Home Authors Posts by अविनाश चिंचवडकर

अविनाश चिंचवडकर

1 POSTS 0 COMMENTS
अविनाश चिंचवडकर यांचे शिक्षण बी.ई. (मेकॅनिकल) झाले, पण ते संगणकक्षेत्रात नामवंत कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यानिमित्त त्यांचे वास्तव्य बऱ्याच देशांत व भारतात बंगलोर येथे झालेले आहे. सध्या हेग-नेदरलँड्स येथे. त्यांनी गझलेसह अनेक साहित्य प्रकारांत विपुल लेखन केले आहे. पण विनोदी, हलकेफुलके लेखन ही त्यांची विशेष पसंती. त्यांची तीन पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याखेरीस त्यांचे विविध तऱ्हेचे स्फूट लेखन व गीत लेखन चालू असते. त्यांची गीते रेकॉर्डही झाली आहेत. त्यांना विविध पुरस्कार व सन्मान लाभले आहेत.

परतवाडा सुपर ! (Many many good old memories of Paratwada-Amaravati ST bus)

“फलाट क्रमांक तीन वर लागलेली गाडी ही सहा वाजताची परतवाडा सुपर बस असून बस प्रवासात मध्ये कोठेच थांबणार नाही. परतवाड्याला थेट जाणाऱ्या प्रवाशांनीच गाडीत बसून घ्यावे !” अशी घोषणा लाऊडस्पीकरवरून अमरावती बस स्थानकाच्या बाहेरसुद्धा ऐकू येई आणि प्रवाशांची पावले जलदगतीने बसकडे वळत ! परतवाडा एसटी डेपोने अमरावती विनाकंडक्टर बस 1980 च्या सुमारास सुरू केली आणि ती बस प्रचंड लोकप्रिय झाली...