तूर : दुष्काळावर उपाय (Tur as a crop may relieve famine conditions)
तूर ही बहुगुणी आहे हे आपल्याला कळते, पण वळल्याचे पुरावे दिसत नाहीत. चीनमध्ये दुष्काळावर मात करण्यासाठी तुरीचा सर्वोपयोगी वापर केला जात आहे. चीनला तुरीचे बियाणे पुरवणारे ‘इक्रिसॅट’ व संशोधक, दोघेही भारतामधील असूनही भारतीय कृषी व्यवस्थापकांना काहीच का जमत नाही…
सीमावादाचे मूळ – मॅकमोहन रेषा
सीमावादाचे मूळ आहे मॅकमोहन रेषा. चीनने ती कधीही मान्य केलेली नाही. ब्रिटिशांनी निर्माण केलेला तो वाद मिटवण्यासाठी देवघेव करावी लागेल, त्याशिवाय तो कधीही मिटणार नाही...
माझा संगीत सत्संग
संगीत हे क्षेत्र व्यापक, विस्तीर्ण आहे, ते मानवनिर्मित आहे; त्यात साक्षात्कारी क्षण/अनुभव असले तरी ते माणसांनी अनुभवलेले असतात आणि त्यांनीच ते आत्मसात करून गळ्यातून/वाद्यांमधून प्रथमतः स्वतःच्या आनंदासाठी आणि परिणामस्वरूप म्हणून श्रोत्यांशी तो आनंद वाटून घेण्यासाठी साकारलेले असतात...
टिळक-गांधी आणि त्यांचा निर्भयतेचा वारसा
लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांचा वारसा महत्त्वाचा आहे. लोकमान्यांनी स्वतंत्र देशात जगण्याचा लोकांना अधिकार आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवून देशाचे स्वातंत्र्य हे महत्त्वाचे मूल्य प्रस्थापित केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांचा आग्रह हा देशाच्या भावी घटनात्मक व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग ठरला. गांधीजींनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यासाठी स्वावलंबन यांचा पुरस्कार केला. गांधीजींचा दुसरा मूल्यसंस्कार हा समतेचा आहे. गांधीजींचा आग्रह धर्म हा लोकांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक व्यवहारातून बाजूला ठेवावा हा होता...
नटसम्राट – एक प्रतिक्रिया
- वि.वा.शिरवाडकर आणि त्यांनी लिहिलेले ‘नटसम्राट’ हे नाटक या दोहोंबद्दल अपार भक्तिभाव मराठी प्रेक्षकांच्या मनात दिसतो. पण बरेचदा नाटकाचीच मोजपट्टी लावून नटसम्राट चित्रपटाचे मूल्यमापन केले जाते आणि घोटाळा तेथेच होतो...
साम्यवाद कधीच मेला आहे
साम्यवाद कधीच मेला आहे ! त्याची मुख्य सूत्रे दोन होती- 1.राजकीय सत्ता फक्त कामगारवर्गाच्या हातात असावी, 2. उत्पादनाची सर्व साधने समाजाच्या मालकीची असावीत...
हिंदू राष्ट्र असेल तरी कसे ?
‘हिंदू राष्ट्राची’ चर्चा 2014 पासून म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून अधिकच जोमाने झाली. अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल, ट्रिपल तलाक सारखे कायदे रद्द होणे आणि नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती यामुळे तर अधिकच व्यापकपणे ही चर्चा होऊ लागली. पण ‘हिंदू राष्ट्र’ म्हणजे काय?
ओरिया- मराठी नाते
कोणत्याही नवख्या प्रांताशी ओळख करून घेण्याची पहिली पायरी म्हणजे तेथील स्थानिक भाषा. मी ओरिया भाषेचे प्राथमिक शिक्षण मसुरीच्या आयएएस प्रशिक्षणादरम्यान सौदामिनी भुयाँ यांच्याकडून घेतले होते. त्यांची शिकवण्याची पद्धत छान होती...
दत्त देवतेचे विविधांगी दर्शन
भगवान दत्तात्रेय ही भारतीय संस्कृतीतील अद्भुत निर्मिती आहे ! ते अत्री व अनसूया यांचे पुत्र आणि विष्णूचे अंश होत. दत्तात्रेयांचा प्रभाव शैव, वैष्णव, शाक्त या तिन्ही प्रमुख उपासना प्रवाहांना व्यापून उरणारा आहे. दत्तात्रेयांविषयीचा उत्कट श्रद्धाभाव महानुभाव, नाथ, वारकरी, समर्थ अशा वेगवेगळ्या संप्रदायांतही आहे...
‘जीवना’सह सहजीवन
माधव आत्माराम चितळे हे जागतिक कीर्तीचे मराठी जलतज्ज्ञ आहेत. त्यांचा विवाह आशा पटवर्धन (विजया चितळे) यांच्याशी झाला. विजया चितळे (आशा पटवर्धन) यांच्या सहजीवनाबद्दल अपर्णा चितळे यांनी घेतलेली त्यांची ही मुलाखत...