महर्षि धोंडो केशव कर्वे

कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे गेले. ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते....

कोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर ! (Dabhols Historian Anna Shirgaonkar)

अनंत धोंडूशेठ शिरगावकर हे अण्णा शिरगावकर या नावाने कोकण परिसरात ओळखले जात. त्यांनी शिक्षण, सहकार, कामगार संघटना, अपंगांसाठीच्या संस्था, वाचनसंस्कृती, पंचायतराज, संग्रहालयशास्त्र, कोकणच्या प्राचीन इतिहासाचा शोध अशा विविध विषयांत मैलाचे दगड ठरतील असे संशोधन व लेखन कार्य केले आहे. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1930 गुहागरमधील विसापूर गावचा. त्यांना मृत्यू वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी 11 ऑक्टोबर 2022 रोजी आला...
_Babasaheb_Ambedkar_Dhammakathi_1.jpg

बाबासाहेबांची धम्म काठी

0
बाबासाहेबांनी गुलामाला गुलामगिरीतून मुक्तता मिळावी यासाठी क्रांती रक्ताचा एकही थेंब न सांडवता घडवून आणली. ती क्रांती म्हणजे धम्म क्रांती होय. बाबासाहेबांनी धम्मक्रांती घडवून आणण्यासाठी भारताचे मध्यवर्ती स्थान म्हणजेच नागपूर हे ठिकाण निवडले...

बाबासाहेब आंबेडकरांना आगळीवेगळी श्रद्धांजली – भूमिका आणि विचार

1
डॉ. हर्षदीप कांबळे (I.A.S., उद्योग विकास अायुक्त, महाराष्ट्र राज्य) आणि दंतवैद्य विजय कदम या दोघांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती' स्थापना केली. त्या...

तानुबाई बिर्जे – पहिल्या भारतीय महिला संपादक (Tanubai Birje – The First Indian Woman...

तानुबाई बिर्जे यांनी ‘दीनबंधू’ या वृत्तपत्राचे संपादकपद एकशेवीस वर्षांपूर्वी यशस्वीपणे भूषवले होते ! महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या पहिल्या स्त्री संपादक मानल्या जातात. श्रीराम गुंदेकर त्यांच्या 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास' या ग्रंथात म्हणतात, "त्या ब्राह्मणेतर पत्रकारितेतील पहिल्या स्त्री संपादक आहेत. कदाचित मराठी पत्रकारितेतील स्त्री म्हणून पहिलेपणाचा मानही त्यांनाच मिळू शकेल !"
_RangbhumecheMama_MadhukarToradamal_1.jpg

रंगभूमीचे मामा – मधुकर तोरडमल

प्राध्यापक मधुकर तोरडमल म्हणजे मराठी रंगभूमीवर प्रसिद्ध मामा तोरडमल. त्यांचा जन्म 24 जुलै 1932 रोजी झाला. मधुकर तोरडमल यांच्या नाट्याभिनयाची सुरुवात ही त्यांच्या मुंबईतील...

वराहमिहीर: भूगर्भजलाचा पहिला अभ्यासक (Varahmihir – Groundwater Scientist of India’s history)

वराहमिहीर (सन 487 ते 550) हा विचारवंत, पर्यावरणतज्ज्ञ व निष्णात ज्योतिषी उज्जैनच्या (मध्यप्रदेश) परिसरात होऊन गेला. त्याचा ‘बृहत्संहिता’ हा अतिप्रसिद्ध असलेला ग्रंथ. त्यातील गर्भलक्षणाध्याय, गर्भधारणाध्याय, प्रवर्षणाध्याय आणि दकर्गलाध्याय असे चार अध्याय ‘पाणी’ ह्या विषयासंबंधी विस्तृत माहिती देतात.
_shriram_kamat

विश्वचरित्र कोशकार – श्रीराम कामत

0
श्रीराम कामत हे ‘विश्वचरित्रकोशाचा अखेरचा खंड’ आणि ‘बोरकरांचे समग्र साहित्य प्रकाशन’ असे दोन प्रकल्प वर्षभरात पूर्ण करून निवृत्त होणार होते; पण, तोच मृत्यूने त्यांच्यावर...

प्रभाकर कंदिलवाले – ओगले

0
विजेची निर्मिती महाराष्ट्रात बाल्यावस्थेत होती तेव्हा एक मोठा आधार होता तो म्हणजे कंदिलाचा. त्याचा प्रभाकर ब्रँड ही जणू महाराष्ट्रीयत्वाची निशाणी ठरली ! अनेक जणांच्या परीक्षा त्या कंदिलांनी यशस्वीपणे पार पाडल्या. छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये, वाड्यांमध्ये पेटलेल्या कंदिलानी घरांतील, दुकानांतील व्यवहार उजळून काढले. त्या प्रभाकर कंदिलाचे निर्माते होते गुरुनाथ प्रभाकर ओगले...

आबासाहेब काकडे : प्रेरणा कोल्हापूरची (Abasaheb Kakade : Inspiration from social movements in Kolhapur)

‘काकडे’ घराण्याची झुंजार परंपरा सतत चारशे वर्षे जपली गेली आहे. घराण्याचा आधुनिक काळातील इतिहास सुरू होतो एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कान्होजी महादजी काकडे यांच्यापासून. कान्होजी आणि लक्ष्मीबाई यांना पाचव्यांदा मुलगा झाला तो जगन्नाथ म्हणजेच आबासाहेब. आबासाहेबांच्या विचारांची आणि सामाजिक व राजकीय कार्याची जडणघडण कोल्हापूर संस्थानामधील घटनाक्रमांतून होत गेली. आबासाहेब कोल्हापूरवरून नगर जिल्ह्यात- स्वमुलखात नुसतेच मल्लविद्या घेऊन परतले नाहीत तर मानवतावादी विचार घेऊन आले...