वि.द. घाटे यांचे पुष्कळसे लेखन स्वान्त सुखाय झालेले आहे. त्यांच्या लेखनात त्यांचे उत्कट, पण दिलखुलास व्यक्तिमत्त्व, सौंदर्यदृष्टी, इतिहासप्रेम, जीवनाविषयीची आंतरिक ओढ आणि अभिजात रसिकता यांचा मिलाफ झालेला दिसतो. घाटे यांच्या सुटसुटीत, रसपूर्ण आणि लयदार लेखनशैलीच्या साहित्याने स्वतःचा वेगळा ठसा मराठी साहित्यात उमटवला…