उद्धृते

'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'वर 'उद्धृते' नावाचे नवे सदर सादर करत आहोत. आमच्या हाती विविध मार्गांनी येणारे ज्ञानकण व भावकण वाचकांपर्यंत पोचवण्याची इच्छा असते. त्यातून अर्थातच त्यांच्या मनी वैचारिक व भावनिक आंदोलने उमटावीत व त्यांनी ती व्यक्त करावीत असेही मनात आहे...

प्राजक्ता दांडेकर – विज्ञान संशोधनाची नवी दिशा (Prajakta Dandekar: Organ On Chips Technology)

कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. काही देशांनी संभाव्य औषधांच्या मानवावरील चाचण्यांना आरंभही केला आहे. सध्याच्या अपवादात्मक परिस्थितीत मानवांवरील या औषधांच्या चाचण्यांबद्दल फारसे कोणी आक्षेप घेतलेले नाहीत.
_rangoli

महागाव – रांगोळी कलेचे गाव

कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यामधील ‘महागाव’ला रंगांच्या उधळणीचा, ‘रांगोळींचा वारसा’ लाभला आहे! तोही फार जुना नव्हे, जेमतेम चाळीस वर्षांचा, पण तो मुरला आहे असा, की...
_plastic_no_bandi

प्लास्टिक मुक्तीचा निर्धार! – किती सच्चा!

0
भारतीय संसदेने महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीदिनापासून म्हणजे 2 ऑक्टोबर 2019 पासून भारतात प्लास्टिकच्या वस्तूंवर संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ती गोष्ट...
_mashid_vitthal_patil

मशिदीसाठी ‘विठ्ठला’चा हातभार!

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्याच्या जकेकूर गावातील मशिदीच्या बांधकामाला चक्क ‘विठ्ठला’चा हातभार लागला आहे! जकेकूरमध्ये सदुसष्ट वर्षीय विठ्ठल पाटील यांच्या पुढाकारातून भव्य मशीद बांधण्यात आली...
_d._b_kulkarani

द.भि. कुलकर्णी – समीक्षेचा सृजनव्यवहार (D.B. Kulkarni Marathi Critic)

द.भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम होते. त्याचमुळे त्यांची निवड त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यात 2010 साली झाली होती. समीक्षक ही त्यांची पहिली ओळख, तर जाणकार संगीत श्रोता आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक हे त्यांचे आणखी काही खास पैलू. द.भि. कुलकर्णी हे समाजातील वास्तव स्पष्ट शब्दांत मांडत. ते वाचकांना सांगत असे, की “आजच्या विज्ञानयुगात असून तुम्ही वैज्ञानिक दृष्टी स्वीकारत नाही, तर मनोरंजनाची दृष्टी स्वीकारता. तुम्ही दूरदर्शनवर करमणुकीचा कार्यक्रम पाहत असाल तर त्याचा आनंद घेणे बरोबर आहे, मग ते नृत्य असो, संगीत असो किंवा नाटक, सिनेमा, क्रिकेटची मॅच, काहीही. पण तुम्ही करमणूक म्हणून भूकंप, अवर्षण, अपघात, दहशती हल्ले यांची दृश्येही पाहत असाल तर तुमची संवेदना बोथट झाली आहे, असे मी समजतो...
_suryachi_parikrama

चला, सूर्याची परिक्रमा अनुभवू या… (Let’s Experience the orbit of the Sun)

सूर्य हा आकाशात संक्रमण करत असतो. फार फार पूर्वीच्या काळी, काही माणसे निसर्गाचे निरीक्षण करत असताना, त्यांना सूर्य काही वेळा वेगवेगळ्या महिन्यांमध्ये ठरावीक वेळी...
_panyache_khajgikaran

पाण्याचे खाजगीकरण : दशा आणि आशा (Privatization of Water: Condition and Hope)

पाण्याच्या खाजगीकरणाचा पुरस्कार भारताच्या राष्ट्रीय जलनीतीमध्ये करण्यात आला आहे. खाजगीकरणाचा प्रयोग दिल्लीसारख्या राज्यात करण्यातही आला आहे. पाण्याची मुक्त बाजारपेठ पाण्याचे दर ठरवील; भाव वाढले,...
_janbhalache_akhyan

मुजरा शाहिराला – विठ्ठल उमप यांना!

0
शाहीर विठ्ठल उमप यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळाला तेव्हा आमच्या बिरादरीतील माणसाला पुरस्कार मिळाल्यामुळे विशेष आनंद झाला होता, तो अजून आठवतो. ‘संगीत नाटक...
_vishnu_devta

विष्णूचे उपासक – वैष्णव संप्रदाय (Vishnu Worshiper – Vaishnava sect)

विष्णू आणि त्याचे राम व कृष्ण हे दोन मुख्य अवतार यांची आराधना करणारा तो वैष्णव संप्रदाय. नारायण-विष्णूमधील नारायण या देवाचा उल्लेख प्रथम ‘शतपथ ब्राह्यण’...