एकोपा हे फलटणच्या श्रीराम रथोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. तो सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी, संस्थान काळात फलटण संस्थानच्या अधिपती श्रीमंत सगुणामाता यांनी सुरू केला. फलटणच्या या रथोत्सवातून भारतातील धर्म सहिष्णुतेचे दर्शन घडते. रथयात्रेचे स्वरूप सुरुवातीपासूनच मोठे भव्यदिव्य असे आहे. यात्रा जवळपास दहा दिवस चालते...
शिमग्याच्या म्हणजेच होळीच्या सणाच्या उत्सवातील ‘पिसईचा नकटा’ दापोलीत लोकप्रिय आहे. नकटा म्हणजे देवीचा रखवालदार. नकट्याचे सोंग घेणारी व्यक्ती लाकडी मुखवटा घालते. तो मुखवटा काजूच्या झाडाच्या खोडापासून बनवलेला असतो. तो परंपरेने चालत आलेला असतो. नकट्याचा मुखवटा पोराबाळांना भीतीदायक वाटतो...
भारताच्या सात लाख खेडेगावांमध्ये महादेवाचे मंदिर नाही असे गाव नसेल ! महादेवाच्या त्या मंदिरांतील भगवंताचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातील महादेवाला वेगवेगळे नाव आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे महाराष्ट्राच्या पोलिस खात्याचे घोषवाक्य आहे. कोळबांद्रे गावातील डिगेश्वरही नेमके तेच काम करतो. गावात कोणी गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल माणसाला त्रास दिला तर ‘आता डिगेश्वराला नारळ देईन’ एवढे वाक्य जरी त्या गरीब माणसाने उच्चारले तरी तो दुष्ट घाबरून जातो...
साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतील अखेरचा आणि निर्णायक लढा पंढरपूरमध्ये लढला गेला. देवतांची मंदिरे म्हणजे सनातन्यांचे बालेकिल्ले. त्या चळवळीत ते बालेकिल्ले काबीज करून, त्यांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले करण्यास महत्त्वाचे स्थान मिळाले. साने गुरुजी यांनी त्यासाठी प्राणांतिक उपोषण केले. त्यातून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाचे महाभारत घडले व त्याची परिणती हरिजनांना मंदिर प्रवेश मिळण्यात झाली...
विधवा स्त्रीला समाजाने कायम दुय्यम स्थान दिलेले आहे. त्या या विधवा प्रथेला बळी पडल्या आहेत. त्या त्या काळातील विचारवंतांनी, समाजसुधारकांनी त्याविरुद्ध आवाज उठवून, त्याबाबत समाजात प्रबोधन केले, चळवळीही उभारल्या. परंतु एकविसाव्या शतकातील विज्ञानवादी व प्रगतशील समाजात विधवा प्रथेसारख्या जोखडात स्त्री भरडली जाते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विधवा प्रथा निर्मूलनासाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे...
दलितांकरवी फलटण तालुक्याच्या गुणवरे आणि जावली या गावांत धडका घेण्याची अघोरी प्रथा दीडशे वर्षांपासून सुरू होती. ती अमानुष प्रथा नष्ट करण्यासाठी महादू गेणू आढाव या लढाऊ कार्यकर्त्याने दलित बांधवांची मोट बांधून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कसोशीचे प्रयत्न केले. अखेरीस प्रशासकीय यंत्रणेच्या साहाय्याने धडका प्रथा बंद करण्यात यश 2006 साली मिळाले...
बोधेगाव येथे भरणारी साध्वी बन्नोमाँ जत्रा हिंदु-मुस्लिम लोक एकत्र येऊन साजरी करतात. दोन्ही समुदायांचे ते श्रद्धास्थान आहे. ती जत्रा १८९८ सालापासून नियमितपणे भरत आहे. अठरापगड जातीच्या लोकांमुळे अनेक प्रकारचे वैविध्य त्या एकाच जत्रेत एकवटलेले आढळते...
बोधेगावातील ‘बानुबाई’ नामक आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत अशी एक मुस्लिम स्त्री म्हणजेच बन्नोमाँ. त्या शिर्डीचे साईबाबा यांच्या समकालीन असून आध्यात्मिक व योगशक्तीच्या धनी होत्या. बन्नोमाँ देवी बोधेगावचे ग्रामदैवत आहे...
गोत्र हा शब्द ‘गौक्षेत्र’ या नावापासून बनला गेला. प्रत्येक परिवारास पशुधन चारण्यासाठी गावातील एक ठरावीक क्षेत्र राखीव असे, त्याला गोक्षेत्र म्हटले जाई. त्या परिवाराची ओळख पुढे त्या क्षेत्रावरूनच होऊ लागली. पुढे त्यालाच गोत्र म्हटले जाऊ लागले...
राजाळे गावात मंदिरे जरी अनेक असली तरी जानाई देवीचे स्थान अनन्य आहे. मंदिरामुळे गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. भाविक श्री क्षेत्र राजाळे नगरीत कर्नाटक, विजापूर, अहमदनगर, परभणी, बीड, चंद्रपूर या ठिकाणांहून येत असतात...