Home अवांतर किस्से... किस्से...

किस्से... किस्से...

परतवाडा सुपर ! (Many many good old memories of Paratwada-Amaravati ST bus)

“फलाट क्रमांक तीन वर लागलेली गाडी ही सहा वाजताची परतवाडा सुपर बस असून बस प्रवासात मध्ये कोठेच थांबणार नाही. परतवाड्याला थेट जाणाऱ्या प्रवाशांनीच गाडीत बसून घ्यावे !” अशी घोषणा लाऊडस्पीकरवरून अमरावती बस स्थानकाच्या बाहेरसुद्धा ऐकू येई आणि प्रवाशांची पावले जलदगतीने बसकडे वळत ! परतवाडा एसटी डेपोने अमरावती विनाकंडक्टर बस 1980 च्या सुमारास सुरू केली आणि ती बस प्रचंड लोकप्रिय झाली...

निरागसपणाचा मंत्र

मी आजी सात वर्षांपूर्वी झाले आणि आजीपणाचा सांस्कृतिक वारसा नातीकडे पोचवण्याची जबाबदारी माझ्याकडे हळूहळू आली; ती म्हणजे गोष्ट सांगणे ! गोष्ट सांगणे, ही ‘गोष्ट’ वाटते तितकी सोपी नाही ! कोरोनाच्या काळात मुक्ता - माझी लेक - घरातून ‘ऑनलाईन’ काम करत असताना, माझ्याकडे नातीला गोष्ट सांगण्याची जबाबदारी अधूनमधून आली. साडेचार-पाच वर्षांच्या नातीला -अनाहिताला- व्हिडिओ कॉल करून गोष्ट ऐकण्यात गुंतवणे हे आव्हानच होते...

दुर्गादेवीचा दुष्काळ ( Ill famous famine of Durgadevi in thirteenth century)

1
बाराव्या आणि तेराव्या शतकांच्या काठावर तेरा वर्षे महाराष्ट्रात सतत दुष्काळ होता. त्या दुष्काळात लाखा वंजारींमधील दुर्गादेवी या कर्तबगार महिलेने त्या काळच्या बिहार या गंगेच्या काठच्या प्रदेशातून धान्य आणून महाराष्ट्रातील समाज तेरा वर्षे अखंड वाहतूक करून जगवला! ती लाखा बैलांची वाहतूक इकडून तिकडे उत्तरेत नेऊन करत असे. महाराष्ट्रात तिचा सर्वत्र उल्लेख त्या काळापासून ‘दुर्गादेवी’ असा होऊ लागला. त्या काळाच्या इतिहासात तो ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ असे म्हटले जाऊ लागले...

आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी

योगीराज बागूल यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ हे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर हर्षदीप कांबळे (आय ए एस) आणि दंतवैद्य विजय कदम यांनी ‘डॉ.बाबासाहेब विचार मंचा’च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या त्या शिलेदारांचे एकवीस जिवंत वारस शोधून काढून त्यांचा मुंबईत भव्य सत्कार घडवून आणला ! त्यावेळी तेथे जमलेल्या त्या सत्कारमूर्तींच्या चेहऱ्यावरील कृतज्ञतेची भावना ही योगीराज यांच्या त्या अथक परिश्रमांची पावती होती...

इतिहासप्रसिद्ध कर्तबगार चार स्त्रिया (Four warrior women from the history of Maharashtra)

भारतीय इतिहासात चार कर्तृत्ववान, शूर स्त्रिया होऊन गेल्या. पैकी तिघी मराठी होत्या. त्या म्हणजे शिवाजी महाराजांची सून- राजाराम यांची विधवा पत्नी ताराराणी, इंदूरच्या मल्हारराव होळकर यांची विधवा सून अहिल्याबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि कित्तूर संस्थानची विधवा राणी चन्नम्मा. त्या तिघी जणी विधवा होत्या. ताराराणी, अहिल्याबाई यांचा लढा स्वकीयांबरोबर होता. राणी चिन्नम्मा आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यामध्ये खूप साम्य आहे...

कुसुमाग्रजांची स्वप्नाची समाप्ती आणि कवी बोरकर

कुसुमाग्रज यांच्या रसिकमान्य, वाचकप्रिय कवितांपैकी 'स्वप्नाची समाप्ती' ही एक कविता आहे. त्या कवितेच्या ओळी जाणत्या मंडळींच्या ओठांवर ऐकण्यास मिळतात. अनेकांनी या कवितेविषयी सांगितले तरी ती कविता वाचण्यास सुरूवात केली तरीदेखील या क्षणाला नवा आनंद देते. 'स्वप्नाची समाप्ती' या कवितेविषयीची एक छान आठवण कवी बा.भ. बोरकर यांनी 'कौतुक तू पाहे संचिताचे' या त्यांच्या आत्मकथेत रसाळपणाने कथन केली आहे...

बोजेवार आणि अध्वर्यू

0
थिंक महाराष्ट्र’चे संपादक दिनकर गांगल यांनी संस्कृतिकारण हा शब्द मराठीत रूढ केला. तो त्यांनी ‘ग्रंथाली’च्या ग्रंथप्रसार यात्रेत 1982 साली प्रथम वापरला. त्या यात्रेची भूमिकाच साहित्यातील संवाद व समन्वय अशी होती. त्या धर्तीचे बरेच कार्यक्रम त्या यात्रेत आणि ‘ग्रंथाली’च्या नंतरच्या ग्रंथएल्गार, संवादयात्रा, ग्रंथमोहोळ, वाचकदिन अशा विविध उपक्रमांमध्ये होत गेले...

जॉन स्मिथ की वॉल्टर स्पिंक? (John Smith or Walter Spink)

भवताल व अभ्युदय या दोन संस्थांनी अजिंठा येथे शिबिरे आयोजित केली होती. शिबीर चालू असताना, शिबिरात सांगत असलेल्या संकल्पनांमुळे एक लहान शिबिरार्थी भांबावून गेला. त्याला बाहेर आलेला पाहून शिबीर संयोजक शुभा खांडेकर यांनी त्याला काही प्रश्न विचारले. त्यावर सृजन शाहू पाटोळे या विद्यार्थ्याने गंमतीशीर उत्तर दिले...

स्वरांची मोहिनी (Mesmerising Music)

4
संगीताची मोहिनी अवीट आहे. प्रत्येकापाशी गाण्यांच्या आठवणी असतात. एखादं गाण पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच्या किंवा एखादं गाणं ऐकत असताना घडलेल्या प्रसंगांच्या... ते गाणं आणि त्या आठवणी हातात हात घालूनच येतात. या विषयावर प्रत्येकजण स्वत:चा असा ललित लेख लिहू शकेल. भरून आलेल्या आभाळातून कोसळणाऱ्या सरींचे धारानृत्य सुरू असताना मनाला आपसूकच हुरहुर लागते. अशा वेळी गाणं आणि गाण्यांच्या आठवणी साथ देतात. मनाला सुकून देतात. या लेखात गाण्यांच्या आठवणी सांगत आहेत, इतर वेळी गणिताविषयी लिहिणारे मुकेश थळी. त्यांच्या मते, गाण्यातही गणित आहे आणि गणितातही गाणे आहे...

बकुळफुलांचा अक्षयगंध… अक्षयरंग… (Blossoming Bakul)

बकुळीचे झाड हे मूळचे भारतीय उपखंडातील झाड आहे. त्याच्या फुलांचा सुगंध मोहक आहे आणि रूप मनोवेधक आहे. हे झाड औषधी वनस्पतीही आहे. पूर्ण वाढलेले बकुळीचे झाड त्याच्या भरगच्च आकारामुळे दिसतेही सुंदर. बारमाही हिरवेगार असणाऱ्या त्या झाडाखाली दाट सावली असते. बकुळीच्या फुलांचे वेड सर्वांना, विशेषत: मुलींना असते. त्या फुले गोळा करत बकुळीच्या झाडाखाली तासचे तास रमू शकतात. या बहुगुणी झाडाविषयी मंजूषा देशपांडे त्यांच्या आठवणी आणि अनुभव सांगत आहेत...