एकविसाव्या शतकातील स्त्री-पुरुष संबंध

जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा व प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत घडून आला आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचा पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे. जागतिकीकरणानंतर भारतात अनेक पातळ्यांवर परिवर्तन झाले. त्यांपैकी काही बदल उत्पाती व प्रपाती स्वरूपाचे आहेत. त्यांतील मूलभूत स्वरूपाचा, पण सर्वात दुर्लक्षित बदल हा भारतीयांच्या लैंगिकताविषयक जाणिवा, धारणा व व्यवहार ह्यांत झाला आहे. त्या प्रक्रियेची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व त्याचे लक्षणीय परिणाम एकविसाव्या शतकात जाणवू लागले. ती प्रक्रिया अजून संपलेली नाही...

पुणेरी पगडीची प्रतिष्ठा!

1
पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने ब्रिटिशकालीन पोशाख बदलण्याचा निर्णय एकशेचौदाव्या पदवीदान सोहळ्यात, 2018 सालापासून घेतला आहे. ब्रिटिशकाळात पदवीदान सोहळ्यासाठी लाल, काळा घोळदार गाऊन आणि झुपकेदार...
_arey_think_sulakshna_mahajan

आरेमध्ये झाडेतोड झाली… पण मेट्रोचा मार्ग मोकळा होऊन गेला !

आरे वसाहतीमधील झाडे आणि मुंबई मेट्रोची कारशेड यांवरून मुंबईकरांमध्ये दोन तट पडून गेले काही आठवडे चांगलीच जुंपली होती. काही लोकांनी उच्च न्यायालयात तीन-चार मुद्दे...

अशी असावी शाळा!

6
शिक्षण व शाळा कशा असाव्यात याबाबत निर्णय करण्याचा अधिकार कोणाचा? सध्या, तो अधिकार विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नाही. तो शिक्षक-शाळांचे चालक-शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण खात्यातील...

मध्यमवर्गीय बौद्धांची जबाबदारी

0
दलित पँथरच्या बहराच्या काळात आणि त्यानंतरही बराच काळपर्यंत, बौद्ध वस्तीत होळी, गणपती, नवरात्र असे सण सार्वजनिक रीत्या साजरे करण्याची कोणाची टाप नव्हती. हिंदू देवतांचे आणि चालीरीतींचे आम्हा बौद्धांच्या घरांतील अस्तित्व समूळ नष्ट करणे हे आमचे परमकार्य होते. त्याची एक झिंग होती. बावीस प्रतिज्ञा अमलात आणणे हे आमचे जीवनसाफल्य होते. आता, त्याच बौद्ध वस्त्यांत तरुणाई आंबेडकर जयंतीच्या बेफाम मिरवणुका डीजे लावून संघटित करते. सगळे रस्ते, गल्ल्या निळ्या होतात. नेत्रदीपक रोषणाई आणि भीमगीते यांनी माहोल उत्साहाने ओसंडत असतो...

मी हिंदू आहे म्हणजे मी कोण आहे?

हिंदू धर्म हा हत्ती आणि सहा आंधळे यांच्या गोष्टीतील हत्तीसारखा आहे. अंध मनुष्य हत्तीच्या ज्या भागाला हात लावतो तो म्हणजेच हत्ती आहे असे त्या प्रत्येकाला वाटत असते. परंतु लेखकाला हत्तीचे संपूर्ण स्वरूप जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे तो म्हणतो, “मी हिंदू आहे म्हणजे कोण आहे, हे मला अद्याप सापडलेले नाही..."

मराठी भाषा आणि अभिजातता

मराठी भाषकांना त्यांच्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला की ते कृतकृत्य होऊन जातील, असा सुखवाद सध्या महाराष्ट्र देशी साद घालत आहे ! अभिजाततेचा हा प्रश्न नेमका काय आहे?

बहिष्कृत भारत : दलितत्वाची नवी जाणीव (Bahishkrut Bharat- Babasaheb Ambedkar’s thought breaking...

बाबासाहेब आंबेडकर त्यांचा अभ्यास पुन्हा सुरू करण्यासाठी लंडनला 1920 साली जुलै महिन्यात गेले. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. बाबासाहेब स्वत: शिक्षण घेत असतानाही भारतात काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत राहिले. त्यांनी जर्मनीलाही प्रवास केला. तेथे त्यांनी बॉन विद्यापीठात संस्कृतचा अभ्यास केला. लंडनमध्ये, त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या मेळाव्यात ‘भारतातील जबाबदार सरकारच्या जबाबदाऱ्या’ नावाचा विचारप्रवर्तक शोधनिबंध सादर केला. त्यांची मुख्य चिंता भारतातील एक तृतीयांश लोकसंख्येतील अस्पृश्य आणि बहिष्कृत लोकांचे भवितव्य ही होती...
_MarathiBhasha_MrathiManus_1.jpg

मराठी भाषा आणि मराठी माणूस

आजकाल साधी पण सुंदर मराठी भाषा कानावर पडत नाही; अथवा लिहिली जात नाही अशी खंत अरूण खोपकर यांनी एका टिपणाद्वारे व्यक्त केली. ती  रास्त...

मराठी भाषा आणि बदलत गेलेली मराठी संस्कृती

बदलत्या जगात मराठीचा, किंबहुना कोणत्याही स्थानिक भाषेचा विचार अगदी वेगळ्या पद्धतीने करावा लागणार आहे. भाषा हे संस्कृतीचे मुख्य वाहन असते असा समज पूर्वापार आहे....