Home Authors Posts by विनया मगरे-सहस्त्रबुद्धे

विनया मगरे-सहस्त्रबुद्धे

1 POSTS 0 COMMENTS
विनया विनोद सहस्त्रबुद्धे या पूर्वाश्रमीच्या विनया रमेश मगरे. त्यांचे वडील रमेश मगरे हे कवी आहेत. आई शिक्षिका होती. विनया यांचे शिक्षण बी ई कॉम्प्युटर सायन्स आणि एम बी ए ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे झाले आहे. त्यांनी विविध विषयांवरील ललित लेख लिहिले आहेत. त्यांना प्रवास, कला, साहित्य, इतिहास, विविध संग्रहालयांना भेटी देणे यांची आवड आहे. त्यांचे ‘मनोमनी heart to heart’ या नावाने फेसबुक पेज आहे. सध्या त्यांचे वास्तव्य नेदरलँड्स (युरोप) येथे आहे.

लासूरचे आनंदेश्वर शिवमंदिर

लासूर नावाचे खेडेगाव अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते प्रसिद्ध आहे तेथील आंनदेश्वर शिव मंदिरासाठी. आकर्षणाची गोष्ट म्हणजे ते शिवमंदिर आठशे वर्षे जुने, बाराव्या शतकात बांधलेले आहे. मंदिर उंचावर आहे. त्याचा परिसर रम्य आहे. मंदिराचे संपूर्ण दगडी बांधकाम. ते मोठमोठ्या शिळांवर कलात्मक रीत्या रचलेले. तो हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो...