दत्त देवतेचे विविधांगी दर्शन

भगवान दत्तात्रेय ही भारतीय संस्कृतीतील अद्‌भुत निर्मिती आहे ! ते अत्री व अनसूया यांचे पुत्र आणि विष्णूचे अंश होत. दत्तात्रेयांचा प्रभाव शैव, वैष्णव, शाक्त या तिन्ही प्रमुख उपासना प्रवाहांना व्यापून उरणारा आहे. दत्तात्रेयांविषयीचा उत्कट श्रद्धाभाव महानुभाव, नाथ, वारकरी, समर्थ अशा वेगवेगळ्या संप्रदायांतही आहे...

घरातील टाक आणि जानाई- निर्ऋती यांचा अनुबंध (Prayer symbols become history documents)

0
टाक म्हणजे सोने, चांदी, पितळ इत्यादी धातूंची बनवलेली प्रतीके होत. ते पूर्वजांची आठवण म्हणून देवघरात जपले जातात. असे टाक जुन्या घरात व घराण्यांत आढळत असल्याने ते आगळेवेगळे ऐतिहासिक महत्त्वाचे साधन ठरते...

निळोबारायांची अभंगार्तता

0
ज्ञानदेवांनी जी भक्ती कल्पना मांडली, संत नामदेवांनी ज्या भक्तीचा प्रसार पंढरी ते पंजाबपर्यंत केला, तुकोबांनी ज्या भक्तीचे गोडवे गायले; निळोबांनी त्याच भक्तीचा प्रसार पुढे, दोन शतकांनंतर केला. देव आणि भक्त एक होऊनही भक्तीच्या सुखासाठी वेगवेगळे राहतात ही अद्वैतातील भक्तीची त्यांची कल्पना. त्या भक्तीमुळे आत्मज्ञान प्राप्त होते असा साऱ्या संतांचा अनुभव आहे...

व्यंकटेश स्तोत्र : एकशेआठ ओव्यांची विष्णुपूजा

0
व्यंकटेश स्तोत्र आहे अवघ्या एकशेआठ ओव्यांचे. ते देविदासाने रचले. देविदास स्वतः त्या रचनेला ‘प्रार्थनाशतक’ असे म्हणतो. त्यांतील पहिल्या पाच ओव्या या नमनाच्या आहेत. नमन आहे गणपती, सरस्वती, देविदासाचे गुरू, संत व मुनिजन आणि साक्षात श्रोते यांना. तसेच, अखेरच्या सात ओव्या या स्तोत्राची महत्ता सांगणाऱ्या आहेत...

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची ‘निबंधमाला’(Vishnushastri Chiplunkar’s Nibandhamala)

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या ‘निबंधमाले’स महत्त्वाचे स्थान मराठी वाङ्मय व साहित्य यांच्या इतिहासात आणि एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय विचारांच्या क्षेत्रात आहे. त्या ‘निबंधमाले’ने महाराष्ट्रातील विचारांना नवी दिशा व वळण दिले. ‘निबंधमाला’ नावाचे नियतकालिक होते. नियतकालिकांचा उदय ही त्या काळातील क्रांतिकारक घटना होय...

कथा कोल्हापूरातील पोलिश आश्रितांची – गांधी नगरची (Polish migrants during II world war in...

हिटलरचा प्रभाव पोलंड, हंगेरी, झेकोस्लाव्हाकिया वगैरे देशांत वाढू लागला तसतसे तेथील नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने स्थलांतरित झाले व दोस्त राष्ट्रांच्या आश्रयाला आले. इंग्लंडच्या आश्रयास आलेल्या पोलिश लोकांना भारतात आणून त्यांची व्यवस्था कोल्हापूरजवळ वळिवडे कँपात केली गेली. जो परिसर आता गांधीनगर म्हणून ओळखला जातो...

हिंदळे येथील कार्तिकस्वामी मंदिर (Kartikswami Temple at Hindale in Sindhudurg)

कार्तिकेय देवतेचा उल्लेख वेदवाङ्मयात अपवादाने आढळतो. मात्र तो अनेक पुराणांतून दिसतो. त्याची मंदिरे महाराष्ट्रात तुरळक आहेत, मात्र ती देशाच्या दक्षिण भागात सर्वत्र दिसतात...

खिलाफत चळवळ आणि निजाम (Khilafat Movement & Nizam)

तुर्कस्थानच्या ऑटोमन साम्राज्यात एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस घटनात्मक लोकशाहीसाठी राजकीय सुधारणांच्या मागणीकरता तरुण तुर्कांची (यंग टर्क्स) चळवळ सुरू झाली.

हैदराबादचा स्वातंत्र्यलढा (Hyderabad’s freedom struggle)

0
भारतात सुमारे चारशेसाठ देशी संस्थाने होती. त्यांपैकी पंधरा-सोळा संस्थाने बरीच मोठी होती. हैदराबाद, म्हैसूर व काश्मीर ही तीन त्यांपैकी. हैदराबादचे एकूण क्षेत्रफळ ब्याऐंशी हजार सहाशेअठ्ठ्याण्णव चौरस मैल आणि तेथील लोकसंख्या एक कोटी त्रेसष्ट लाख अडतीस हजार होती.

सालंदार मजूर – वेठबिगारीचे वेगळे रूप (Contract labour, nothing but bonded labour)

शेतमालक त्याच्या शेतात कामावर गावातील गरीब स्त्री-पुरूषांना ठेवतात. शेतात काम करणाऱ्या मजुरांचे साधारणपणे तीन प्रकार असत- 1. रोजंदार, 2. महिनादार, 3. सालंदार. शेतमालक त्याच्या शेतात कामावर गावातील गरीब स्त्री-पुरूषांना ठेवतात. शेतात काम करणाऱ्या मजुरांचे साधारणपणे तीन प्रकार असत- 1. रोजंदार, 2. महिनादार, 3. सालंदार.