Home Authors Posts by विद्या पेंडसे

विद्या पेंडसे

1 POSTS 0 COMMENTS
विद्या अनिल पेंडसे यांचे बी ए, बी एड असे शिक्षण झाले आहे. त्यांनी गावातील मुलांसाठी इंग्रजीच्या शिकवण्या, संस्कारवर्ग चालवले. त्यांनी गावातील शाळेच्या शिक्षण समितीवर काम करून तेथे विविध उपक्रम राबवले. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून गाव पातळीवर काम केले आहे. त्यांचा आमरस हवाबंद करून डबे भरण्याचा उद्योग आहे. उद्योजकता आणि सामाजिक योगदानासाठी देण्यात येणारा मधुकर महाजन पुरस्कार त्या व त्यांचे पतिराज अनिल या उभयतांना मिळाला आहे.

मुर्डी : दापोली तालुक्यातील उद्यमनगरी

दापोली तालुक्यातील मुर्डी हे परंपरा आणि नवता एकत्र असलेले गाव. ते स्वतःचे असे खास अस्तित्व जपत असते. गाव त्याच्याच तोऱ्यात आणि मिजाशीत असते असे म्हटले तरी चालेल. ते छोटेसे टुमदार गाव; डोंगराच्या कुशीत वसले आहे. लोकमान्य टिळक यांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले त्या वेळेस मुर्डीत कृष्णशास्त्री पेंडसे यांच्या घरी दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू झाला. तो खाजगी असला तरी तो सर्व गावाचा वाटावा असे त्याचे स्वरूप सार्वजनिक होते. गावचे खोत, पेंडसे यांची आठ-नऊ घरे गावात राहती होती. खोती प्रतिवर्षी प्रत्येक घरी बदलती असे...