अमरावती
Tag: अमरावती
रमेश बाळापुरे – ना हरली जिद्द ! (Ramesh Balapure – stage actor with determination)
रमेश बाळापुरे यांचा जन्म झाला तो मुळी बाविशी नाट्यमंदिरात. रमेशला त्याच्या तरुणपणीही बाविशीचे स्टेज अनायासे प्राप्त झाले ! रमेशचे मामा लगदेमास्तर हे नाटकात कामे करत. रमेशमध्ये नाटक असे अनुवंशिकतेने उतरले होते. रमेशला निसर्गानेसुद्धा मदतच केली. त्याला प्रमाणबद्ध उंची, मोठे आकर्षक डोळे, हसरा चेहरा अशी शारीरिक संपत्ती लाभली. रमेश आणि मी नाटकातील जोडगोळी बनलो. रमेशने नाटक निवडावे- दिग्दर्शित करावे आणि मी त्यात विनोदी भूमिका करावी असा परिपाठ झाला...
शंकराचार्यांचा विवेकचूडामणि ग्रंथ
शंकराचार्य हे भारतीय संस्कृतीतील धर्मविचारांचे आद्यगुरू. शिवगुरु भट्ट व आर्याम्बा यांच्या पोटी शंकराचा प्रसाद म्हणून त्यांचा जन्म झाल्याची भावना मनी बाळगून त्यांचे नाव शंकर असे ठेवण्यात आले. शंकर मेधावी होते. ते प्रकांडपंडित म्हणून वयाच्या सहाव्या वर्षीच ओळखले जाऊ लागले. त्यांना वयाच्या आठव्या वर्षी गुरू गोविंदांकडून संन्यास प्राप्त झाला. त्यांना आयुष्य केवळ बत्तीस वर्षांचे लाभले. त्यांनी जवळपास चाळीस ग्रंथांची निर्मिती केली आहे...
लासूरचे आनंदेश्वर शिवमंदिर
लासूर नावाचे खेडेगाव अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते प्रसिद्ध आहे तेथील आंनदेश्वर शिव मंदिरासाठी. आकर्षणाची गोष्ट म्हणजे ते शिवमंदिर आठशे वर्षे जुने, बाराव्या शतकात बांधलेले आहे. मंदिर उंचावर आहे. त्याचा परिसर रम्य आहे. मंदिराचे संपूर्ण दगडी बांधकाम. ते मोठमोठ्या शिळांवर कलात्मक रीत्या रचलेले. तो हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो...
नांदगावचे खंडेश्वर मंदिर
शिवालय भारतात गावोगावी, अगदी पाच-पंचवीस उंबऱ्यांच्या गावामध्येही असते. मंदिरांची नावेही भक्तांनी प्रेमाने व गाव परिसराशी संबंध राखून ठेवलेली असतात- कोठे सोमेश्वर, कोठे कोंडेश्वर, कोठे कोळेश्वर अशी ! अमरावती जिल्ह्यात तर गावाचे नावच शंकरावरून दिले गेले आहे - नांदगाव खंडेश्वर...
वक्ता दशसहस्रेषु… प्राचार्य राम शेवाळकर
राम बाळकृष्ण ऊर्फ ‘राम शेवाळकर’. ज्येष्ठ साहित्यिक, ख्यातकीर्त वक्ते, अध्ययन-अध्यापन-शैक्षणिक प्रशासन यांशी निगडित; तसेच, कला-साहित्य-संस्कृतीविषयक अशासकीय स्वायत्त विविध मंडळांचे सदस्य, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ...
अचलपूरचे लोकनेते भाई सुदाम देशमुख
विदर्भ प्रदेश हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जाई. काँग्रेस पक्षाने कोणत्याही जागेवर कोठलाही उमेदवार उभा करावा, उमेदवार नसेल तर दगड उभा करावा- त्यालाही लोक निवडून देतील असे बोलले जाई ! पण काँग्रेसच्या त्या अभेद्य बालेकिल्ल्याला जणू सुरुंग लागल्याचे वातावरण लोकसभेच्या 1989 च्या निवडणुकीत निर्माण झाले होते. त्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे झुंजार नेते भाई सुदाम देशमुख ...
अचलपूरचे जिंदादिल राजकारणी माधवराव पाटील
अचलपूरचे माधवराव भगवंतराव पाटील हे महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात कमी वयाचे आमदार होते. ही गोष्ट 1957 मध्ये अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र विधानसभेची. त्यांचे व्यक्तिमत्त्व राजबिंडे होते. व्यासंग प्रचंड होता. त्यांची बुद्धिमत्ता चतुरस्र चाले. त्यांचे वर्णन त्यांचे समकालीन ‘प्रेमळ हृदयाचे धनी’ असे करत...
बोरी खुर्दला वैभव नदीचे !
बोरी अरब हे गाव यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा या तालुक्यात येते. तेथील नदीला अडान नदी म्हणतात. त्या नदीमध्ये असलेल्या एका ठिकाणाला ‘लगीनबुडी’ असे म्हणतात. त्या गावचे माठ आणि चहा प्रसिद्ध आहेत. तेथे कापसाचा कारखानाही आहे...
अचलपूरच्या हौजकटोराचे दुर्दैव
अचलपूरच्या ‘अष्टकोनी हौज कटोरा’ची खास निर्मिती जलविहाराकरता केली गेली होती. बहामनी काळातील राजाराणींच्या जीवनातील आनंद उपभोगण्याचे ते रमणीय ठिकाण. ती तीन (की पाच) मजली इमारत होती. तिचा तळमजल्यापर्यंतचा भाग पाण्याखाली राहत असे. त्यामुळे जलमहालाच्या पहिल्या मजल्यावर नौकेद्वारे जावे लागे...
सातपुड्यातील लोकउत्सव – बहिरम यात्रा
बहिरमची यात्रा म्हणजे दोन राज्यांतील हिंदी व मराठी भाषिक लोकांमधील सांस्कृतिक संगम आहे ! यात्रा मध्य प्रदेश व महाराष्ट्र यांच्या सीमेवर भरते. सलग दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारी यात्रा म्हणून बहिरमच्या यात्रेचा लौकिक सर्वदूर आहे. यात्रेला पौराणिक महात्म्य आहे. बहिरम (भैरवनाथ) हे बऱ्याच कुटुंबांचे कुलदैवत आहे. यात्रेत देवदर्शनासोबत अध्यात्म, चित्रपट, मनोरंजन, महाप्रसाद, खाद्य संस्कृती, महिला मेळावा, कीर्तन, प्रदर्शन, पशुविक्री, कृषी साहित्य अशी सर्व गोष्टींची रेलचेल राहते...