Home Authors Posts by स्वाती महाळंक

स्वाती महाळंक

1 POSTS 0 COMMENTS
स्वाती महाळंक या लेखिका, पत्रकार, निवेदक, अनुवादक, वक्त्या, व्याख्यात्या व मुलाखतकार म्हणून विविध कामे करतात. त्या पुणे आकाशवाणी आणि दूरदर्शनवर कार्यरत आहेत. त्यांची ‘कहाणी बचतगटांची’, ‘निस्वार्थी जननेता’, ‘आम जनता आप नेता’, ‘रेडिओ जॉकी व्हायचंय’, ‘ध्येयासक्त’ अशी आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्यपाल, विविध केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवरांच्या विविध माध्यमांसाठी मुलाखती घेतल्या आहेत. त्यांच्या ‘रायबागन’ या कथेचा कर्नाटक सरकारच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

श्री.ना. पेंडसे – कोकणचा कलंदर लेखक

मराठी वाचकांच्या मनावर 1940 ते 1980 अशी चार दशके अधिराज्य गाजवले ते श्री. ना. पेंडसे या कोकणातील लेखकाने ! त्यांनी कोकणच्या तांबड्या मातीतील सर्वसामान्य माणसाच्या चिवट लढाया वैश्विक केल्या. कोकणातील निसर्ग, तेथील सर्वसामान्य माणसे, संस्कृती त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या ‘रथचक्र’, ‘तुंबाडचे खोत’, ‘गारंबीचा बापू’ अशा एकापेक्षा एक कादंबऱ्या सरस ठरल्या. त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा नि मनाचा शोध त्यांच्या कादंबऱ्यांमधून घेतला...