Tag: खानदेश
ऊसतोड कामगार आणि त्यांची गाथा
राज्याच्या सोळा जिल्ह्यांत बावन्न तालुके ऊसतोड व्यवसायात आहेत. ऊसशेती गेल्या सत्तर वर्षांत महाराष्ट्रात बहरली, त्यासोबत साखर कारखाने निघाले. शेतांतील ऊस तोडून त्या कारखान्यांना पुरवणारा ऊसतोड कामगार म्हणजे स्थलांतरित मजुरांचा एक मोठा समुदाय. मात्र तो समुदाय म्हणजे असे मजूर की जे जी जागा मिळेल, जसे खाणेपिणे असेल, जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत राहतात. त्यांचा स्वत:चा पसारा असा काहीच नसतो, पण जो आहे त्यावर त्यांना ऊसतोडणीच्या हंगामाचे पाच-सहा महिने काढायचे असतात. त्यांच्या अडचणी मात्र सुटताना दिसत नाहीत...
स्थित्यंतर अचलपूर : गतवैभवाची फक्त साक्ष !
‘अचलपूरचा इतिहास म्हणजेच वऱ्हाडचा इतिहास’! या वचनात गावाचा शहराबद्दलचा अभिमान आहे. मात्र ते अचलपूर (आणि परतवाडा) हे शहर पार बदलून गेले आहे. संपन्नतेची साक्ष पटवणाऱ्या खुणा फक्त शिल्लक आहेत ! शहराच्या गतकाळातील वैभवाची साक्ष ऐतिहासिक वास्तूंमुळे पटते हे मात्र खरे ...
कुशल अभिनेत्री स्मिता पाटील
स्मिता पाटील या अभिनेत्रीने तिच्या केवळ एकतीस वर्षांच्या आयुष्यातील, दहा वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत पार फ्रान्स या देशाच्या नभांगणापर्यंत तिच्या उत्तुंग अभिनयाचे चांदणे नेले, हे लोकविलक्षण कर्तृत्व होय. तिची भूमिका समजून घेण्याची कुशाग्रता आणि भूमिकेची अभिनय कुशल बुद्धिवान मांडणी ही बलस्थाने होती...
सदतिसावे साहित्य संमेलन
सदतिसावे साहित्य संमेलन दिल्ली येथे 1954 साली झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे होते. लक्ष्मणशास्त्री म्हणजे भारतीय प्राचीन ऋषी परंपरेची आठवण ज्यांना पाहिल्यावर आणि ऐकल्यावर व्हावी असा प्रकांड पंडित व रसिक विद्वान...
अण्णासाहेब किर्लोस्कर आणि संगीत शाकुंतल (Annasaheb Kirloskar And Sangeet Shakuntal)
अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी मराठी संगीत नाटकाचे एक युग घडवले ! त्यांना नाटकांचा छंद जडला आणि त्यांचा विद्याभ्यास संपला. अण्णासाहेबांनी कालिदासांच्या संस्कृत शाकुंतल वरून मराठीत लिहिलेल्या ‘संगीत शाकुंतल’ने मराठी संगीत नाटकांची नांदी केली आणि इतिहास घडवला. त्यांनी आणि त्यांच्या किर्लोस्कर नाटक मंडळीने नाट्य व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली…
मराठी – सर्वसमावेशक भूमिका हवी
जगात बोलल्या जाणाऱ्या एकूण भाषांमध्ये मराठी ही दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठीची काळजीवाहू म्हणून बोलीभाषांना योग्य अधिष्ठान प्राप्त करून दिल्यास मराठीचा झेंडा निश्चितच उंच फडकणार आहे...
यजुर्वेंद्र महाजन – स्पर्धेला साथ मानवी जिव्हाळ्याची!
जळगावचे यजुर्वेंद्र महाजन यांच्या कार्याचा मूळ गाभा ग्रामीण भागातील गरीब, अंध आणि अपंग विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे हा आहे. त्यातून त्यांनी अनेक प्रकल्पांना चालना दिली आहे. त्यांपैकी मनाला स्पर्श करणारे काम आहे ते अंध-अपंगांना तशा परीक्षांसाठी तयारी करून घेण्याचे. त्याकरता भारतातील विद्यार्थी त्यांच्याकडे येतात व त्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाते...
आठवणीतला खानदेशी पोळा
जळगावातल्या भडगाव तालुक्यातलं कोळगाव हे माझं गाव. लहानपणी गावात पाळली जाणारी बैलगाडं गावाबाहेर नेण्याची प्रथा मी पाहिली आहे. कित्येक वर्षांपासून चालू असलेली ही प्रथा गावातल्या एका वजनदार माणसाच्या सोयीसाठी अचानक मोडली गेली. पोळ्याला कोणी कोणता बैल धरायचा यावरून आम्हा भावंडांमध्ये भांडणं होत. सर्वांना आधी पळणार्या बैलाला धरायला आवडे. कोणी म्हातार्या बैलाला धरायला तयार नसे. कोण कोणता बैल धरणार हे ठरल्यावर जो तो आपापल्या बैलाकडे अधिक लक्ष देई. जो तो सालदारांनी कापून आणलेलं हिरवंगार लुसलुशीत गवत आपल्याच बैलांना अधिक टाके...
खानदेशचा पोळा
खानदेशात ‘पोळा’ हा सण श्रावणी अमावस्येला बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. पोळ्याच्या दोन दिवस आधी बैलांच्या खांद्यांना तेल, तूप लावून मळले जाते. शिंगांना व खुरांना शस्त्राने टोकदार केले जाते. बैलांकडून दोन दिवसांपासून काम करवले जात नाही. त्यांच्या खांद्यावर दुसर ठेवली जात नाही. यास ‘खांदेपूजा’ असे म्हणतात. बैलांना पोळ्याच्या दिवशी सकाळपासून रानात मनसोक्त चरायला सोडतात. त्यांना नदीत, तलावात अथवा गावकुंडात अंघोळ घालतात...