Home Authors Posts by विनीता वेल्हाणकर

विनीता वेल्हाणकर

5 POSTS 0 COMMENTS
विनीता वेल्हाणकर यांचे एम ए पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी बँकेत तेहेतीस वर्षे नोकरी केली आणि 2011 साली स्वेच्छानिवृत्ती पत्करली. त्यांचे पती चार्टर्ड अकाउंटट आहेत. त्यांची मुलगी मानसी व तिचा परिवार अमेरिकेत आणि मुलगा अमेय व त्याची पत्नी लंडनला वास्तव्यास आहेत. विनीता यांना वाचनाची आवड आहे. तसेच, त्यांचा शेअर मार्केटचाही अभ्यास आहे.

ज्ञानव्रती गीता गोरेगावकर-गोडबोले (Geeta Goregaonkar-Godbole – The Researcher)

गीता गोरेगावकर-गोडबोले या ज्ञानव्रती आहेत. त्यांचा ध्यास वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यास व संशोधन हा आहे. गीता यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थमधून डॉ. दीपक मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली Ph.D. केली.

कॅनडात कोरोनाविरुद्ध सरकार तत्पर (Canada’s Govt. Controls Corona)

कोरोनाची साथ काही देशांत आटोक्यात येऊ लागली आहे. त्यांतील एक देश आहे कॅनडा. कॅनडा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. तो भारताच्या तिप्पट मोठा आहे. पण तेथील लोकसंख्या आहे अवघी साडेतीन कोटी. त्यांना उरलेली अर्धी जमीनसुद्धा पुरेशी आहे.

कोरोना: अमेरिकेत वातावरण संभ्रमाचे (Corona – People Confused in US)

अमेरिका दोन आघाड्यांवर लढाई लढत आहे.  एक कोरोनाविरुद्ध आणि दुसरी लढाई म्हणता येणार नाही, परंतु नोव्हेंबरमध्ये होणारी अध्यक्षीय निवडणूक. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांत इतक्या गुंतल्या आहेत, की मास्क वापरायचे की नाही याबद्दलची साधी सूचना वैद्यकीय अधिकारी आणि राजकारणी लोक या दोघांकडून दिली जात आहे!

लंडन खूप दूर आहे… (Corona Experience in Britain)

कोरोनासंबंधात लंडन येथे राहत असलेल्या वेल्हाणकर व दळवी कुटुंबीयांशी संपर्क साधला. अमेय आणि तेजश्री वेल्हाणकर या पतिपत्नींनी तेथील माहिती दिली. पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये 29 जानेवारी 2020 रोजी आढळला. बरेच लोक डिसेंबरच्या शेवटी व जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत इटाली, ऑस्ट्रिया अशा युरोपीयन देशांत सहलीसाठी जातात.

प्राजक्ता दांडेकर – विज्ञान संशोधनाची नवी दिशा (Prajakta Dandekar: Organ On Chips Technology)

कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. काही देशांनी संभाव्य औषधांच्या मानवावरील चाचण्यांना आरंभही केला आहे. सध्याच्या अपवादात्मक परिस्थितीत मानवांवरील या औषधांच्या चाचण्यांबद्दल फारसे कोणी आक्षेप घेतलेले नाहीत.