उच्च शिक्षण, संशोधन – काही प्रश्न काही उत्तरे…
देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली. मात्र शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट समजून घेतले जात नाही. शिक्षण हे पदवी-सर्टिफिकेट घेण्यासाठी अन् पर्यायाने नोकरीसाठी गरजेचे म्हणून घेतले जाते. ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण हे मूळ उद्दिष्ट बाजूला राहते. त्यामुळे शिकवणारे, शिकणारे या सर्वांची दिशाभूल होते. सगळे लक्ष मार्क्स, श्रेणी, पर्सेंटेज यांकडे लागलेले. परीक्षांचे नियोजनदेखील त्या उद्दिष्टाने केले जाते. कोणतीही परीक्षा विद्यार्थी काय, कसे शिकला हे तपासत नाही...
शिक्षण कशासाठी- हे समजेल का?
शिकवण्याची नव्हे तर शिकण्यासंबंधीची आव्हाने या शतकात वाढत जाणार आहेत. भारतीय शिक्षणव्यवस्था ‘टीचिंग’चा विचार करते; सगळा भर अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर असतो. विद्यार्थी काय व किती शिकला याचा विचार फारसा नसतो. त्याच्या शिक्षणाचे मूल्यमापन ज्या परीक्षांद्वारे होते त्याही कुचकामाच्या आहेत. शास्त्र, विज्ञान समजून घेणे खूप कठीण नाही, पण ते तसे सोपेदेखील नाही ! शिकणे याचा अर्थ पुस्तकातून माहिती गोळा करणे, दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे हा नव्हे ...
उमटू दे एखादी स्मितरेषा ! (Let there be smile !)
माणसाला एकटा असताना, त्याच्या मनाला, मनापासून जे करायला आवडते तो त्याचा छंद. समाज माध्यमांचे अधिराज्य असलेल्या सध्याच्या काळात मनोरंजनाची समीकरणे बदलली आहेत. व्यक्तीला काय आवडायला पाहिजे याचा विचार करायला वाव न ठेवता, त्याच्यावर तथाकथित ‘मनोरंजन’ आदळले जाते. काळाच्या ओघात, आम जनता त्याच्या अधीन झालेली दिसते. या सध्याच्या ‘हलक्या फुलक्या’ मनोरंजनाबाबत गांभीर्याने विचार करायला पाहिजे...
सोशल मीडिया : वरदान की बुमरँग ? (Social Media : a...
संवाद माध्यमांच्या विपुलतेनंतर माणसे जोडली जाण्याऐवजी दुरावत चालली आहेत. संध्याकाळी घरी एकत्र जेवण करत दिवसभराच्या घटना एकमेकांना सांगणारे कुटुंबीय त्यांच्या त्यांच्या खोल्यांत ज्याचा त्याचा हँडसेट हातात घेऊन किंवा पीसीवर बसलेले आढळतात. लोकांतील परस्परसंवाद वाढला आहे. मात्र त्याच वेळी माणूस टोकाचा आत्मकेंद्री, प्रसंगी स्वार्थी आणि एकलकोंडाही झालेला दिसतो. सोशल मीडियाचे नकारात्मक परिणाम विवेकीपणे टाळून केवळ सकारात्मक लाभ घेणे शक्य आहे...
मध्यमवर्गीय बौद्धांची जबाबदारी
दलित पँथरच्या बहराच्या काळात आणि त्यानंतरही बराच काळपर्यंत, बौद्ध वस्तीत होळी, गणपती, नवरात्र असे सण सार्वजनिक रीत्या साजरे करण्याची कोणाची टाप नव्हती. हिंदू देवतांचे आणि चालीरीतींचे आम्हा बौद्धांच्या घरांतील अस्तित्व समूळ नष्ट करणे हे आमचे परमकार्य होते. त्याची एक झिंग होती. बावीस प्रतिज्ञा अमलात आणणे हे आमचे जीवनसाफल्य होते. आता, त्याच बौद्ध वस्त्यांत तरुणाई आंबेडकर जयंतीच्या बेफाम मिरवणुका डीजे लावून संघटित करते. सगळे रस्ते, गल्ल्या निळ्या होतात. नेत्रदीपक रोषणाई आणि भीमगीते यांनी माहोल उत्साहाने ओसंडत असतो...
नवा मानुष वाद
एकविसाव्या शतकाने लैंगिकतेच्या उधाणाचे, नातेसंबंधांच्या बाजारीकरणाचे आणि क्षणभंगुरतेचे वादळ आणले आहे, हे खरे आहे. परंतु ते पचवले जाईल आणि स्त्री-पुरुष व अन्य ह्यांनी परस्परांसोबत प्रेम, आदर व जिव्हाळा या भावनेने राहवे, शोषण व नियंत्रण ह्यांपासून मुक्त, निरामय जीवन जगावे ही आस कोणत्याही शतकात कायमच राहील. ‘नवा पुरुष’ समाज आणि साहित्य ह्यांच्या दृष्टिक्षेपात यावा व तो इतका व्यापक व्हावा की त्याचे ‘नवे’पण सार्वजनिक होऊन जावे...
एकविसाव्या शतकातील स्त्री-पुरुष संबंध
जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा व प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत घडून आला आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचा पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे. जागतिकीकरणानंतर भारतात अनेक पातळ्यांवर परिवर्तन झाले. त्यांपैकी काही बदल उत्पाती व प्रपाती स्वरूपाचे आहेत. त्यांतील मूलभूत स्वरूपाचा, पण सर्वात दुर्लक्षित बदल हा भारतीयांच्या लैंगिकताविषयक जाणिवा, धारणा व व्यवहार ह्यांत झाला आहे. त्या प्रक्रियेची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व त्याचे लक्षणीय परिणाम एकविसाव्या शतकात जाणवू लागले. ती प्रक्रिया अजून संपलेली नाही...
ट्रेंडिंग काय? – लिव्ह इन रिलेशनशिप ! (Is Live In Relationship good alter active...
भारतात लग्नपद्धत अजून टिकून आहे, पण प्रत्येकाच्या मनाच्या तळाशी पाहिले तर सत्य लक्षात येते. ते हे, की जोडप्यांमध्ये एकाची सहनशक्ती संपलेली आहे ! पती-पत्नींच्या नात्याचे नाविन्य टिकत नाही. लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज ही वैयक्तिक निवड आहे – प्रेम ही संकल्पना जुन्या काळापासून आहे. विवाहाचे रूपांतर प्रेमात आणि वैवाहिक संबंध म्हणजे दोन घरे एकत्र येणे हे लग्नात पूर्वी अपेक्षित असे. तरुणाईची मते बदलली आहेत- त्यांचा लग्नावर विश्वास राहिलेला नाही असे निरीक्षण आहे...
जगाला प्रेम अर्पावे ! (Offer love to the World)
समाजात सगळीकडे अस्वस्थता पसरलेली असताना, सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काय करायला हवे? संवेदनशीलतेने विचार करणाऱ्या माणसांच्या मनात असा प्रश्न असंख्य वेळा उद्भवतो. त्याचे समीकरणातून देण्यासारखे उत्तर नाही. समाजाच्या परीघामध्ये ज्ञान, धर्म, राजकारण, लैंगिकता, स्त्री-वाद, पुरुषप्रधानता अशा क्षेत्रांतील विचारांचे सत्य समजून घेण्यासाठी, संकुचित विचार आणि वर्तन याबाबत सजगता येण्यासाठी सर्वांनी कार्यरत झाले पाहिजे...
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती शक्य आहे? (Eco-Friendly Ganesh Idol – An Illusion)
महाराष्ट्रात काही चर्चाविषय कधीच संपत नाहीत, कारण त्यावर रास्त निर्णय केला जात नाही. गणपतीच्या ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’मधील मूर्ती व पर्यावरण हा तसाच एक विषय. या संबंधातील गेल्या वीस वर्षांतील घटनांचा आढावा घेऊन वस्तुस्थिती काय आहे ते पेणचे गणेश मूर्तिकार श्रीकांत देवधर यांनी या लेखात मांडले आहे. पर्यावरणप्रेमी लोकांनी लेखातील मुद्दे जाणून घेऊन त्यांची निरीक्षणे वेगळी असतील तर जरूर मांडावी. मात्र त्यास वास्तवाचा आधार असावा...