Home Authors Posts by सुनील बडूरकर

सुनील बडूरकर

1 POSTS 0 COMMENTS
सुनील बडूरकर यांना सामाजिक कार्यात विविध संस्थांसोबत कामाचा पस्तीस वर्षाचा अनुभव आहे. ते विद्यार्थीदशेपासून विविध दैनिकांत व साप्ताहिकांत लेखन करतात. ते सर्व प्रकाशक, लेखक यांच्याकरता उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड या भागांत जाहीर कार्यक्रम, संमेलन, संपर्क, पुस्तक प्रसारण, प्रदर्शन, वितरण व विक्री यासाठी कायम कार्यरत असतात. ते एशियन रायटर्स : मीडिया अँड पब्लिकेशन्स या व्यावसायिक संस्थेचे संचालक आणि लोकप्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे सचिव आहेत. त्यांनी स्वतःला ‘राजकीय समाज वैज्ञानिक संस्कृती संवर्धन’ कार्यात पूर्णवेळ झोकून दिले आहे.

देव/नवस/बकरे… आणि धाराशिवचा दर्गा

धाराशिवजवळ दहा-पंधरा किलोमीटर अंतरावर गड देवधरी नावाचे लहानसे खेडे आहे. डोंगराच्या खाली, अगदी दरीत असावे असे. त्या ठिकाणी नव्याने निर्माण झालेला दर्गा होता. आधी तेथे काही नव्हते, पण एका हुशार माणसाने त्याची वार्षिक जत्रा सुरू केली. त्याला गावच्या जत्रेचे स्वरूप मिळाले. म्हणायला तो देव कुणाचा तर मुस्लिमांचा आणि कंदुरी कोणाची तर वरिष्ठ हिंदूंची ! भारतीय समाज असा संमिश्र कौतुकाचा, भाविकतेने भारलेला आहे ! दर्ग्याला नवस बोलून कंदुरी करणारी हजारो कुटुंबे आहेत. त्यांच्या मनात, डोक्यात कोणताही धर्म नसतो. मजा अशी की देव, धर्म, इच्छा, नवस, बकरे, श्रद्धा यांचे अफलातून संयुग तयार झाले आहे...