सोलापूर शहरात 8 मे 1930 रोजी इंग्रजी हत्यारी पोलिसांकडून जालियनवाला बागेची छोटी आवृत्ती घडली होती. सोलापुरात जे हत्याकांड सरकारने घडवले होते, त्याची खबर जगाला नव्हती. पंचवीसाहून अधिक बळी त्यात गेले होते. सोलापूरचे ते गाऱ्हाणे जगाच्या वेशीवर टांगले रामचंद्र शंकर उपाख्य रामभाऊ राजवाडे यांनी. त्यांचे वृत्तपत्र होते ‘कर्मयोगी’ या नावाचे...
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या ‘निबंधमाले’स महत्त्वाचे स्थान मराठी वाङ्मय व साहित्य यांच्या इतिहासात आणि एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय विचारांच्या क्षेत्रात आहे. त्या ‘निबंधमाले’ने महाराष्ट्रातील विचारांना नवी दिशा व वळण दिले. ‘निबंधमाला’ नावाचे नियतकालिक होते. नियतकालिकांचा उदय ही त्या काळातील क्रांतिकारक घटना होय...
सोलापूरचे स्वातंत्र्यसैनिक डॉ. कृ.भी. अंत्रोळीकर हे राष्ट्रीय चळवळीकडे विद्यार्थिदशेतच ओढले गेले होते. अंत्रोळीकर यांना गांधीजींची धडपड नेमकी भावली होती. गांधीजींचे सारे प्रयत्न सामान्यातील सामान्य माणूस त्या चळवळीत समाविष्ट करावा यासाठी होती. त्यामुळे अंत्रोळीकर यांनी आयुष्यभर तो मार्ग अनुसरला. तोपर्यंत सोलापूरमधील चळवळ ही प्रामुख्याने उच्च शिक्षितांची होती...
‘दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी’ ही आरती चुकीच्या पद्धतीने अनेकदा म्हटली जाते, कारण त्या रचनेचा अर्थ माहीत नसतो, त्यामागील संकल्पना माहिती नसते. त्या आरतीमध्ये कवीने मांडलेला विचार मुळातून समजून घेण्यासारखा आहे. महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय अशी ती आरती आहे. तेलंगणातील नरहर मालुकवी यांची ती रचना आहे...
शांतीसागर श्री संत रामजी महाराज नावाचे साधू पुरुष अमरावती जिल्ह्यात बग्गी (जावरा) या गावी होऊन गेले. त्यांना शांतीचा कल्पवृक्ष म्हणत. त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना समानतेची शिकवण दिली, त्यांनी आमलोकांमध्ये आध्यात्मिक व नैतिक मूल्यांची बीजे रोवली हे त्यांचे खास वैशिष्ट्य...
नाटक, दशावतार, भारूड, कीर्तन असे कोणतेही नवनवे कलाप्रकार एकाएकी जन्माला आलेले नाहीत. त्यांना पूर्व परंपरा आहे. ते घटक आणि काळाबरोबर विकसित होत असलेल्या नवनवीन कल्पना यांच्या एकत्रीकरणातून नवे ताजे काही जन्माला येते...
श्रीराम भिकाजी वेलणकर हे ‘पिनकोड’चे जनक म्हणून ओळखले जातात. ‘पिनकोड’शी प्रत्येक भारतीयाचे नाते घट्ट जोडलेलेआहे. त्याच्या नावासमोर नुसता पिनकोड नंबर लिहिला, तरी ती व्यक्ती देशाच्या कोणत्या भागात राहते हे कळून येते.
रामा राघोबा राणे यांचा जन्म धारवाड जिल्ह्याच्या हवेली या गावी 1918 साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा बोर्डाच्या शाळेत व पुढील शिक्षण उत्तर कन्नड जिल्ह्यातील चेंदिया या गावात झाले. त्यांचे वडील राघोबा राणे हे पोलिस दलात कॉन्स्टेबल होते.
काश्मिरमधील प्रवासात मला अचानक रामा राघोबा राणे चौक व त्यास अनुरूप असा जयस्तंभ दिसला, त्याची ही गोष्ट. मी राजौरीत राहत होतो. राजौरी ते श्रीनगर हा अकबर बादशहाच्या काळातील मोगल मार्ग म्हणून परिचित आहे.
स्वतंत्र भारताने पाच युद्धे लढली. त्यांपैकी 1962 साली चीन बरोबर झालेले युद्ध हे पराभूताचा इतिहास म्हणून ओळखले जाते. तरीही त्या युद्धात भारतीय सैनिकांचे शौर्य समोर आले.