मी आईला विचारले, “आय, का आलो आपण इथं?” आईने थोडक्यात उत्तर दिले, “याला पळण म्हणतात.” मी प्रश्न विचारला, “पळण म्हणजे काय?” माझी आई मला माझ्या नावावरून लहानपणी देवके म्हणत असे. ती मला म्हणाली, “अगं देवके, आज आपल्या गावात हिंदू लोकं नवरात्रीच्या टायमाला देवीला बळी देतात. म्हणून आपण इथं आलो.”...