Home Search
कादंबरी - search results
If you're not happy with the results, please do another search
तोरू दत्त – पहिली हिंदुस्थानी इंग्रजी कादंबरीकार (Toru Dutt – First Indian Novelist in...
तोरू दत्त ही पहिली हिंदुस्थानी इंग्रजी कादंबरीकार. तिचे काव्यही युरोपात अठराव्या शतकात गाजले. तिने फ्रेंच भाषेतही लेखन केले. तिचे एकूण दत्त कुटुंब हेच लोकविलक्षण होते. त्यांनी विल्यम कॅरे या इंग्रजी धर्मप्रसारकास आश्रय दिला; स्वत: ख्रिश्चन धर्म स्वीकारला, इंग्लंडला स्वत:ची मातृभूमी मानले आणि प्रेम मात्र हिंदुस्थानवर केले व हिंदुस्थानी जनतेची काळजी वाहिली...
यात्रेकऱ्याचा वृत्तांत – पहिली मराठी कादंबरी (The first Marathi novel -Traveler’s Diary)
मिसेस फेरार नावाच्या बार्इंनी 1838 साली तेव्हाच्या ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’च्या सभासदांच्या प्रोत्साहनाने आणि सूचनांनी ‘यात्रेकऱ्याचा वृत्तांत’ नावाचे पाठ्यपुस्तक लिहिले. ते बराच काळ भारतातील शाळांमधून शिकवले गेले...
प्रत्ययकारी ग्रामीण कादंबरी – विहीर
राजेंद्र जगन्नाथ ठोंबरे यांनी ‘विहीर’ ही कादंबरी लिहिली आहे. ते येलूरसारख्या ग्रामीण भागात राहतात. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. ते पेठ नाका येथील बॉम्बे रेयॉन कंपनीत ‘विव्हर’ म्हणून काम करतात. कादंबरी आहे छोटेखानी, परंतु तिचा सामाजिक आशय मोठा आहे. गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन, घोडा-गाढवांवर संसार बांधून डोंगररांगांमधून फिरणार्या एका कुटुंबाला जेव्हा कडक उन्हाळ्यात एका माळरानामध्ये तीव्र तहान लागते, तेव्हा सगळे कुटुंबीय पाण्याच्या शोधार्थ धावपळ करू लागतात. ते हतबल होऊन असहाय्य अवस्थेत असतात, त्याच वेळी ‘संभा’ नावाच्या मुलाला ‘पाण्याचा झरा’ दिसतो! त्याची गाय तेथे पाणी पीत असते. तो पाण्याचा ‘उमाळा’ सर्वांची तहान भागवतो आणि पुढे, त्याच ‘उमाळ्या’चे डबके व डबक्यातून ‘साधी विहीर’ व पुढे नक्षीदार दगडी बांधकाम केलेली ‘विहीर’... हे बदल कसे होत जातात त्याचे वर्णन लेखक राजेंद्र जगन्नाथ ठोंबरे यांनी केलेले आहे. ते प्रत्ययकारी उतरले आहे...
तारकर्ली – कर्णिकांच्या कादंबरीत कोकणचे हृदयस्पर्शी दर्शन
मधू मंगेश कर्णिक यांनी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी ‘तारकर्ली’ ही कादंबरी लिहिली आहे. ती कोकण विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने धोक्याचा इशारा देणारी ठरते. कोकण...
मी कैद केलेले कळप ही कादंबरी का लिहिली?
आज जेव्हा या प्रश्नाचा विचार जेव्हा मी करतोय की ही 'कैद केलेले कळप’ ही कादंबरी मी का लिहिली तेव्हा मुळात मी लिहितोच का या...
आनंदप्रवासी रवींद्र पिंगे
रवींद्र पिंगे हे मराठीतील नेटाने, सातत्याने, उमाळ्याने लेखन करणारे साहित्यिक होत. त्यांनी मुख्यतः ललित लेखन केले. त्यांनी कथा-कादंबरी हे वाङ्मयप्रकारही हाताळले आहेत; पण ते वाचकप्रिय ठरले ते त्यांच्या छोटेखानी, प्रसन्न, उत्कट ललित लेखनामुळे. पिंगे यांनी पन्नासहून अधिक वर्षे, कोऱ्या कागदाच्या हाका ऐकत लेखणीचे वल्हे डौलाने वल्हवले. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ हे समर्थ रामदासांचे सांगणे पिंगे यांच्याइतके कोणी मनावर घेतले नसेल. ते ‘लिहा, सतत लिहीत राहा’ असे ‘पेर्ते व्हा’च्या चालीवर सांगत असत आणि त्यांनी स्वतःही लिहिण्याचा तो वसा जपला...
त्र्यं.वि. सरदेशमुख : साहित्याचे आध्यात्मिक मूल्य (Prof T V Sardeshmukh took criticism to spiritual...
त्र्यं.वि. सरदेशमुख यांची जन्मशताब्दी 2020 साली झाली. त्यांची मुख्य ओळख कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून आहे. त्यांनी कादंबरी, कविता, समीक्षा, नाटक, अनुवाद असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले. त्यांच्या साहित्यकृतीचा लेखक निशिकांत ठकार यांनी लेखस्वरूपात घेतलेला आढावा...
नीतिन वैद्य यांनी रचलेला त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा विचारकोश (T V Sardeshmukh’s world of...
सोलापूरचे नीतिन वैद्य यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एक, ‘त्र्यं.वि. सरदेशमुख : साहित्य- संदर्भ साहित्य : सूची आणि चरित्रपट’ हे पुस्तक व दोन, ‘जवळिकीची सरोवरे’ हे पुस्तक. यांपैकी पहिले पुस्तक सूची वाङ्मयाचे आहे. त्यात सूचिकाराने स्वतः प्रास्ताविक जोडलेले आहे. त्यातून, सूचिकाराने सरदेशमुख यांच्या साहित्याचा शोध कसा घेतला, त्यास कोठे कोठे हिंडावे-फिरावे लागले, आर्जवे-मिनतवाऱ्या कराव्या लागल्या या शोधाची मन पिळवटून टाकणारी कहाणी आहे. त्याने स्वतःच्या शारीरिक मर्यादांची तमा न बाळगता केलेली ती धडपड थक्क करणारी आहे ...
उदयन वाजपेयींची संवादयात्रा- शम्सुर्रहमान फारूकी (Udayan Vajpayee Interviews: Shamsur Rahman Faruqi)
उदयन वाजपेयी हे हिंदीमधील आघाडीचे लेखक. त्यांनी त्यांच्या दीर्घ लेखन कारकिर्दीत कथा, कविता, कादंबरी, प्रवासवृत्तांत-समीक्षात्मक निबंध, अनुवाद असे अनेकविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन केले आहे. त्यांनी स्वत:च्या लेखनाबरोबरच समकालीन प्रतिभावंतांचे विचारविश्व जाणून घेण्याच्या उद्देशाने काही दीर्घ मुलाखती घेतल्या आहेत. त्या मुलाखतींपैकी शम्सुर्रहमान फारूकी यांच्या मुलाखतीविषयी परिचयात्मक लेख निरंतर वाचक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नितीन वैद्य यांनी लिहिला आहे...
हमीद दलवाई व मुस्लिम सत्यशोधक मंडळ (Hamid Dalwai, the Founder Of Muslim Reformists Movement)
‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना पुण्यातील ‘साधना’ साप्ताहिकाच्या आंतरभारती सभागृहात 22 मार्च 1970 रोजी झाली. ‘साधना’ साप्ताहिक हमीद दलवाई आणि ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ यांच्या पाठीमागे सतत खंबीरपणे उभे राहिले आहे. हमीद दलवाई यांना ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’च्या स्थापनेनंतर कार्य करण्यासाठी मोजून पाच-सात वर्षे मिळाली. दलवाई यांचे निधन अकाली, 3 मे 1977 रोजी झाले. यदुनाथ थत्ते, ग.प्र. प्रधान, नरेंद्र दाभोळकर हे ‘साधने’चे जुने आणि विद्यमान संपादक विनोद शिरसाट यांनी दलवाई व मंडळ यांच्यासाठी गेल्या पाच दशकांत केलेले कार्य मोठे व महत्त्वपूर्ण आहे...