Home Authors Posts by सुभाष कुळकर्णी

सुभाष कुळकर्णी

2 POSTS 0 COMMENTS
सुभाष सीताराम कुळकर्णी यांनी मुंबई विद्यापीठामधून बी एससी पदवी संपादन केली. त्यांनी अठराव्या वर्षीच दादर येथे गणेश पेठ रहिवासी सेवा मंडळाची स्थापना करून वाचनालय सुरू केले. ते वाशीला राहण्यास 1977 साली आले. तेथे त्यांनी ‘मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळा’ची स्थापना केली. ते मंडळाचे आणि वाचनालयाचे 2010 पासून अध्यक्ष; तसेच, मंडळाचे मुखपत्र ‘साहित्य मंदिर’ मासिकाचे संपादक आहेत. त्यांच्या संपादकीय लेखांचे ‘समाज भान’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. ते ई-कचरा आणि प्लास्टिक कचरा जमवून बिसलेरी कंपनीच्या बॉटल फॉर चेंज प्रकल्पाकडे पाठवतात. ते पर्यावरणप्रेमी असून पंचवीस वर्षांपासून घरच्या ओल्या कचऱ्यापासून खत तयार करतात.

प्रभाकर अंबिके -सिमेंट-क्राँक्रिटमधील साहित्यसंस्कृती (Prabhakar Ambike – Literary culture in New Mumbai)

प्रभाकर अंबिके यांनी नव्या मुंबईची ‘सिडको’ नगरी वसवण्यात मोठाच वाटा उचलला. त्यांनी सिमेंटकाँक्रिटच्या नव्या वसाहतीत साहित्यसंस्कृती रुजवण्याचा आग्रह धरला ही गोष्ट आम्हा नवी मुंबईवासीयांच्या मनी विशेष कोरली गेली आहे...
_Bhagi_Bharati_carasole

भांगी भरती

मुंबई शहर सखल भागात नैसर्गिक भौगोलिक रचनेमुळे असल्याने काही भागात अतिवृष्टीमुळे पाणी तुंबते. मुंबईत पाणी तुंबण्यामागील ‘भांगी भरती’ या नव्या कारणाची भर पडली आहे....