Home वैभव प्रथा-परंपरा

प्रथा-परंपरा

गुढीपूर – काल आणि आज

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना कुडाळमध्ये पिंगुळी हे छोटे कलाग्राम आहे. या पिंगुळी गावात गुढीपूर नावाची ठाकर लोककलाकारांचीची वाडी आहे. ठाकर लोककलाकारांमध्ये पिंगळी, पांगुळ, गोंधळी व बावलेकर असे लोककलाकार आहेत. ते सगळे एकाच समूहाचा भाग असले तरी लोककलेच्या सादरीकरणामधली त्यांची कामे आणि साधने वेगवेगळी आहेत. गुढीपूर वाडीविषयी, तेथील लोककलाकारांविषयी, कलेविषयी आणि जगण्याच्या धडपडीविषयी आत्मियतेने सांगताहेत पिंगुळी, चित्रकथी या लोककलेच्या अभ्यासक माणिक वालावालकर...

कोकणची जाखडी, मॉरिशसची झाकरी (Konkan’s Jakhadi becomes Zhakari in Mauritius)

जाखडी म्हणजेच बाल्या नाच. ती कोकणातील लोककला आहे. त्याला ‘शक्ती-तुरा’ असे म्हणूनही ओळखले जाते. ‘जाखडी नृत्य’ रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांत विशेष प्रसिद्ध आहे. ते गौरीगणपतीच्या सणाला केले जाते. आश्चर्याचा भाग असा, की कोकणातून मॉरिशसला गेलेल्या व तेथे स्थिरावलेल्या मराठी लोकांनीही ती लोककला जपलेली आढळली. कोकणी लोक मॉरिशसमध्ये कामानिमित्त गेले, त्यास पावणेदोनशे वर्षे झाली. कोकणातील जाखडी नृत्य हे मॉरिशसमध्ये ‘झाकरी’ या नावाने ओळखले जाते...

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें …

जगभरच्या अनेक संस्कृतींमध्ये वृक्षांना देवत्व बहाल करून त्यांची पूजा, आराधना केली जाते. ग्रीक संस्कृतीत ऑलिंपिकमध्ये विजयी झालेला माणूस हा वृक्षदेवतेचा प्रतिनिधी आहे असे मानले जात असे. भारतीय संस्कृतीत अनेक वृक्ष पवित्र मानले गेले आहेत. वड, पिंपळ, कडूनिंब, बेल, शमी; अशा अनेक झाडांची वेगवेगळ्या कारणांसाठी पूजा होते. अशीच ग्रामदेवतेची मूर्ती स्थापन न करता दरवर्षी एका फणसाच्या झाडात ग्रामदेवतेला पाहणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावातील अनोख्या वृक्षपूजेविषयी सांगत आहेत सानिका म्हसकर...

धनगरी लोककलांच्या संवर्धनाचा अनोखा अविष्कार

धनगरी लोककला संवर्धनासाठी एक दिवसाचे शिबिर कोल्हापूरजवळ कसबा बावडा येथे झाले. धनगरी लोककलांमधील पंचवीसाहून अधिक प्रकार सुमारे अडीचशे कलाकारांनी सादर केले. तो अनोखा व अफाट आविष्कार ठरला. तीन संस्थांनी एकत्र येऊन एवढा मोठा घाट घातला होता. हालमत सांप्रदाय मंडळ (कुपवाड), शिवाजी विद्यापीठाचे राजर्षी शाहू लोक संस्कृती केंद्र आणि कसबा बावडा येथील बिरदेव धनगर समाज मंडळ या त्या तीन संस्था...

जाल तुम्ही जालगावी सुज्ञ बनोनी!

दापोली-जालगावची हनुमान जयंती भैरी देवाच्या जत्रेने मोठी होते. त्या ठिकाणी जालगाव, गव्हे आणि गिम्हवणे अशा तीन गावांचे मनोमिलन होते ! दोनशे वर्षांची ही केवढी थोर परंपरा आहे. एरवीही दापोलीचे उपनगर असे जालगाव गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढले आहे. बारा वाड्या आणि तीस नगरे असा त्याचा पसारा झाला आहे...

सर्व जातिधर्माचा एकोपा जपणारा श्रीराम रथोत्सव

एकोपा हे फलटणच्या श्रीराम रथोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. तो सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी, संस्थान काळात फलटण संस्थानच्या अधिपती श्रीमंत सगुणामाता यांनी सुरू केला. फलटणच्या या रथोत्सवातून भारतातील धर्म सहिष्णुतेचे दर्शन घडते. रथयात्रेचे स्वरूप सुरुवातीपासूनच मोठे भव्यदिव्य असे आहे. यात्रा जवळपास दहा दिवस चालते...

दापोलीतील पिसईचा नकटा

शिमग्याच्या म्हणजेच होळीच्या सणाच्या उत्सवातील ‘पिसईचा नकटा’ दापोलीत लोकप्रिय आहे. नकटा म्हणजे देवीचा रखवालदार. नकट्याचे सोंग घेणारी व्यक्ती लाकडी मुखवटा घालते. तो मुखवटा काजूच्या झाडाच्या खोडापासून बनवलेला असतो. तो परंपरेने चालत आलेला असतो. नकट्याचा मुखवटा पोराबाळांना भीतीदायक वाटतो...

कोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा आनंदोत्सव !

1
भारताच्या सात लाख खेडेगावांमध्ये महादेवाचे मंदिर नाही असे गाव नसेल ! महादेवाच्या त्या मंदिरांतील भगवंताचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातील महादेवाला वेगवेगळे नाव आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे महाराष्ट्राच्या पोलिस खात्याचे घोषवाक्य आहे. कोळबांद्रे गावातील डिगेश्वरही नेमके तेच काम करतो. गावात कोणी गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल माणसाला त्रास दिला तर ‘आता डिगेश्वराला नारळ देईन’ एवढे वाक्य जरी त्या गरीब माणसाने उच्चारले तरी तो दुष्ट घाबरून जातो...

विधवा स्त्रियांची उपेक्षा – दोनशे वर्षांचा प्रतिकार! (History of social reforms against ill treatment...

विधवा स्त्रीला समाजाने कायम दुय्यम स्थान दिलेले आहे. त्या या विधवा प्रथेला बळी पडल्या आहेत. त्या त्या काळातील विचारवंतांनी, समाजसुधारकांनी त्याविरुद्ध आवाज उठवून, त्याबाबत समाजात प्रबोधन केले, चळवळीही उभारल्या. परंतु एकविसाव्या शतकातील विज्ञानवादी व प्रगतशील समाजात विधवा प्रथेसारख्या जोखडात स्त्री भरडली जाते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विधवा प्रथा निर्मूलनासाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे...

…आणि भैरवनाथाच्या धडका बंद झाल्या!

दलितांकरवी फलटण तालुक्याच्या गुणवरे आणि जावली या गावांत धडका घेण्याची अघोरी प्रथा दीडशे वर्षांपासून सुरू होती. ती अमानुष प्रथा नष्ट करण्यासाठी महादू गेणू आढाव या लढाऊ कार्यकर्त्याने दलित बांधवांची मोट बांधून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कसोशीचे प्रयत्न केले. अखेरीस प्रशासकीय यंत्रणेच्या साहाय्याने धडका प्रथा बंद करण्यात यश 2006 साली मिळाले...