे अशी - नागपूर, औरंगाबाद, सिंदखेडराजा, तेर, पैठण, नाशिक, माहूरगड, सातारा, औंध, सांगली, रत्नागिरी. त्याशिवाय खासगी संग्रहालये व संग्राहक यांची संख्या ही वेगळीच आहे. वस्तू संग्रहालयांतील कलावस्तू या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा, सांस्कृतिक बहुविधतेचा आणि कलासंपन्न जीवनशैलीचा वारसा सांगत असतात. त्यामुळे संग्रहालये जपली जाणे- त्यांचे संवर्धन होणे हे महत्त्वाचे होय. त्यासाठी त्यांना लोकाश्रय मिळाला पाहिजे...
गुढीपूर – काल आणि आज
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना कुडाळमध्ये पिंगुळी हे छोटे कलाग्राम आहे. या पिंगुळी गावात गुढीपूर नावाची ठाकर लोककलाकारांचीची वाडी आहे. ठाकर लोककलाकारांमध्ये पिंगळी, पांगुळ, गोंधळी व बावलेकर असे लोककलाकार आहेत. ते सगळे एकाच समूहाचा भाग असले तरी लोककलेच्या सादरीकरणामधली त्यांची कामे आणि साधने वेगवेगळी आहेत. गुढीपूर वाडीविषयी, तेथील लोककलाकारांविषयी, कलेविषयी आणि जगण्याच्या धडपडीविषयी आत्मियतेने सांगताहेत पिंगुळी, चित्रकथी या लोककलेच्या अभ्यासक माणिक वालावालकर...
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम (Dr. Bhau Daji Lad Museum- Glorious...
म्युझियम्स म्हणजेच वस्तुसंग्रहालये ही अनौपचारिक शिक्षणाची साधने असतात. समाजाच्या कर्तृत्वाची ओळख असतात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा सोपवण्याचे साधनही असतात. कलेतिहासाच्या अभ्यासक असलेल्या शर्मिला फडके क्रमश: मुंबईतील म्युझियम्सची आणि कलादालनांची ओळख करून देणार आहेत. त्यापैकी एक डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम. हे मुंबई शहरातील पहिले म्युझियम. ते काही काळ विस्मरणात जाऊन आता पुन्हा नव्या झळाळीने उभे राहिले आहे...
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Vastusangrahalay)
म्युझियम म्हणजेच वस्तुसंग्रहालय हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कलादालनात चित्रांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पाहिले की या विधानाचा प्रत्यय येतो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे मुंबई शहराचा मानबिंदू आहे. देशातील कला-इतिहास-संस्कृतीचा वारसा काळजीपूर्वक जतन करणारे आणि त्याचबरोबर समकालीन कला-संस्कृतीच्या वाढीकडेही तितक्याच डोळसपणे व कृतिशीलतेने पाहणारे ते देशातील एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे...
खेळ मांडीयेला : भातुकलीचा इतिहास (Bhatukli – Enjoyable home management game for girls)
वृत्तनिवेदिका दीपाली केळकर यांच्या ‘खेळ मांडीयेला’ या पुस्तकातून भातुकली या खेळाचा, मराठी संस्कृतीचा व समृद्ध परंपरेचा इतिहास आणि वारसा प्रकट होतो ! भातुकलीच्या सर्व पैलूंचे दर्शन आणि दस्तावेजीकरण या पुस्तकात आढळते…
ऐतिहासिक परंपरेचे – टाऊन हॉल म्युझियम (कोल्हापूर) (Kolhapur Town Hall Museum)
नवगॉथिक वास्तुशैलीमध्ये तंतोतंत घडवलेली कोल्हापुरातील पहिली आणि एकमेव इमारत म्हणजे टाऊन हॉल होय. निमुळते छप्पर, मनोरे आणि आकर्षक वास्तू ही नवगॉथिक वास्तुकलेची प्रमुख वैशिष्ट्ये असतात. टाऊन हॉलची लक्षवेधी इमारत महालक्ष्मी मंदिरापासून उत्तरेला साधारण दोनेक किलोमीटर अंतरावर भाऊसिंगजी रोडवर उभारलेली आहे...
भाऊ साठे यांचे डोंबिवलीतील शिल्पालय
शिल्पकार शिल्प साकारतो म्हणजे नेमके काय करतो? शिल्पकार मातीच्या गोळ्यातून केवळ एक मूर्ती/शिल्प घडवत नसतो, तर तो त्या माध्यमातून एक विचार, एक कलाकृती आकारास...
खेड्याचे दर्शन – कोल्हापूरचे सिद्धगिरी संग्रहालय (Siddhagiri Museum)
‘सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय’ म्हणजे कोल्हापुरातील कणेरी मठ. तेथे ग्रामजीवनाचे हुबेहूब दर्शन मॉडेल्समधून घडते. कणेरी हे गावाचे नाव आहे. कोल्हापूरच्या दक्षिणेला बारा किलोमीटर अंतरावर, राष्ट्रीय...
इतिहासापासून अश्मयुगापर्यंतचा वारसा…
शांतिलाल पुरवार यांचा आगळा संग्रह
औरंगाबादचा पुरवार कुटुंबियांचा वंशपरंपरागत वाडा हा घर कमी आणि संग्रहालय जास्त भासतो. दहा पिढ्या नांदलेल्या त्या घरामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा आणि...
अशोक जाधव यांचे कलादालन
कलासक्त चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक दादू जाधव यांनी स्वतः आर्थिक झळ सोसून कलाप्रेम जोपासण्याचे धाडस चिंचोली गावात केले आहे. ते गाव सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात आहे....