Tag: आंजर्ले
आठवणीत जपलेली माझी दापोली
माझ्या आठवणीत रेंगाळलेली दापोली मला रोज आठवते. ती दापोली आहे पन्नास-साठच्या दशकातील. माझे एस एस सी होईपर्यंतचे सारे आयुष्य दापोलीत गेले. मी एस एस सी नंतर दापोलीत कॉलेजची सोय नसल्यामुळे मुंबईत आले.तिकडे दापोलीची हद्द सुरू झाली, की काळकाईच्या कोंडावरची असंख्य थडगी दिसू लागत. त्याचप्रमाणे, आजुबाजूच्या शेतांचे दगडी बांध दिसत. काळकाईचा उतार संपला की डाव्या हाताला मशीद आणि मशिदीच्या खालच्या अंगाला खळखळ वाहणारा ओढा होता. थोडे पुढे आले, की दापोलीचे प्रसिद्ध आझाद मैदान दिसे...
मुर्डी : दापोली तालुक्यातील उद्यमनगरी
दापोली तालुक्यातील मुर्डी हे परंपरा आणि नवता एकत्र असलेले गाव. ते स्वतःचे असे खास अस्तित्व जपत असते. गाव त्याच्याच तोऱ्यात आणि मिजाशीत असते असे म्हटले तरी चालेल. ते छोटेसे टुमदार गाव; डोंगराच्या कुशीत वसले आहे. लोकमान्य टिळक यांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले त्या वेळेस मुर्डीत कृष्णशास्त्री पेंडसे यांच्या घरी दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू झाला. तो खाजगी असला तरी तो सर्व गावाचा वाटावा असे त्याचे स्वरूप सार्वजनिक होते. गावचे खोत, पेंडसे यांची आठ-नऊ घरे गावात राहती होती. खोती प्रतिवर्षी प्रत्येक घरी बदलती असे...
कासव संशोधनातील नवे युग ! (New Era of Turtle Research)
कासव संशोधनाला नवी दिशा देणारा एक प्रयोग 25 जानेवारी 2022 रोजी कोकणात करण्यात आला. तो म्हणजे कासवांनी घरटी तयार केल्यावर त्यांना उपग्रह टॅगिंग करण्याचा ! त्या दिवशी, प्रथमच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वेळास येथे प्रथमा नावाच्या कासवाला व दापोलीतील अंजर्ले येथे सावनी नावाच्या कासवाला उपग्रह टॅगिंग करण्यात आले...
पाखाडी, पदपथ… कोकणचे फूटपाथ
पाखाडी हे पदपथ वा फूटपाथ यांचे एक रूप होय. सखल भागातून उंचावरच्या टेपाडावर जाण्या-येण्यासाठी दगडांनी बांधलेला रस्ता म्हणजे पाखाडी. त्या रस्त्याला फरसबंदी करण्यासाठी कोकणात मिळणाऱ्या जांभा दगडांचे चिरे वापरत. चार हजार वर्षांपूर्वी ग्रीकमधील नगररचनेत ते बांधण्याची पद्धत अवतरलेली दिसते. लंडनमध्ये सतराव्या शतकात रहदारीसाठी असलेल्या मुख्य रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी रस्त्यापासून किंचित उंच पदपथ बांधण्याची पद्धत रूढ झाली...
श्री.ना. पेंडसे – कोकणचा कलंदर लेखक
मराठी वाचकांच्या मनावर 1940 ते 1980 अशी चार दशके अधिराज्य गाजवले ते श्री. ना. पेंडसे या कोकणातील लेखकाने ! त्यांनी कोकणच्या तांबड्या मातीतील सर्वसामान्य माणसाच्या चिवट लढाया वैश्विक केल्या. कोकणातील निसर्ग, तेथील सर्वसामान्य माणसे, संस्कृती त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या ‘रथचक्र’, ‘तुंबाडचे खोत’, ‘गारंबीचा बापू’ अशा एकापेक्षा एक कादंबऱ्या सरस ठरल्या. त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा नि मनाचा शोध त्यांच्या कादंबऱ्यांमधून घेतला...
मुखवट्यातून उभ्या केलेल्या चार देवींची यात्रा
मुरूड, आंजर्ले व वेळास ही गावे दुर्गादेवीच्या, तर केळशी महालक्ष्मीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. ती चारही गावे तीनशे वर्षांपासून या यात्रांनी एकमेकांशी जोडली गेली आहेत. यात्रांच्या शेवटच्या दिवशी रथयात्रा निघते, त्या दरम्यान प्रत्येक जातीजमातीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला मानाचा विडा देऊन सन्मानित करण्याची रीत आहे. विनायक बाळ यांनी दापोली तालुक्यातील या चार गावांत मुखवट्यातून उभ्या करण्यात येणाऱ्या चार देवींच्या यात्रांचे वेगळेपण या लेखातून मांडले आहे...
केळशीच्या रमलखुणा
पूर्वीच्या काळी गाव, गावाकडची संस्कृती, गावची अर्थव्यवस्था कशी होती याचे प्रातिनिधिक रूप म्हणजे केळशी. गावाकडचे निसर्गसौंदर्य, तेथील लोकजीवन आणि त्यातील वेगळेपण हे सगळेच भूरळ घालणारे होते. आज गावे शहरीकरणामुळे सुधारली. पूर्वीच्या गावांबाबत अनभिज्ञ असलेल्या आजच्या पिढीला जुन्या गावची सैर केळशी या गावातून घडेल...
पंचांग – टिळक की दाते (Lokmanya Tilak Reforms Indian Traditional Almanac)
पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे...